जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम पुन्हा सुरु; अकाऊंट होत होते आपाओप लॉगआऊट – Facebook Instagram Down
Facebook Instagram Down
जगभरातील फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन झालं आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम युजरचे अकाउंट आपाओप लॉगआऊट होत आहेत. यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम युजर बुचकाळ्यात पडले आहेत. जगभरातील फेसुबक, इन्टाग्राम युजरचे अकाऊंट आपोआप लॉगआऊट होत आहेत. फेसबुक आणि इन्टाग्राम अकाऊंट अचानक लॉगआऊट झाल्याने युजर्सचा गोंधळ उडाला आहे. फेसबुक सुरु केल्यानंतर युजर्संना मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड मेसेज आला. त्यानंतर फेसबुक अकाऊंट लॉगआऊट झाले आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
फेसबुक पुन्हा एकदा लॉगइन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पासवर्ड नाकरला जात आहेत. तुम्ही फेसबुकच्या होम पेजवर गेल्यावर फेसबुक तुम्हाला आपोआप बाहेर काढत आहे. फेसबुक पुन्हा एकदा लॉगइन करण्याता प्रयत्न केला तर एरर मेसेज येत आहे. त्यानंतर पुन्हा प्रयत्न केल्यानंतर तुमची क्रेडेन्शियल्स नाकारली जात आहे. दुसरीकडे इन्स्टाग्रामवरही त्याचप्रकारचा मेसेज येत आहे. त्यामुळे पासवर्ड बदलण्याची गरज नाही. कारण जगभरातील इन्स्टाग्राम आणि फेसबुक सेवा विस्कळीत झाली आहे. याबाबत लवकरच फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडून अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.