JOIN Telegram

Pashusavardhan Bharti Syllabus PDF – नवीन अपडेटेड पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षेचा सिलॅबस

Pashusavardhan Bharti Syllabus in Marathi

Pashusavardhan Bharti Syllabus PDF: A detailed Syllabus of AHD Online examination is Given Here.  There will be multiple choice questions (i.e. MCQ in Written Exam of Pashusavrdhan Vibhag) in English & Marathi language. Each question carries 1 mark. Pashusavardhan Bharti Syllabus for Various Posts examinations with complete details are as given below. The various topics in the syllabus is given in the following link. Interested applicants who applied for the AHD Recruitment examinations can check the AHD examinations syllabus by using following link.

AHD Maharashtra Syllabus | Pashusavardhan Bharti Syllabus PDF

AHD Maharashtra Syllabus – Maharashtra Pashusanvardhan Vibhag started the recruitment process for various posts for filling up the large no. of vacancies in AHD. For recruitment to these posts AHD recruitment examinations will be conduct. Selection of the eligible applicants for AHD will be from the Online examination. You can go through the AHD Maharashtra Syllabus 2023 from following sections also download the AHD Maharashtra Syllabus PDF from respective links given. For more updates about AHD Maharashtra Bharti keep visiting MahaBharti Exam. & yeas Also we covered ahd maharashtra syllabus in marathi !!

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग ने मोठ्या संख्येच्या जागा भरण्यासाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली. AHD मध्ये या पदांच्या भरतीसाठी AHD भरती परीक्षा घेतली जाईल. AHD साठी पात्र अर्जदारांची निवड ऑनलाइन परीक्षेतून होईल. पशुवर्धन भरती अभ्यासक्रम PDF २०२३ AHD ऑनलाइन परीक्षेचा तपशीलवार अभ्यासक्रम येथे दिला आहे. इंग्रजी आणि मराठी भाषेत बहुपर्यायी प्रश्न (म्हणजे पशुसंवर्धन विभागाच्या लेखी परीक्षेतील MCQ) असतील. प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो. विविध पदांच्या परीक्षांसाठी पशुवर्धन भरती अभ्यासक्रम संपूर्ण तपशीलांसह खाली दिलेला आहे. अभ्यासक्रमातील विविध विषय पुढील लिंकवर दिले आहेत. AHDभरती परीक्षांसाठी अर्ज केलेले इच्छुक अर्जदार खालील लिंक वापरून AHD परीक्षांचा अभ्यासक्रम तपासू शकतात. परीक्षेकरिता अर्ज कसा करावा सविस्तर सूचना व कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया येथे जाणून घ्या 

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Maharashtra Pashusanvardhan Vibhag Selection Process 2023

निवडप्रक्रिया – Selection Process For Pashusandhan Vibhag Exam 2023

१. जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रते विषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
२. सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच तरतुदीनुसार राबविण्यात येईल :-
i. पदुम विभाग, पशुधन पर्यवेक्षक ( सेवा प्रवेश) नियम २०१३, दिनांक :- १०/०९/२०१३
ii. पदुम विभाग, वरिष्ठ लिपीक (सेवा प्रवेश) नियम, १९८२ दिनांक- ०७/०८/१९९०
iii. पदुम विभाग, लघुलेखक (उच्च श्रेणी / निम्न श्रेणी) (सेवा प्रवेश) नियम, १९९७ दिनांक- २४/०६/१९९७
iv. पदुम विभाग, प्रयोगशाळा तंत्रज्ञ / प्रयोगशाळा सहायक / वरिष्ठ बाष्पक परिचर / बाष्पक परिचर / प्रशितन यांत्रिकी/वीजतंत्री नि मिस्त्री / तारतंत्री/यांत्रिकी / सुतार ( सेवा प्रवेश) नियम, १९८४ दिनांक – १४/०६/१९८४ तथा बाष्पक परिचर नियम २०११.

निवडीची पद्धत :-

१. सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातुन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल.
२. संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
३. संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील.
४. ज्या पदांसाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवुन एकुण २०० गुणांची असेल. परिक्षा कालावधी दोन तासांचा राहील.
५. ज्या पदांसाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी ३० गुण ठेवुन एकुण १२० गुणांची असेल. तसेच शारीरिक चाचणी / व्यावसायिक चाचणी ८० गुणांची राहील, त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील.

Pashusavardhan Bharti  Exam Pattern 2023

Pashusavardhan Bharti Syllabus in Marathi

पशुधन पर्यवेक्षक, तारतंत्री, यांत्रिकी, बाष्पक परिचर या पदांकरीता परीक्षेचे स्वरूप – Pattern of Examination for the posts of Livestock Supervisor, Wiring, Mechanical, Steam Attendant

Subject Name No of Questions Max Marks Medium Level Time
मराठी 15 30 मराठी 10 वी 120 Min
इंग्रजी 15 30 इंग्रजी 10 वी
सामान्य ज्ञान 15 30 मराठी 10 वी
व्यावसायिक ज्ञान 40 80 मराठी 10 वी
सामान्य अभिक्षमता 15 30 मराठी 10 वी
Total Marks 100 200

