GATE Exam Result 2026
ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग अॅप्टिट्यूड टेस्ट अर्थात ‘गेट’ परीक्षेचा निकाल आयआयटी रुरकीने जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रक थेट gate2026.iitg.ac.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा लॉगिन तपशील टाकून गुणपत्रक पाहता येणार आहे. गुणपत्रकात विद्यार्थ्यांचे नाव, पालकाचे नाव, गेट २०२६ चे गुण, परीक्षेची तारीख, श्रेणी, अखिल भारतीय रैंक आदी तपशील देण्यात आला आहे.
यावर्षी ‘गेट’ परीक्षा आयआयटी रुरकीद्वारे ७, ८, १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आली होती. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘गेट’ ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा दरवर्षी घेण्यात येते. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एमटेक, एमई आणि पीएचडी यांसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो. प्रवेश रँकच्या आधारावर दिला जातो. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट gate2026.iitg.ac.in ला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गेट २०२६ चा निकाल तपासण्यासाठी सर्वप्रथम gate.iitr.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. वेबसाइटच्या होम पेजवर ‘कैंडिडेट लॉगिन’ या लिंकवर क्लिक करावे, यानंतर मागितलेला तपशील प्रविष्ट करून सबमिट करावे लागेल. आता गुणपत्रक स्क्रीनवर उघडेल, ते विद्यार्थ्यांना तपासता तसेच डाऊनलोड करता येणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















