अन्न सुरक्षा मंग विभाग हा एक महत्वाचा विभाग आहे. या ठिकाणी नोकरी मिल्ने म्हणजे सामाजिक दृष्ट्या सम्मानजनकच आहे. याच, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI FSSAI Internship Scheme ) द्वारे 2025 साठी इंटर्नशिप प्रोग्रॅमसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अन्न आणि पोषण व्यवस्थापन प्रणालीत रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत हा उपक्रम राबवला जात असून, इच्छुक विद्यार्थ्यांना 4 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. चला तर माहिती करून घेऊया या भरती बद्दल पूर्ण माहिती!

पात्र उमेदवारांना मिळणार १०,००० रुपये मानधन
या इंटर्नशिपसाठी पात्र उमेदवारांना दरमहा १०,००० रुपये स्टायपेंड दिले जाणार आहे. अन्न सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य, अन्न नियम आणि कायदे यासंबंधी सखोल ज्ञान मिळवण्याची ही संधी आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ sites.fssai.gov.in ला भेट द्यावी.
कोण अर्ज करू शकतो For FSSAI Internship Scheme?
या इंटर्नशिपसाठी १०वी, १२वी उत्तीर्ण तसेच पदवीधर आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजैवशास्त्र, जैवरसायनशास्त्र, पोषणशास्त्र, अभियांत्रिकी, कायदा, व्यवस्थापन आदी शाखांमधील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
इंटर्नशिपचे स्थान आणि विषय
एफएसएसएआयची इंटर्नशिप भारतातील विविध ठिकाणी दिली जाणार आहे. नवी दिल्ली (मुख्यालय) येथे मानव संसाधन, ग्रंथालय, माहिती तंत्रज्ञान, गुणवत्ता हमी आणि नियामक अनुपालन यासंबंधी प्रशिक्षण दिले जाईल. मुंबई आणि चेन्नई येथे अन्न आयात मंजुरी आणि परवाना प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तर, गाझियाबाद, कोलकाता आणि चेन्नई येथे अन्न नमुना चाचणी आणि विश्लेषण या महत्त्वाच्या प्रक्रियेवर प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना अन्न सुरक्षा आणि नियमन क्षेत्रातील विविध पैलूंचे प्रत्यक्ष ज्ञान मिळेल.
अर्जाची अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया
अर्ज सुरू होण्याची तारीख – २५ मार्च २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख – ४ एप्रिल २०२५
निवड यादी जाहीर होण्याची तारीख – एप्रिल २०२५ (पहिला किंवा दुसरा आठवडा)
एफएसएसएआय इंटर्नशिपचे फायदे
विद्यार्थ्यांना अन्न सुरक्षा आणि नियमावलीबद्दल प्रत्यक्ष ज्ञान मिळेल.
व्यावसायिक कौशल्य वृद्धीला चालना मिळेल.
दरमहा १०,००० रुपये मानधन दिले जाईल.
यशस्वीरीत्या इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना एफएसएसएआयचे प्रमाणपत्र मिळेल.
अर्ज करण्याची पद्धत How to Apply For FSSAI Internship 2025-
१. अधिकृत संकेतस्थळ sites.fssai.gov.in ला भेट द्या.
2. “Apply Online” वर क्लिक करा.
3. शैक्षणिक पात्रता निवडून आवश्यक माहिती भरा.
4. पासपोर्ट साइज फोटो आणि रिझ्युमे अपलोड करा.
5. अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करून ठेवा.
उमेदवारांनी अर्ज करताना योग्य मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी द्यावा, कारण निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती याच माध्यमातून दिली जाईल. इंटर्नशिपशी संबंधित अद्यतनांसाठी अधिकृत वेबसाइटवर वेळोवेळी भेट द्या.
एफएसएसएआय इंटर्नशिप 2025 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही सुवर्णसंधी गमावू नये!
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