ग्रुप-सी (अराजपत्रित) प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरता परीक्षेचे स्वरूप – Pattern of Examination for the post of Group-C (Non-Gazetted) Laboratory Technician

Subject Name No of Questions Max Marks Medium Level Time
मराठी 15 30 मराठी 12 वी 120 Min
इंग्रजी 15 30 इंग्रजी 12 वी
सामान्य ज्ञान 15 30 मराठी पदवी
व्यावसायिक ज्ञान 40 80 मराठी पदवी
सामान्य अभिक्षमता 15 30 मराठी पदवी
Total Marks 100 200

ग्रुप-सी (अराजपत्रित) वरिष्ठ लिपीक / लघुलेखक उच्च श्रेणी / लघुलेखक निम्न श्रेणी या पदांकरीता परीक्षेचे स्वरूप – Pattern of Examination for the post of Group-C (Non-Gazetted) Senior Clerk / Stenographer High Grade / Stenographer Lower Grade

Subject Name No of Questions Max Marks Medium Level Time
मराठी 25 50 मराठी 12 वी 120 Min
इंग्रजी 25 50 इंग्रजी 12 वी
सामान्य ज्ञान 25 50 मराठी पदवी
सामान्य अभिक्षमता 25 50 मराठी पदवी
Total Marks 100 200

Pashusanvardhan Vibhag Selection Criteria 2023

गुण पद्धती :- खालील पद्धतीचा अवलंब करून ऑनलाईन परीक्षेचे गुण ठरविले जातात:

  • वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये प्रत्येक उमेदवाराने अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात घेतले जातील.
  • परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेण्यात आलेली असल्यास वरीलप्रमाणे उमेदवाराने संपादित केलेले अंतिम गुण विविध सत्रांमधील वापरल्या जाणाऱ्या चाचणीमधील अडचण पातळी विचारात घेऊन विविध सत्रांमधील गुण समायोजित करून समतुल्य करण्यात येतील.
  • निवडीचे निकष : जाहिरातीत नमूद विविध पदांवरील नियुक्त्या या सदरच्या परीक्षेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करून करण्यात येतील. परीक्षेद्वारे निवडीसाठी आवश्यक किमान गुण व परीक्षेमध्ये उमेदवारांना समान गुण मिळाल्यास गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ, दिनांक ४ मे, २०२२ मधील तरतुदीनुसार राहील.

Maharashtra Pashusanvardhan Vibhag Syllabus 2023

Maharashtra Pashusanvardhan Vibhag Syllabus 2023

AHD Laboratory Technician Syllabus 2023

For All Posts 👉 Download Pashusavardhan Bharti Syllabus PDF 

परीक्षेबाबतच्या सर्वसाधारण सूचना | Important Instrcution For AHD Maharashtra Exam 2023

१३.२.१ उमेदवारांना नेमून दिलेले परीक्षा केंद्र व त्याचा पत्ता प्रवेश पत्रात नमूद करण्यात येईल. संबंधित परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.
१३.२.२ उमेदवाराने एकदा केलेली परीक्षा केंद्राची निवड अंतिम असेल. परीक्षेचे केंद्र/स्थळ / तारीख / वेळ / सत्र बदलण्याची कोणतीही विनंती कोणत्याही परिस्थिती मध्ये (वैद्यकीय किंवा इतर कारणांसाठी) स्वीकारली जाणार नाही. उमेदवाराने त्याची प्रवासाची व्यवस्था त्यानुसार आधीच ठरवावी.
१३.२.३ कोणतेही परीक्षा केंद्र रद्द करणे आणि / किंवा परीक्षा केंद्र वाढविणे याचे अधिकार विभाग स्वतःकडे राखून ठेवीत आहे.
१३.२.४ उमेदवाराला त्याने / तिने निवडलेल्या केंद्रा व्यतिरिक्त इतर कोणतेही केंद्र वाटप करण्याचा अधिकार विभाग स्वतः कडे राखून ठेवीत आहे.
१३.२.५ उमेदवाराने परीक्षा केंद्रावर स्वतःच्या जोखमीवर आणि स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यास कोणताही प्रवास खर्च वा भत्ता दिला जाणार नाही किंवा उमेदवारास कोणत्याही स्वरूपाच्या इजा किंवा नुकसानीसाठी विभाग जबाबदार राहणार नाही.
१३.२.६ उमेदवारांनी एखाद्या विशिष्ट परीक्षा केंद्राची पुरेशा संख्येने निवड केलेली नसल्यास किंवा एखाद्या केंद्राची निवड त्या केंद्राच्या उपलब्ध क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारांनी केलेली असल्यास उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी इतर कोणतेही संलग्न केंद्र वाटप करण्याचा अधिकार विभागास राहील.
१३.२.७ उमेदवाराने भरणा केलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीमध्ये ( अनेकदा अर्ज करणे, अर्ज चुकणे, काही कारणास्तव परीक्षेस बसू न शकणे, इत्यादी अशा कारणांसाठी) परत केले जाणार नाही.

🎯Download Maharashtra AHD Syllabus 2023

Table of Contents


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड