महाराष्ट्र सरकारचा स्वातंत्र्य सैनिकांना धक्का! 3000 पाल्यांच्या नोकऱ्या जाणार!

freedom fighter new gr maharashtra

राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून आता स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांची सरकारी नोकरी समाप्त होणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला असून विहित मार्गाने नियुक्ती न होता थेट नियुक्ती लिहिल्यांवर गंडांतर येणार आहे.ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याची विहित कार्यपद्धतीनुसार व विहित मार्गाने नियुक्ती झालेली नाही, तर थेट नियुक्ती झाली आहे अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त कराव्यात असा शासन निर्णय जाहीर झाल्याने स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे पाल्य यांच्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 3000 यांच्यावर स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याच्या नोकऱ्या संपुष्टात येत आहेत. दरम्यान राज्य सरकारकडून तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णया ची अंमलबजावणी तत्काळ करण्याच्या सूचना त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी शासनास सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या निर्णयाच्या विरोधात जे भगवान महासंघ आंदोलन करणार आहे. बाळासाहेब सानप यांनी सरकारला याबद्दल इशारा दिला आहे. दरम्यान या संबंधीची शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra,gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासन निर्णय :- संदर्भाधीन शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीएनएस १०८७/ ४९९/ के.नं.१२/१६-अ, दिनांक ०४ मार्च, १९९१ मधील तरतुदी कालबाहय ठरत असल्याने सदर शासन परिपत्रक या शासन निर्णयाद्वारे रद्द करण्यात येत आहे. २. ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांची विहित कार्यपध्दतीनुसार व विहित मार्गाने नियुक्ती झालेली नाही (थेट नियुक्ती झालेली आहे) अशा कर्मचा-यांच्या सेवा समाप्त कराव्यात. त्याबाबत संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी. ३. सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी. त्याबाबतचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी यांनी शासनास सादर करावा.

Read GR 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड