New Changes in MPSC Exam Pattern – सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू होणार

MPSC New Sylllabus Update

New Changes in MPSC Exam Pattern : MPSC students across the state had started protesting against the decision to change the MPSC syllabus from 2023. Finally, their agitation has been successful. Finally, the commission has given relief to the students by taking a big decision.

💥MPSC New Syllabus And Exam Pattern PDF

MPSC 2023 पदभरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर-भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. ‘राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे’ असे एमपीएससीने ट्वीटमध्ये म्हटले आहे

💥MPSC Rajyaseva Syllabus 2023 – मागणी मान्य | राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बदलेला अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार…

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरोधात पुण्याणध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. अखेर त्यांच्या या आंदोलनाला यश मिळालं आहे. विद्यार्थी आंदोलकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील भेट दिली होती.

शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लोकसेवा आयोग आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांची बैठक घेण्याचे आव्हान केले होते. ही बैठक आज नियोजित होती. मात्र बैठक न घेताच आयोगाने आज विद्यार्थ्यांच्या बाजुने निर्णय दिला आहे.


 

 

New Changes in MPSC Exam

पॅटर्न बदल मुळे उमेदवारांसाठी संधींमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ

New Changes in MPSC Exam Pattern – There is many opportunity for candidates in MOSC Exam due to changes in Exam Pattern. Also Due to the current decision of the Commission, the opportunities for the candidates will increase significantly. One common pre-examination for all gazetted cadres and one for non-gazetted cadres means an opportunity to qualify different main examinations in one study, with less effort.

राज्य लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. हे बदल सन २०२३ करिता आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येतील असे आयोगाने जाहीर केले आहे. आयोगाकडून वेळोवेळी अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत, गुणांकन, प्रश्नप्रकार अशा बाबतीत कालानुरुप बदल करण्यात येतात. या बदलांचे कधी स्वागत होते तर कधी नाराजीचे सूर उमटतात. काही वेळा उमेदवारांकडून आयोगाबाबत काही अपेक्षाही व्यक्त केल्या जातात. अधिक माहिती खाली वाचा तसेच For Free MPSC Mock Test Series Click Here

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Due to the current decision of the Commission, the opportunities for the candidates will increase significantly. One common pre-examination for all gazetted cadres and one for non-gazetted cadres means an opportunity to qualify different main examinations in one study, with less effort. In the examination for gazetted posts, 33 cadre posts of State Service and minimum 35 posts in technical services if eligible for technical services will be passed through a single pre-examination. The format of main examination is also same for all cadres of non-gazetted services. Therefore, once the study is completed, the main examination for a total of nine posts can be given.

२०२१ मध्ये आयोगाकडून वेगवेगळय़ा प्रवर्गातील उमेदवारांना कमाल किती वेळा संधी घेता येईल आणि या संधी कशा प्रकारे मोजल्या जातील याबाबतची घोषणा करण्यात आली तेव्हा संधींची मर्यादा आखण्याचे वढरउ चे धोरण तर आयोगाने स्वीकारले, पण मग याच धर्तीवर पूर्व परीक्षेतील सी सॅट पेपर क्वॉलिफाइंग स्वरूपाचा करण्याबाबत निर्णयही आयोगाने घ्यावा, परीक्षाही वेळच्या वेळी नियमितपणे घ्याव्यात, भरतीसाठी भरपूर पदेही उपलब्ध करून द्यावीत असा सूर उमटू लागला. यातील बऱ्याच अपेक्षा आयोगाकडून पूर्ण होताना दिसत आहेत. संधींची मर्यादा घालून देणारा निर्णय आयोगाने नंतर मागे घेतला आहे. आयोगाने वढरउच्या धर्तीवर सीसॅट पेपर क्वॉलिफाइंग स्वरूपाचा करण्याच्या निर्णयाची घोषणा केलेली आहे आणि त्याचे सर्वच उमेदवरांकडून जोरदार स्वागतही झाले आहे.

सध्याच्या आयोगाच्या निर्णयामुळे उमेदवारांसाठी संधींमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होणार आहे. सर्व राजपत्रित संवर्गासाठी एक आणि अराजपत्रित संवर्गासाठी एक सामायिक पूर्व परीक्षा म्हणजे कमी कष्टात, एका अभ्यासामध्ये वेगवेगळय़ा मुख्य परीक्षांसाठी पात्र ठरण्याची संधी. राजपत्रित पदांसाठीच्या परीक्षेमध्ये राज्य सेवेची ३३ संवर्गातील पदे आणि तांत्रिक सेवांसाठीची पात्रता असल्यास तांत्रिक सेवांमधील पदे अशा किमान ३५ पदांसाठी एकाच पूर्व परीक्षेतून पहिला टप्पा पार पडेल. अराजपत्रित सेवांच्या सर्व संवर्गासाठीच्या मुख्य परीक्षेचे स्वरूपही एकसारखेच आहे. त्यामुळे एका वेळी अभ्यास झाला की एकूण नऊ पदांसाठीची मुख्य परीक्षाही देता येणार आहे.

तांत्रिक सेवांसाठी होणाऱ्या पूर्व परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम आधी वेगवेगळा होता. त्यामुळे या सेवांच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना पूर्व परीक्षेसाठी जास्तीची तयारी करावी लागणार आहे. पण त्याबरोबर जास्तीची ३३ पदेही त्यांच्यासाठी त्याच अभ्यासामुळे उपलब्ध होणार आहेत. मुख्य परीक्षा आधीप्रमाणेच होणार असल्यामुळे आणि अभ्यासक्रम तांत्रिक मुद्यांवर भर देणारा असल्यामुळे कमी कष्टात तांत्रिक सेवेची तयारी होईलच. त्याच बरोबर राज्य सेवा मुख्य परीक्षेची तयारी केली तर वढरउ ची पण तयारी होऊ शकणार आहे. केंद्रीय नागरी सेवेच्या पदांच्या रुपात संधींचे नवे दालन उघडणार आहे.

२०१२ मध्ये मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरुपाची करण्यात आली तर सन २०१३ मध्ये पूर्व परीक्षेत सीसॅट पेपर समाविष्ट करण्यात आला. मागील वर्षी राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप वर्णनात्मक करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१३ पासून सुरू झालेले आयोगाच्या परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रमातील बदल हे टप्प्याटप्प्याने विकसित होत आता एका सुटसुटीत पॅटर्नवर स्थिरावले आहेत असे दिसते. घेतलेले निर्णय, त्यांचे प्रशासकीय आणि उमेदवारांवर होणारे परिणाम या सगळय़ा बाबींचा आढावा घेत व्यवहार्य तोडगे काढत हे बदल करण्यात येतात. आयोग वेळोवेळी काल सुसंगत ठरतील असे निर्णय घेत आलेला आहे आणि घेत राहील. त्याबाबत वस्तुनिष्ठ व व्यावहारीकदृष्टय़ा विचार करणे आवश्यक आहे. आयोगानेच प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे या नव्या पद्धतीमुळे उमेदवारांवरचा अतिरिक्त ताण कमी होणे हा या बदलांचा हेतू नक्कीच साध्य होणार आहे. एक तर सुटसुटीतपणे एकूण मिळून दोनच पूर्व परीक्षा दिल्या की आपापल्या पसंतीच्या पदांच्या मुख्य परीक्षेची तयारी करता येणार आहे. प्रत्येक पदासाठी/ सेवेसाठी वेगळी पूर्व परीक्षा, वेगळी मुख्य परीक्षा, प्रत्येक परीक्षेचा वेगळा अभ्यासक्रम हा ताण खूप मोठय़ा प्रमाणात हलका होणार आहे.


New Changes in MPSC Exam Pattern

New Changes in MPSC Exam Pattern – Some state public service commissions across the country, many universities are evaluating traditional format answer sheets using digital evaluation method. If this method is not accepted by the MPSC, it will become difficult to declare the results of the MPSC examinations in time and accurately. Therefore,  has decided to adopt digital assessment method in order to make effective use of technology for the benefit of the candidates. Further information about New Changes in MPSC Exam Pattern is as given below

MPSC Combine Exam Pattern Change 2023

गट-ब व गट-क मुख्य परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम

  • सगळे कायदे PSI Law, Exise Law, Industry Law, .Subregister Law, अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे.
  • पुस्तकपालन व लेखाकर्म वगळण्यात आला आहे.
  • इतिहास हा विषय वगळण्यात आला आहे.
  • मराठी व इंग्रजी विषय समान पातळीवर आणण्यात आला आहे.
  • पर्यावरण विषय समाविष्ट करण्यात आला आहे.
  • विज्ञान व तंत्रज्ञान चा समावेश केला आहे.
  • पहिल्या पेपट मधील RTI व लोकसेवा हक्क अधिनियम दुसऱ्या पेपर मध्ये टाकला आहे.
  •  चालू घडामोडी चा समावेश आहे.
  • अर्थशास्त्र विषयाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

स्पर्धा परीक्षा उत्तरपुस्तिकांचे आता डिजिटल मूल्यांकन वेगवान आणि अचूक निकालासाठी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षांच्या पारंपरिक पद्धतीच्या उत्तरपुस्तिकांचे डिजिटल पद्धतीने मूल्यांकन करण्यात येणार आहे. उत्तरपुस्तिकांचे डिजिटल मूल्यांकनासाठी एमपीएससीकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या निविदा प्रक्रियेतून पात्र कंपनीची निवड करून आधुनिक डिजिटल मूल्यांकनाची पद्धती डिजिटल मूल्यांकन पद्धतीमध्ये प्रक्रिया पूर्ण करून ही पद्धती अमलात अवलंबण्यात येईल

New Changes in MPSC Exam Pattern

 


२०२३ मध्ये होणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी

New Changes in MPSC Exam Pattern : MPSC candidates have demanded that the Maharashtra Public Service Commission (MPSC) immediately announce the syllabus of the examination to be held in April for Group-B and Group-C cadre posts. Candidates have argued that students will get time to prepare only if the syllabus is announced early.

MPSC announced the probable schedule of competitive exams to be held on 28 September 2023. The preliminary examination for Group B and Group C posts will be held in April 2023. The recruitment advertisements will be released in the month of January.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गट-ब आणि गट-क संवर्गाच्या पदांसाठी एप्रिलमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम तातडीने जाहीर करण्याची मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. अभ्यासक्रम लवकर जाहीर झाला तरच विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ मिळेल, अशी भूमिका उमेदवारांनी मांडली आहे.

एमपीएससीने २८ सप्टेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक घोषित केले. त्यात गट ब आणि गट क या पदांसाठीची पूर्व परीक्षा एप्रिल २०२३ मध्ये होणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.

पुन्हा तीनच सदस्य…..

एमपीएससीमध्ये सध्या चार सदस्य आहेत. त्यापैकी एक सदस्याचा कार्यकाल ऑक्टोबरच्या अखेरीस सपत असल्याने पुन्हा एमपीएससी महिन्याच्या शेवटी निवृत्त होत आहेत. त्यामुळे एमपीएससीत पुन्हा तीनच सदस्य राहणार आहेत. एमपीएससीचे कामकाज गतिमान होण्यासाठी उर्वरित तीन सदस्याची नेमणूक सरकारने तातडीने करण्याची मागणीही करण्यात आली

 बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार या परीक्षा होणार असल्याने एमपीएससीकडून या परीक्षांसाठीचा नियोजित अभ्यासक्रम जाहीर करणे अपेक्षित आहे. परंतु, अद्याप अभ्यासक्रम जाहीर झालेला नसल्याने त्यामुळे अभ्यासक्रम जाहीर कधी होणार, परीक्षेची तयारी कशी करणार असे प्रश्न उमेदवारांच्या मनात आहेत. एमपीएससी स्टुडंट्स राइटचे महेश बडे म्हणाले, की परीक्षा पद्धत बदलणार असल्याने एप्रिल आहे.

२०२३ मध्ये होणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी आयोगाकडे केली आहे. उमेदवारांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळण्यासाठी अभ्यासक्रम जाहीर होणे आवश्यक आहे. तसेच एमपीएससी सदस्यांची नियुक्ती, मुख्यालयाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणीही एमपीएससी, मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली


New Changes in MPSC Exam : Another Big Update For MPSC Preparing candidates ! Maharashtra Public Service Commission has decided to make the optional examination descriptive. Its been very destructive for MPSC Students. Because Students who have been preparing for optional exams for the last five to six years will not be able to turn to descriptive exams. Due to this, the concerned students will be directly thrown out of the exams. Therefore, it is necessary to give at least two years of opportunity to the concerned students. UPSC students will take advantage of this now. Therefore, the struggle of competitive examinees will increase. Know details about New Changes in MPSC Exam

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैकल्पिक असलेली परीक्षा वर्णनात्मक करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • UPSC aspirants will turn to MPSC as they know about Descriptive Exam
  • The practice of alternative examinations adds to the difficulty of the MPSC examinees
  • It will take two to three years to understand the exam pattern

