Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भामरागड व एटापल्ली तालुक्यात तब्बल २२६ पाेलीस पाटलाची पदे रिक्त | Gadchiroli Police Patil Bharti 2023

Gadchiroli Police Patil Bharti 2023

Gadchiroli Police Patil Bharti 2023

Gadchiroli Police Patil Bharti 2023: A total of 244 police posts were advertised, including 142 in Etapalli taluka and 102 in Bhamragarh taluka. As not enough applications were received in the first phase, the application deadline was extended. In Bhamragarh taluka, only 26 applications were received for 102 seats, out of which 24 applications were qualified. Despite conducting the recruitment process, 45 Patal posts in about 226 villages are vacant. The exact reason why a citizen does not apply for the post of Police Patil needs to be ascertained.

एटापल्ली उपविभागांतर्गत येणाऱ्या भामरागड व एटापल्ली तालुक्यातील २४४ गावांमध्ये पाेलीस पाटलाची पदे भरण्यासाठी जाहीरात काढण्यात आली हाेती. मात्र केवळ १८ गावांना पाेलीस पाटील मिळाले आहेत. पुन्हा तब्बल २२६ जागा रिक्त आहेत.  तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे पेपर्स सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शासनाकडून मासिक जवळपास सहा हजार रूपये मानधन दिले जात असतानाही अर्ज का आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गावात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी पाेलीस पाटलाची आहे. गावातील स्थिती पाेलिसांना कळविण्याची महत्त्वाची जबाबदारी पाेलीस पाटलाची आहे. या पदाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक गावात पाेलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. यासाठी गावातीलच व्यक्तीची नेमणूक केली जाते. आपली कामे सांभाळून पाेलीस पाटील पदाची सहज जबाबदारी सांभाळता येते. त्यामुळे हे पद मिळविण्यासाठीसुद्धा गावात फार माेठी स्पर्धा राहत असल्याचे दिसून येते. मात्र याला एटापल्ली उपविभाग याला अपवाद ठरला असल्याचे दिसून येते.

एकुण २४४ पोलीस पाटलांची पदे भरण्यासाठी जाहिरात
एटापल्ली तालुक्यात १४२ व भामरागड तालुक्यात १०२ अशा एकुण २४४ पोलीस पाटलांची पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली. पहिल्या टप्प्यात पुरेस अर्ज प्राप्त न झाल्याने, अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली. मात्र याचा फारसा फरक पडला नाही. एटापल्ली तालुक्यात १४२ जागांसाठी केवळ ७१ अर्ज पात्र झाले. ४८ जागा महिलांकरिता राखीव हाेत्या. केवळ ९ महिलांनी अर्ज केले. ९ पैकी २ महीला उत्तीर्ण हाेऊन पोलीस पाटील बनल्या. भामरागड तालुक्यात १०२ जागांसाठी फक्त २६ अर्ज आले, यापैकी २४ अर्ज पात्र ठरले. २४ पैकी फक्त ०५ पास झाले. ०४ महिलांनी परीक्षा दिली. परंतु चारही महीला नापास झाल्या.

८१ पैकी केवळ २ महिला पाेलीस पाटील 

एटापल्ली तालुक्यात महिला पाेलीस पाटील पदासाठी ४८ जागा हाेत्या. त्यासाठी केवळ ९ महिलांनी अर्ज केले. ९ पैकी २ महिला उत्तीर्ण हाेऊन पोलीस पाटील बनल्या. भामरागड तालुक्यात एकूण ३३ जागा महिलांसाठी राखीव हाेत्या. केवळी चारच अर्ज प्राप्त झाले. या चारही महिला अनुत्तीर्ण झाल्या. त्यामुळे या तालुक्यातील महिलांची सर्वच पदे रिक्त आहेत. – दुर्गम भागातील नागरिकांकडे दाखले राहत नाही. त्यामुळे ते अर्ज करू शकत नाही. तर काही उमेदवार परीक्षा उत्तीर्ण हाेऊ शकले नाहीत. मात्र काही गावांमध्ये अर्जच आले नाही. भरती प्रक्रिया राबवूनही सुमारे २२६ गावांमधील पाेलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. नेमक्या काेणत्या कारणामुळे नागरिक पाेलीस पाटील पदासाठी अर्ज करत नाही, त्याचा शाेध घेण्याची गरज आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड