खुशखबर- Flipkart देणार राज्यात 4000 लोकांना रोजगार!!

Flipkart Recruitment

Flipkart Jobs 2021

Flipkart Recruitment : वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) बुधवारी सांगितले की, ते एक स्वतंत्र मार्केटप्लेस मॉडेल ‘फ्लिपकार्ट एक्सट्रा’ (Flipkart Xtra) सादर करत आहेत. जेणेकरून इनडिव्हिज्युअल, सेवा संस्था आणि तंत्रज्ञांना कमाईच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. ‘फ्लिपकार्ट एक्स्ट्रा’ अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याद्वारे फ्लिपकार्ट इच्छुक व्यक्तींना एक सोपा अनुभव प्रदान करेल.

बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशननंतर इनडिव्हिज्युअल विविध भूमिकांसाठी स्वतःला ऑनबोर्ड करण्यास सक्षम असतील, असे एका निवेदनात म्हटले आहे. जे येत्या काही महिन्यांत डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हसह सुरू होईल आणि नंतर सर्विस पार्टनर किंवा टेक्नीशियनन्सचा समावेश असेल. त्यात म्हटले आहे की नवीन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टची पुरवठा साखळी मजबूत करण्यास मदत करेल. यासह, पार्ट टाइम जॉब्स निर्माण केले जाऊ शकतात.

डिसेंबर 2021 पर्यंत 4,000 पार्ट-टाइम असोसिएट जोडण्याचे लक्ष्य

The launch ahead of the festive season and the company’s Big Billion Days will help provide thousands of individuals, technicians and service agencies across the country with additional work and earning opportunities as delivery partners, the company said in a statement. The company aims to add 4,000 part-time associates through Flipkart Extra by December 2021.


Flipkart Recruitment 2021

Flipkart Recruitment: Flipkart is setting up factories in Bhiwandi and Nagpur in Maharashtra. This will help meet the growing demand of the e-commerce sector as well as support local vendors. In addition, 4,000 people in the state will get job opportunities. Further details are as follows:-

फ्लिपकार्ट कंपनी महाराष्ट्र्रातील भिवंडी आणि नागपूरमध्ये फॅक्टरी सुरु करत आहे. यामुळे ई-कॉमर्स क्षेत्राची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत होईल तसेच स्थानिक विक्रेत्यांना देखील आधार मिळणार आहे. यासोबतच राज्यातील ४ हजार जणांना नोकरीची संधी मिळणार आहे. कंपनीचे फूलफिलमेंट आणि सोर्टेशन केंद्र भिवंडी आणि नागपूरमध्ये असणार आहे. यामुळे राज्यातील स्थानिक विक्रेत्यांना आधार मिळेल आणि ई-कॉमर्स क्षेत्राची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत होईल. ही सुविधा ७ लाख चौरस फूट क्षेत्रात आहेत. यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ४ हजार रोजगार निर्माण होतील असे कंपनीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कंपनीने सप्लाय चेनचा विचार करुन महाराष्ट्रात प्रमुख केंद्र म्हणून निवडले आहे. नव्या फॅसिलिटी आणि सध्या असलेल्या फॅसिलिटीच्या विस्तारामुळे सप्लाय चेन फॅसिलिटीची संख्या १२ झाली आहे. ही फॅसिलिटी २३ लाख चौरस फूट क्षेत्रात पसरली आहे. यामध्ये २० हजारहून जास्त लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नोकरी करत आहेत.

‘नवीन गुंतवणूकीमुळे राज्यातील ई-कॉमर्स क्षेत्रात ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत मिळेल. तसेच विक्रेता इकोसिस्टिमला सपोर्ट करण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मदत मिळेल’ असे कंपनीने म्हटले आहे. गेल्या वर्षभरात राज्यात विक्रेत्यांची संख्या ३० टक्क्यांनी वाढल्याचेही फ्लिपकार्टने म्हटले आहे. फ्लिपकार्टच्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याच्या निर्णयाचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वागत केले आहे.


Flipkart will give jobs to 70,000 people before October, no degree required : Flipkart Recruitment : ऑक्टोबरआधी Flipkart देणार 70000 लोकांना नोकरी, कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही

Flipkart Recruitment : ई-कॉमर्स फर्म फ्लिपकार्ट (Flipkart)फेस्टीव्ह सीझनमध्ये होणारी विक्री आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फ्लॅगशीप बिग बिलियन डेज सेल (Big Billion Days Sale)आधी जवळपास 70 हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, फ्लिपकार्ट यावर्षी अनेकांना त्यांच्या सप्लाय चेनमध्ये नियुक्त करणार आहे. त्याचप्रमाणे काही अप्रत्यक्ष नोकऱ्या (Indirect Jobs) देखील फ्लिपकार्ट उपलब्ध करणार आहे.

Flipkart Recruitment

फ्लिपकार्ट नोकरी दिल्यानंतर लोकांना प्रशिक्षण देखील देणार आहे. यासाठी क्लासरूम आणि डिजिटल पद्धतीने कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय Supply Chain Management बाबत अत्यावश्यक माहिती देखील देण्यात येत ​​आहे. याशिवाय फ्लिपकार्ट ग्राहक सेवा, वितरण, इन्स्टॉलेशन तसंच सुरक्षा आणि स्वच्छताविषयक उपाय याबाबतचे ट्रेनिंग देत आहे. त्याचप्रमाणे पीओएस मशीन, स्कॅनर, विविध मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स आणि ईआरपी यांचे प्रशिक्षण दिले जात आहे.

याचा फायदा असा की प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांची कौशल्ये वाढण्यास मदत होईल. ज्यामुळे भारतातील वेगाने वाढणार्‍या ई-कॉमर्स उद्योगात लोकांना नोकरी मिळण्यास मदत होईल आणि त्यांचे भविष्य सुधारेल.

सोर्स : NEWS 18 लोकमत


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
 1. Sandesh patil says

  महिलांसाठी जॉब फॅशन डीसाइनिंग असेल तर

 2. Dipak says

  i want job sir & mam please

 3. Dipak says

  i want job

 4. Pote Santosh says

  मला जांब हवा आहे

 5. Om Kailas Gaywal says

  Super Flipkart company

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड