MPSC PSI Physical Exam Revised Criteria 2024
MPSC PSI Physical Exam Revised Criteria 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीमध्ये अर्हताप्राप्त होण्याकरीता गुणांच्या टक्केवारीची मर्यादा तसेच महिला, तृतीयपंथी महिला व तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीकरीता लांब उडीची मानके/निकष सुधारित करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीकरीता अर्हताकारी गुणांची टक्केवारी तसेच महिला, तृतीयपंथी महिला व तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीची सुधारित मानके खालीलप्रमाणे विहित करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत.. तसेच जर आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरतीची तयारी करत असाल, तर या लिंक वरून आपण मोफत रजिस्टर करून रोज नवीन सराव पेपर्स सोडवू शकता. या सर्व टेस्ट सिरीज महाभरती वर मोफत/talathi bharti question paper उपलब्ध आहेत.
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
- शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होऊन मुलाखतीस पात्र होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण (म्हणजे ६० गुण) आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही.
- पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणा-या स्पर्धा परीक्षेतील महिला, तृतीयपंथी महिला व तृतीयपंथी उमेदवारांकरीता शारीरिक चाचणीसाठी धावणे, लांब उडी व गोळा फेक असे तीन प्रकार आहेत. त्यातील लांब उडीचे अंतर व गुण आयोगामार्फत खालीलप्रमाणे सुधारित करण्यात आले आहे. लांब उडी – उमेदवारास धावत येऊन लांब उडी मारावी लागेल व त्यास खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील :-
PSI MPSC Revised Physical Criteria
उमेदवारास फक्त एकच उडी मारण्याची परवानगी राहील. उडी मारताना अपघात झाल्यास किंवा चूक, म्हणजे उडी मारण्याच्या रेषेवर किंवा रेषेपलीकडे पहिले पाऊल टाकल्यास उमेदवारास एक जादा संधी देण्यात येईल व त्यासाठी गुण कमी केले जाणार नाहीत. जादा संधीचा फायदा घेताना पुन्हा चूक केल्यास वा अपघात घडल्यास उमेदवारास शून्य गुण देण्यात येतील.
उपरोक्त तरतूदी सन २०२४ च्या जाहिरातीपासून पुढे होणा-या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेकरीता लागू राहतील.
Download Revised MPSC Physical Criteria 2024
>>Old Post
MPSC PSI Physical Exam Revised Criteria 2024 – The matter of changing the standards of physical test in the Sub-Inspector of Police (Chief) competitive examination conducted by the Maharashtra Public Service Commission was under the consideration of the Commission. Accordingly, the Commission has decided to prescribe revised standards of physical test in Sub-Inspector (Chief) Competitive Examination of Police as follows. Accordingly the following amendments have been made.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीच्या मानकांमध्ये बदल करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीची सुधारित मानके खालीलप्रमाणे विहित करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत…तसेच जर आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरतीची तयारी करत असाल, तर या लिंक वरून आपण मोफत रजिस्टर करून रोज नवीन सराव पेपर्स सोडवू शकता. या सर्व टेस्ट सिरीज महाभरती वर मोफत/talathi bharti question paper उपलब्ध आहेत.
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
MPSC PSI Transgender Physical criteria
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीकरिता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित करण्यात आली आहेत.
‘स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता’ आणि ‘स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता’ शारीरिक चाचणीची मानके व गुण आयोगामार्फत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.
शारीरिक चाचणीचा तपशील
स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता
१) गोळा फेक- वजन- ७.२६० कि.ग्रॅ. कमाल गुण-१५
२) पुलअप्स- कमाल गुण-२०
३) लांब उडी- कमाल गुण-१५
४) धावणे (८०० मीटर)- कमाल गुण-५०
स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता
१) गोळा फेक- वजन- ४ कि.ग्रॅ.- कमाल गुण-२०
२) धावणे (४०० मीटर) – कमाल गुण-५०
३) लांब उडी- कमाल गुण-३०
सन-२०२२ च्या परीक्षेकरिताः शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून, शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण (म्हणजे ६० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही.
सन-२०२३ च्या परीक्षेकरिताः शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून, शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ७० टक्के गुण (म्हणजे ७० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही.
तृतीयपंथी उमेदवारास त्यांची पुरुष, महिला किंवा तृतीयपंथी अशी स्वतःची लिंग ओळख निश्चित करणे आवश्यक राहील व यासंदर्भात विहित सक्षम प्राधिका-याने दिलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र शारीरिक चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. सदर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
- शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ७० टक्के गुण (म्हणजे ७० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता / अंतिम निवडीकरीता विचार होणार नाही.
- तसेच सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून, शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल.
MPSC PSI Exam New Physical Criteria 2024
शारीरिक चाचणीचा तपशील :
MPSC PSI Male Physical Exam Criteria 2024
उमेदवारास फ़क्त एकच उडी मारण्याची परवानगी राहील. उडी मारताना अपघात झाल्यास किंवा चूक, म्हणजे उडी मारण्याच्या रेषेवर किंवा रेषेपलीकडे पहिले पाऊल टाकल्यास उमेदवारास एक जादा संधी देण्यात येईल व त्यासाठी गुण कमी केले जाणार नाहीत. जादा संधीचा फायदा घेताना पुन्हा चूक केल्यास वा अपघात घडल्यास उमेदवारास शून्य गुण देण्यात येतील.
(१) वरील चाचणी प्रकारच्या सरावासाठी उमेदवारांना राज्यातील पोलीस कवायत मैदानाचा उपयोग करता येईल. तसेच त्यांना पोलीस निदेशकाची मदत देण्यात येईल. परंतु यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथील पोलीस उप आयुक्त, पोलीस मुख्यालय आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा.
(२) शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी किमान ७० टक्के गुण (म्हणजे ७० गुण) मिळणे आवश्यक आहे. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता विचार होणार नाही.
(३) सर्व शारीरिक चाचणीत एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून, शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल.
(४) उपरोक्त प्रमाणे सन २०२३ पासून आयोजित स्पर्धा परीक्षांकरीता लागू राहील.
MPSC PSI Female Physical Exam New Criteria 2024
(अ) गोळा फेकताना एक चूक क्षम्य असेल व त्यासाठी गुण कमी करण्यात येणार नाहीत.
(ब) गोळाफेकीत फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. उदा. जर गोळाफेकीचे अंतर ५ मीटर असेल तर उमेदवाराला १४ गुण देण्यात येतील.
टीप:- (१) वरील चाचणी प्रकारच्या सरावासाठी उमेदवारांना राज्यातील पोलीस कवायत मैदानाचा उपयोग करता येईल. तसेच त्यांना पोलीस निदेशकाची मदत देण्यात येईल. परंतु यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथील पोलीस उप आयुक्त, पोलीस मुख्यालय आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा.
(२) शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी किमान ७० टक्के गुण (म्हणजे ७० गुण) मिळणे आवश्यक आहे. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता विचार होणार नाही.
(3) उपरोक्त प्रमाणे सन २०२३ पासून आयोजित स्पर्धा परीक्षांकरीता लागू राहील.