Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पीएमपीची मोफत बससेवा

Free PMP bus service to Essential Service Personnel

पुणे : अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएमपीने मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 25 ते 31 मार्च दरम्यान सकाळी साडेआठ ते साडेदहा आणि सायंकाळी साडेचार ते साडे सहा दरम्यान पीएमपीच्या बस कर्मचाऱ्यांना उपलब्ध राहणार आहेत.

प्रवासादरम्यान कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची तिकीट आकारणी करण्यात येणार नाही. त्यांचे ओळखपत्र तपासून त्यांना बसमध्ये प्रवेश देण्यात येईल. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बसमार्ग पुढीलप्रमाणे. 1- स्वारगेट – नांदेड सिटी – डेक्कन 2- नतावाडी- विश्रांतवाडी- मनपा 3- भेकराइ नगर- मनपा 4- विमान नगर- मनपा 5- औंध- डेक्कन 6- कात्रज – आरटीओ- शनिवार वाडा.

मार्गांवर ही बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे त्यासाठी सध्या एमपीने 20 बसचे नियोजन केले आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बस प्रवास मोफत मिळावा यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पीएमपीला पत्र पाठवून चर्चा केली होती, त्यानुसार पीएमपी ने हा निर्णय घेतला आहे.

सौर्स : सकाळ

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड