पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागातील फायरमन रेस्क्युअर पदासाठी घेतलेल्या भरती प्रक्रियेतून पात्र उमेदवारांची यादी अखेर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तब्बल १५० जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती.

ऑनलाइन व मैदानी चाचणीनंतर निर्णय
सुमारे सात महिन्यांपूर्वी ऑनलाइन परीक्षा आणि दोन महिन्यांपूर्वी मैदानी चाचणी पार पडली होती. अखेर महापालिकेने ही यादी अधिकृतपणे जाहीर केली असून, संकेतस्थळावर ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये अपात्र उमेदवारांच्या बाजूस अपात्रतेची कारणेही नमूद करण्यात आली आहेत.
अधिकाऱ्यांची कमतरता आणि भरतीची गरज
अग्निशामक दलात अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत असल्याने, वाढत्या शहराच्या गरजेनुसार महापालिकेने ही भरती प्रक्रिया राबवली. मागील वर्षीच १५० फायरमन पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
१५० जागांसाठी १५०० अर्जदार
या भरती प्रक्रियेसाठी तब्बल १५०० अर्ज प्राप्त झाले होते. २९ ऑगस्ट २०२४ रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये ८९५ उमेदवारांनी पात्रता मिळवली. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणि पोलिस आयुक्तालयाकडून चाचणीस नकार मिळाल्यामुळे भरती प्रक्रिया काही काळ ठप्प झाली होती.
शारीरिक चाचणीतून पात्रता निश्चित
२२ ते २४ जानेवारीदरम्यान संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, भोसरी येथे १०० गुणांची मैदानी शारीरिक चाचणी घेण्यात आली. यामध्ये ६४३ उमेदवारांनी यशस्वी कामगिरी करत अंतिम पात्र यादीत स्थान मिळवले.
कागदपत्र तपासणी व अंतिम टप्पा
शारीरिक चाचणीनंतर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी सामान्य प्रशासन विभागाने केली. यानंतर १५ दिवसांत अंतिम यादी जाहीर होणार होती. मात्र, आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणारी निवड समितीची बैठक रखडल्याने यादी जाहीर होण्यास विलंब झाला.
अखेर यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध
अखेर निवड समितीची बैठक पार पडल्यावर, सामान्य प्रशासन विभागाने पात्र उमेदवारांची अंतिम यादी व प्रतीक्षा यादी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
लवकरच उमेदवारांना नियुक्ती
“फायरमन भरतीमधील पात्र उमेदवार व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना अग्निशामक दलात लवकरच रुजू करून घेण्यात येणार आहे.”
– विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















