राज्यातील 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत विविध पदांच्या 884 जागा रिक्त
GMC Assistant Professor Bharti 2022
GMC Assistant Professor Bharti 2022
GMC Assistant Professor Bharti 2022 : There are 884 vacancies for assistant professors in 22 government medical colleges and hospitals in the state. Similarly, associate professors, professors who have served for years, are not promoted on time nor are they given the benefit of the Seventh Pay Commission. Currently, 450 assistant professors are serving in these medical colleges and they are eligible for these posts. Further details are as follows:-
GMC Assistant Professor Vacancies 2022
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यातील 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत 884 सहायक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक यांनी वर्षानुवर्षे सेवा दिली, तरीही त्यांची वेळेवर पदोन्नती होत नाही की त्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभही दिला जात नाही. यावरून शासकीय वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात सध्या अनागोंदी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तात्काळ दखल घेण्याची मागणी
- राज्यातील 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलमध्ये 884 सहायक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत.
- यापैकी सध्या 450 सहायक प्राध्यापक हे या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड सेवा देत असून, ते या जागांवर पात्र आहेत.
- मात्र, सध्या हे सहायक प्राध्यापक कंत्राटी पद्धतीने राबत आहेत; परंतु, वारंवार आंदोलन, मोर्चे काढूनही त्यांची ही मागणी पूर्ण केली जात नाही, ही शोकांतिका आहे.
- यामुळे या शिक्षकांचा उत्साह मावळत असून, ते वैद्यकीय शिक्षणाच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही.
“कोरोना काळात एकूण कोविड रुग्णांपैकी 70 ते 80 टक्के रुग्णसेवा वैद्यकीय महाविद्यालयांनी दिल्या आहेत. यामध्ये चाचणी, संपर्क शोध, सर्व्हेलन्स सांभाळले. सहायक प्राध्यापकांच्या जागा भरल्या जात नाहीत. आठ ते दहा वर्षांपासून सेवेत असतानाही त्यांना पदोन्नती दिली जात नाही, तसेच आश्वासित प्रगती, सातवा वेतन आयोगाचा लाभ दिला जात नाही. दुसरीकडे वरिष्ठ स्तरावर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा पदे रिक्त आहेत त्या डॉक्टरांवर शैक्षणिक आणि रुग्णसेवेचा ताण येत असताना त्यांना नवीन वैद्यकीय महाविद्यालयांत पाठवले जाते. येत्या आठ दिवसांत यावर तोडगा निघाला नाही तर आम्ही संघटनेची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहे.”
– डॉ. यल्लप्पा जाधव, केंद्रीय सचिव, महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशन
Table of Contents