जिल्हा परिषद पालघर अंतर्गत होणाऱ्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेत जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना नियुक्ती न देता स्थानिक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी २०२२ पात्र उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी स्थानिक उमेदवारांनी केली आहे.

या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने १२ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या आदेशानुसार, नियमित शिक्षकांची पदभरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी २०२२ पात्र, परंतु टीईटी/सीटीईटी अपात्र स्थानिक उमेदवारांनाही संधी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
स्थानिक उमेदवारांना संधी न दिल्यास बुधवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद पालघर येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तसेच, या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीस संपूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल, असेही आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.
या मागणीस अनेक स्थानिक उमेदवारांचा पाठिंबा असून, हसमूख कनू दुबळा, बिपीन लालू तुंबडे, मगन रमता भोये यांसह अनेक उमेदवारांनी या आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास पुढील संघर्ष तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















