JOIN Telegram

MPSC Non Gazzeted New Combine Prelims Exam Pattern And Syllabus – संयुक्त पूर्व परीक्षांचा सुधारीत पॅटर्न; ३० एप्रिल २०२३ रोजी संयुक्त पूर्व परिक्षा

MPSC Non Gazzeted New Combine Prelims Exam Pattern And Syllabus

MPSC Non Gazzeted New Combine Prelims Exam Pattern And Syllabus – Maharashtra Non Gazetted Services Combined Preliminary Examination (Group B and Group C)  new syllabus has been issued by Maharashtra Public Service Commission on its official website. As Per New Combine Prelims Exam Pattern And Syllabus, there will be 100 Marks Combine Exam and individual Mains Exam For 400 Marks. Afet successful conduction of MPSC Group B And Group C Mains Exam Physical Test and Interview will be conducted. Candidates note that if there is any wrong answer, 1/4 marks will get deducted. So solve questions Properly. For this go through MPSC Non Gazzeted New Combine Prelims Exam Pattern And Syllabus, Download MPSC Non Gazzeted New Combine Prelims Exam Pattern And Syllabus in Marathi PDF :

Combine 2023 गट ब आणी गट क प्राथमिक परीक्षा अभ्यासक्रम
|  MPSC Non Gazetted New Combine Prelims Exam Pattern And Syllabus

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा एकत्रित प्राथमिक परीक्षा (गट ब आणि गट क)  नवीन अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केला आहे. नवीन एकत्रित प्रिलिम्स परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रमानुसार, 100 गुणांची एकत्रित परीक्षा आणि 400 गुणांसाठी वैयक्तिक मुख्य परीक्षा असेल. एमपीएससी गट ब आणि गट क मुख्य परीक्षेचे यशस्वी आयोजन शारीरिक चाचणी आणि मुलाखत घेतली जाईल. उमेदवारांनी लक्षात घ्या की चुकीचे उत्तर असल्यास 1/4 गुण वजा केले जातील. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित सोडवा. यासाठी एमपीएससी नॉन गॅझेटेड नवीन एकत्रित प्रिलिम्स परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम पहा, एमपीएससी नॉन गॅझेटेड नवीन एकत्रित प्रिलिम्स परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम मराठी PDF मध्ये डाउनलोड करा. व मोफत टेस्ट सिरीज साठी येथे क्लिक करा

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्साम ची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

MPSC New Combine Prelims Exam Pattern And Syllabus

MPSC AMVI Bharti New Exam Pattern And Syllabus PDF – सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व, मुख्य परीक्षेचा पॅटर्न

गायब विषय PSI कायदे Excise कायदे Industry कायदे Sub registrar कायदे Tax assistant – book keeping इतिहास संगणक

नवीन समाविष्ट विषय भारताचा भूगोल विज्ञान सुदूर संवेदन पर्यावरण सांख्यिकी पूर्व चा तोच अभ्यासक्रम

Maharashtra Non Gazetted Services Group C Main Examination Syllabus – सुधारित अभ्यासक्रम

MPSC Non Gazetted New Combine Prelims Exam Pattern And Syllabus

Maharashtra Public Service Commission conducts recruitment process for various cadres in government service. Considering the increased number of examinations due to the present recruitment process, the stress on the candidates and the administrative system, the delay in completing the recruitment process, the selection of cadres will be taken on the basis of facilitating the planning of the future recruitment process. For this purpose, the Commission has decided to revise the pattern of various competitive examinations conducted by the Commission

वेगवेगळ्या परीक्षांसाठी आवश्यक वेगवेगळ्या गुणवत्ता राखण्यासाठी उमेदवारांना सतत करावे लागणारे प्रयत्न आणि इतर अनुषंगिक बाबींचा साकल्याने विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने आपल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे. आयोगाकडून आयोजित होणाऱ्या परीक्षांच्या पॅटर्नमध्ये झालेल्या बदलांनंतर परीक्षांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असणार आहे. राजपत्रित संवर्गांसाठी परीक्षा ■ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा’ राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील पदभरतीकरीता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त ‘पूर्व परीक्षा’ (Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination) या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ व गट ब संवर्गाकरिता यापुढे महाराष्ट्र नागरीसेवा राजपत्रित संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षेद्वारे भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.. हे बदल सन २०२३ करिता आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येतील असे आयोगाने जाहीर केले आहे.

