GMC कोल्हापूर, गट-ड भरतीसाठी पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश जाहीर – GMC Kolhapur Result 2026

GMC Kolhapur Result

GMC Kolhapur Result: महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अधिनस्थ आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहु महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील एकूण ९५ रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता दिनांक १९ मे, २०२५ रोजी आय.बी.पी.एस कडून ऑनलाईन परिक्षा घेण्यात आलेली होती. या परीक्षेनुसार निवड यादी व  प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली. सदर निवडयादी व प्रतिक्षायादी मधील उमेदवारांची दिनांक १६/१०/२०२५ व सदर दिवशी अनुपस्थित उमेदवारांना संधी देऊन दिनांक १८/११/२०२५ रोजी कागदपत्रे व बायोमेट्रीक पडताळणी करुन कागदपत्रे पडताळणीअंती पात्र उमेदवारांचे नियुक्ती आदेश देण्यात येत आहेत. उमेदवारांनी दिनांक १३/०३/२०२६ रोजी ठिक ०३:०० वाजता आपले नियुक्ती आदेश स्विकारण्यासाठी ऑडीटोरियम हॉल, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, शेंडा पार्क, कोल्हापूर याठिकाणी व्यक्तीशः उपस्थित राहावयाचे आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 गट-ड (वर्ग-४) संवर्गातील सरळसेवा भरती – दिनांक १३/०३/२०२६ रोजी नियुक्ती आदेश स्विकारण्यासाठी उपस्थित राहावयाच्या उमदेवारांची यादी

GMC Kolhapur Result

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथील गट-ड संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी १९ मे २०२५ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेसंदर्भात, २१ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या कागदपत्र पडताळणीस अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी देण्यात येत आहे. अशा उमेदवारांनी ०९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, कोल्हापूर येथील महाविद्यालयात सर्व मूळ कागदपत्रांसह व दोन स्वसाक्षांकित प्रतांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक www.rcsmgmc.ac.in व kolhapur.gov.in वर उपलब्ध आहे.

प्रसिध्दीपत्रक


GMC Kolhapur Result is published now. The Examination of GMC Kolhapur recruitment was conducted by IBPS. The  result is published now. You can check your result from following given postwise Links. For More updates keep visiting MahaBharti.in

GMC कोल्हापूर द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेचा विविध पदांचा  निकाल जाहीर झाला असून खालील लिंक वरून आपण दिलेल्या PDF फाईल मध्ये निकाल बघू शकता. तसेच पुढील अपडेट्स साठी महाभरतीला बेहत देत रहा. 

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड