महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Geologist Exam Date) अखेर भूवैज्ञानिक आणि इतर विविध पदांसाठीच्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक गट-अ, सहायक भूवैज्ञानिक गट-ब, कनिष्ठ भूवैज्ञानिक गट-ब, उपअभियंता (यांत्रिकी) गट-ब तसेच शासकीय तंत्रनिकेतनमधील प्राचार्य आणि शिक्षक सेवा गट-अ या पदांसाठी ५ एप्रिल रोजी मुंबईत परीक्षा होणार आहे.

एमपीएससीच्या अवर सचिव (दक्षता, धोरण व संशोधन) यांनी यासंदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. भूवैज्ञानिक पदांच्या परीक्षा मागील दोन वर्षांपासून रखडल्या होत्या. यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने ६ डिसेंबर आणि ३ जानेवारी रोजी बातमी प्रकाशित केली होती. भूविज्ञान व खनिकर्म तसेच पाणीपुरवठा विभागासाठी जवळपास १५० भूवैज्ञानिक पदांच्या भरतीची जाहिरात डिसेंबर २०२२ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती.
या जाहिरातीनुसार सहायक भूवैज्ञानिकांसाठी ३५, कनिष्ठ भूवैज्ञानिकांसाठी १०२, वरिष्ठ भूवैज्ञानिकांसाठी १०, भूविज्ञान व खनिकर्म विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिकांसाठी ५ आणि वरिष्ठ तंत्रज्ञांसाठी ७ पदांची भरती होणार होती. परीक्षेचा अभ्यासक्रम २७ जुलै २०२३ रोजी जाहीर करण्यात आला होता. मात्र, दीड वर्षांपेक्षा जास्त काळ उलटूनही परीक्षा होऊ शकली नव्हती.
वयोमर्यादा लक्षात घेता संधी गमावण्याची भीती उमेदवारांना वाटत होती. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) प्रमाणपत्राच्या मुद्यावरून परीक्षा लांबणीवर पडल्याचे सांगितले जात होते. मात्र, तो मुद्दा निकाली लागल्यानंतरही परीक्षा लांबलेलीच होती. अखेर एमपीएससीने २५ एप्रिल रोजी परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