त्याचा फटका एमपीएससी स्पर्धा परीक्षार्थींना बसणार आहे. तर यूपीएससी स्पर्धा परीक्षार्थींना अगोदरच वर्णनात्मक परीक्षांचा अनुभव असल्यामुळे ते विद्यार्थी एमपीएससी परीक्षा देतील. परिणामी एमपीएससी करणार्‍या विद्यार्थ्यांपेक्षा यूपीएससी करणारे विद्यार्थी सनदी नोकरी मिळवतील. यातून जिवघेणी स्पर्धा आणखी तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दहा वर्षांपूर्वीही राज्यसेवेचा अभ्यासक्रम हा वर्णनात्मक स्वरूपाचा होता. या परीक्षा पद्धतीमध्ये लिखाणाला असाधारण महत्त्व असते. त्याचबरोबर अभ्यासक्रमाचीही व्याप्ती असते. हा व्यापक अभ्यास करताना प्रत्यक्ष कामाच्या वेळी आवश्यक आकलन क्षमता, बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता, विश्लेषण क्षमता, विषयाची समज आणि कार्यवाही, विचारांची स्पष्टता, संभाषण कौशल्य, बुद्धिमत्तेची प्रगल्भता या सर्व गुणांचा कस लागत होता. मात्र, 2011-12 साली परीक्षा बहुपर्यायी झाल्या.

मात्र आता पुन्हा राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची होणार आहे. या परीक्षांचे स्वरूप समजायला परीक्षार्थींना दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यातच यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यासक्रम समान पातळीवर आल्यामुळे सध्या यूपीएससी देत असलेल्या विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि यूपीएससी अशा दोन संधी मिळणार आहेत. तर पुढील काळात एमपीएससी करणारेदेखील यूपीएससी परीक्षा देतील. यामुळे जीवघेणी स्पर्धा होणार आहे.

वर्णनात्मक परीक्षेची माहिती असल्यामुळे यूपीएससी करणारे एमपीएससीकडे वळणार
वैकल्पिक परीक्षांचा सराव असल्यामुळे एमपीएससी परीक्षा देणार्‍यांच्या अडचणीत भर
परीक्षा स्वरूप समजून घेण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार

अशी आहे नवी परीक्षा योजना -MPSC descriptive Exam Pattern

परीक्षेचे स्वरूप : वर्णनात्मक
एकूण पेपर – नऊ
अर्हताकारी पेपर
1. भाषा पेपर 1 – मराठी – 300 गुण
2. भाषा पेपर 2 – इंग्रजी – 300 गुण

गुणवत्ता यादीकरिता विचारात घ्यावयाचे पेपर -Merit List For Descriptive MPSC Paper

1. निबंध (मराठी किंवा इंग्रजी माध्यम) – 250 गुण
2. सामान्य अध्ययन – 1 – 250 गुण
3. सामान्य अध्ययन – 2 – 250 गुण
4. सामान्य अध्ययन – 3 – 250 गुण
5. सामान्य अध्ययन – 4 – 250 गुण
6. वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 1 – 250 गुण
7. वैकल्पिक विषय पेपर
क्रमांक 2 – 250 गुण
एकूण गुण – 1750
मुलाखत – 275 गुण
एकूण गुण – 2025


New Changes in MPSC Exam Pattern – Every political party had promised to conduct class III clerical recruitment through MPSC; But there was no decision. Statements were given for this demand, agitations were done. Now the decision taken by the state government will make the clerk recruitment process transparent. Recruitment process for various posts of state government is implemented through MPSC. However, it was decided to conduct the recruitment of Class III and Class IV posts outside the working class of MPSC through private companies. In the last few years, due to malpractices in the recruitment process conducted by private companies, dissatisfaction had arisen among the candidates. Therefore, the candidates across the state were demanding that the recruitment process of all the posts be implemented through MPSC. For this, protests were also held along with giving statements to the government and people’s representatives. Against this backdrop, in the Cabinet meeting held on Wednesday, it was decided to implement the recruitment process for class three clerical posts through MPSC. This decision will benefit lakhs of candidates across the state.

राज्य शासनाने वर्ग तीनमधील लिपिक पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवण्याचा निर्णय घेतला. बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, हा निर्णय राज्यातील लाखो उमेदवारांसाठी आनंददायी आहे. एमपीएससीमार्फत राज्य शासनाच्या विविध पदांची भरती प्रक्रिया राबवली जाते. मात्र वर्ग तीन आणि वर्ग चारमधील पदांची भरती खासगी कंपन्यांमार्फत राबवण्याचा निर्णय झाला. गेल्या काही काळात खासगी कंपन्यांमार्फत राबवलेल्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याने उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे सर्वच पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबवण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून करण्यात येत होती. त्याबाबत शासनाला, लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यासह आंदोलनेही झाली. या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत वर्ग तीनमधील लिपिक पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली.

