अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी यादी जाहीर
FYJC 2nd merit list 2020 Mumbai
FYJC 2nd merit list 2020 Mumbai – Mumbai 11th Admission 2020 Second merit list is published now. The candidates can Check your status in Merit List Now.
FYJC 2nd Merit List 2020 is finally released today on 05/12/2020 on its official website 11thadmission.org.in. You can Check FYJC Second Merit List 2020 Schedule for 11th Class Admission Round 2 Now Online. Here 11thadmission.org.in Second Merit List 2020 for class XI Admission is published on 5th December 2020. More Details & updates are given on respective Links.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी यादी शनिवारी (ता.5) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज केलेल्या एकुण 1 लाख 58 हजार 810 विद्यार्थ्यांपैकी 76 हजार 231 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर तब्बल 70 हजार 802 जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत. पहिल्या यादीच्या तुलनेत दुसऱ्या यादीत किंचित घसरण झाल्याने तिसऱ्या यादीत प्रवेश मिळविण्यासाठीही विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहण्यास मिळणार आहे.
दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या पसंतीक्रम दिलेले 20 हजार 371 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर दुसऱ्या पसंतीक्रम दिलेल्या 12 हजार 315 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. या दुसऱ्या गुणवत्ता यादीत चर्चगेट परिसरातील मुंबईतील एच.आर, के.सी.आणि रुईया महाविद्यालयांतील कला आणि वाणिज्य शाखेतील कटऑफ ही 95 टक्केहून अधिक वर पोहोचली आहे. विज्ञान शाखेतील प्रवेश मात्र 90 ते 95 टक्केच्या दरम्यान राहिले आहेत. माटुंगा येथील रूईया, डीजी रूपारेल महाविद्यालयात वाणिज्य आणि विज्ञान शाखेची कटऑफ ही 90 टक्केहून अधिक राहिली आहे. तर विले पार्ले येथील साठे महाविद्यालयात कला शाखेचे प्रवेश हे 85 टक्के आणि त्यादरम्यान तर वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशाची टक्केवारी थोडी वधारली आहे.
या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पहिल्या पसंतीक्रमानुसार निश्चित झालेले आहेत त्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. जर प्रवेश घेतला नाही तर त्यांना पुढील फेऱ्यांमधून वगळले जाईल आणि अखेरीस विशेष फेरीतच त्यांना अर्ज करता येणार आहे.
असे आहे शाखानिहाय प्रवेश
- शाखा – एकुण जागा – अर्ज केलेले विद्यार्थी – अलॉटमेंट झालेले विद्यार्थी
- कला – 17464 – 13628 – 7433
- वाणिज्य – 79182 – 99461 – 46600
- विज्ञान – 47202 – 44817 – 21588
- एमसीव्हीसी – 3185 – 904 – 610
- एकुण 4,47,033 – 1,58,810 – 76,231
शाखानिहाय सामान्य शाखेचे पसंतीक्रमानुसार अलॉटमेंट झालेले विद्यार्थी
- पहिला पसंतीक्रम मिळालेले विद्यार्थी – 20,371
- दुसरा पसंतीक्रम मिळालेले विद्यार्थी – 12,315
- तिसरा पसंतीक्रम मिळालेले विद्यार्थी – 9760
- चौथा पसंतीक्रम मिळालेले विद्यार्थी – 8445
- पाचवा पसंतीक्रम मिळालेले विद्यार्थी – 7037