 


New Changes in MPSC Exam Pattern – The commission has decided to conduct the screening test for J.No.12/2022 Livestock Development Officer, J.No.16/2022 Assistant Commissioner Animal Husbandry and J.No.38/2022 Assistant Chemical Analyst. A notification in this regard has been published on the Commission’s website.

जा.क्र.12/2022 पशुधन विकास अधिकारी, जा.क्र.16/2022 सहायक आयुक्त पशुसंवर्धन व जा.क्र.38/2022 सहायक रासायनिक विश्लेषक यांकरीता चाळणी परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

New Changes in MPSC Exam Pattern

 


New Changes in MPSC Exam Patter – Change in the prevailing procedure of opting out of the recruitment process has been done recently by MPSC. In this Notification, MPSC Announced that General Merit List Will be published  and 7 days period will be given to candidates. More details regarding New MPSC opting out Recruitment Process can be seen below

New MPSC opting out Recruitment Process

New Changes in MPSC Exam Patter

भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting out) प्रचलित कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


New Changes in MPSC Exam Pattern – Due to the existing ‘recruitment process’ for various cadres in the Government Service through the Maharashtra Public Service Commission, increased number of examinations, stress on candidates and administrative system, delay in the recruitment process, continuous efforts to maintain quality, various measures to be taken using advanced technology, planning of future recruitment process and others. Considering the ancillary matters, the Commission has decided to make the following amendments in the method of various competitive examinations organized by the Commission. Check MPSC New Pattern 2023, MPSC New Changes in Exam, Group A and Group B Changes in MPSC, New Changes in MPSC Exam Pattern at below

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Maharashtra Public Service Commission (MPSC) has taken a very important decision regarding the examinations. The Maharashtra Public Service Commission has announced that the joint pre-examination for Group A and Group B posts will be held together. This combined examination will be conducted for a total of eight posts. This change will be implemented for exams from 2023 onwards. This decision will reduce the pressure on the Maharashtra Public Service Commission. Two days ago, the Maharashtra Public Service Commission has decided to monitor the examination through CCTV cameras to prevent paper leakage. A separate examination system is going to be prepared by the name of joint preliminary examination. Know New Changes in MPSC Exam Pattern below

New Changes in MPSC Exam Pattern

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयोगाने सदर परीक्षा पद्धती ही 2023 पासून लागू होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या बदलांच्या अनुषंगाने संबंधित परीक्षांची परीक्षा योजना, अर्ज स्वीकारण्याची पद्धत, अहर्ता, वयोमर्यादा, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, अभ्यासक्रम इत्यादीबाबत सविस्तर तपशील आयोगाच्या वेबसाईटवर स्वतंत्रपण प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Changes in MPSC Exam Pattern 2023 – काय आहेत प्रमुख सुधारणा?

  • सर्व गट अ आणि गट ब संवर्गाकरीता यापुढे वर्णनात्मक स्वरुपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवडप्रक्रिया राबवण्यात येईल.
  • गट अ आणि गट ब संवर्गाकरीता एकच पूर्व परीक्षा घेण्यात येईल.
  • उमेदवारांकडून सर्व संवर्गासाठी विकल्प हो किंवा नाही या पद्धतीने भरून घेण्यात येईल. त्याच आधारे प्रत्येक पूर्व परीक्षेसाठी स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.
  • संयुक्त पूर्व परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरीता संबंधित संवर्गासाठी म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषी सेवा मुख्य परीक्षा इत्यादी परीक्षांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प ठेवण्यात येईल. त्यानंतर संबंधित संवर्गासाठी निवडप्रक्रिया राबवण्यात येईल. 2023 पासून MPSC मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणींची गुणमर्यादा 60 वरून 70 गुणांवर – MPSC New Pattern 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरतीसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूढे पीएसआय पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक चाचणीत 70 गुण आवश्यक आहेत. यापूर्वी ही मर्यादा 60 गुणांची होती. मात्र, आता पीएसआय भरतीमध्ये पुर्व परीक्षा, मुख्य परीक्षेतील गुणांसह, शारीरिक चाचणीत 70 गुण असतील तरच उमेदवार पुढील मुलाखतीस पात्र ठरणार आहे

MPSC 2022 Exam Pattern Changes

Is MPSC syllabus changed in 2022?

Maharashtra Public Service Commission (MPSC) has taken a very important decision regarding the examinations. The Maharashtra Public Service Commission has announced that the joint pre-examination for Group A and Group B posts will be held together. This combined examination will be conducted for a total of eight posts. This change will be implemented for exams from 2023 onwards.

2 thoughts on “New Changes in MPSC Exam Pattern – सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू होणार”

Leave a Comment