Maharashtra Non Gazetted Services Group B Main New Syllabus 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमधील राजपत्रित आणि अराजपत्रित संवर्गातील पदांसाठी भरती करण्यात येते. सध्याच्या भरती प्रक्रियेचे नियोजन सुकर होण्याच्या दृष्टीने विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
हे बदल सन २०२३ करिता आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येतील, असे आयोगाने जाहीर केले आहे. आयोगाकडून आयोजित होणाऱ्या परीक्षांच्या पॅटर्नमध्ये झालेल्या बदलांनंतर त्याचा फायदा उमेदवारांना कसा होणार आहे, याबाबत या लेखमालेमध्ये यापूर्वीच चर्चा करण्यात आली आहे.
जुन्या प्रारूपानुसार गट ब (अराजपत्रित) संवर्गातील वेगवेगळ्या पदांसाठी गट ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येऊन त्या त्या पदांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येत असे. त्याचप्रमाणे गट क संवर्गातील वेगवेगळया पदांसाठी गट क संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येऊन त्या त्या पदांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येत असे. आता सर्व गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गासाठी महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा (Maharashtra Non- Gazetted Services Combined Preliminary Examination) या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच या संयुक्त पूर्वपरीक्षेच्या आधारे भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या /
वेतनश्रेणी, दर्जा, इत्यादी बाबी लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा’ तसेच ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा या नावाने स्वतंत्र परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
गट ब (अराजपत्रित) संवर्गातील ४ आणि गट क संवर्गातील ६ अशा दोन्ही संवर्गातील एकूण १० पदांसाठी ही पूर्वपरीक्षा आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया १४ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली आहे. तर, परीक्षा ३० एप्रिल रोजी प्रस्तावित आहे. भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे त्या त्या संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करायच्या उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात येईल. आणि त्या आधारे प्रत्येक संवर्गाकरिता पूर्वपरीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षेकरिता उमेदवारांकडून अर्ज घेताना त्या त्या संवर्गाकरिता आवश्यक अर्हतेच्या आधारे संवर्गाचा विकल्प घेण्यात येणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या पदावर आपली काम करण्याची इच्छा आहे ते ठरवून असे विकल्प काळजीपूर्वक देणे आवश्यक आहे.

MPSC Non Gazzeted New Combine Prelims Exam Pattern 2022-23

MPSC Non Gazzeted New Combine Prelims Exam Pattern And Syllabus

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्रपणे मुख्य परीक्षा घेण्यात येईल. (उदा. राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा कृषी सेवा मुख्य परीक्षा इत्यादी). प्रत्येक संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्र परीक्षा योजना व अभ्यासक्रम असेल. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग संवर्गाच्या विद्यमान भरतीप्रक्रियेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अराजपत्रित संवर्गासाठी परीक्षा ■ सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (Maharashtra Non- Gazetted Services Combined Preliminary Examination) या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. तसेच सदर संयुक्त पूर्व परीक्षेच्या आधारे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व अराजपत्रित गट व व गट-क संवर्गासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

  1. महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेकरिता उमेदवारांकडून अर्ज घेताना त्या त्या संवर्गाकरिता आवश्यक अर्हतेच्या आधारे संवर्गांचा विकल्प घेण्यात येईल. त्याच्या आधारे तसेच भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे त्यात्या संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करायच्या उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात येईल. आणी त्या आधारे प्रत्येक संवगांकरिता पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.
  2. महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या वेतनश्रेणी, दर्जा, इत्यादी बाबी लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा’ तसेच ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य ‘परीक्षा’ या नावाने स्वतंत्र परीक्षा आयोजित करण्यात येतील.
  3. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा’ तसेच ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा’ या मुख्य परीक्षांच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता त्यात्या संवर्गासाठी स्वतंत्रपणे मुख्य परीक्षा घेण्यात येईल.
  4. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा करिता ‘मराठी व इंग्रजी’ तसेच ‘सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी अशा दोन पेपर्सच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.
  5. ■ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गाकरिता उमेदवारांकडून मुख्य परीक्षेचा अर्ज घेतानाच अर्हतेवर आधारित पसंतीक्रम घेण्यात येईल.
  6. मुख्य परीक्षेकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवाराकडून भरती प्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा विकल्प (Opting Out) घेण्यात येईल व त्याच्या आधारे संबंधित संवर्गाकरिता निवडप्रक्रिया राबविण्यात येईल.
  7. पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील निवडीकरिता शारीरिक चाचणी ७० गुणांची अहंताकारी असेल. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील गुणांच्या आधारे करण्यात येईल.

MPSC Combine Group B & C Exam Pattern 2023

MPSC Non Gazzeted New Combine Prelims Syllabus PDF

अराजपत्रित सेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम
चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील –
नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा
भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातीत विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. – अर्थव्यवस्था
अ) भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिदन व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी ब) शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी

सामान्य विज्ञान

भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), प्राणिशास्त्र (झुलॉजी), वनस्पतीशास्त्र (बॉटनी), आरोग्यशास्त्र (हायजिन).
बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
अ) बुद्धिमापन चाचणी उमेदवार किती लवकर आणि अचूक विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न
ब) अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णाक व टक्केवारी
पूर्वपरीक्षेची काठिण्य पातळी गट ब अराजपत्रित सेवांसाठी पदवी स्तराची तर गट क साठी बारावी स्तराची होती. नव्या पॅटर्नप्रमाणे पूर्वपरीक्षेची काठीण्य पातळी पदवी स्तराची असल्याचे आयोगाकडून घोषित करण्यात आले आहे.
मुख्य परीक्षेकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवाराकडून भरती प्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा विकल्प (Opting Out) घेऊन त्या आधारे संबंधित संवर्गासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील निवडीकरिता शारीरिक चाचणी ७० गुणांची अर्हताकारी असेल. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील गुणांच्या आधारे करण्यात येईल.
वेगवेगळया परीक्षांसाठी आवश्यक वेगवेगळया गुणवत्ता राखण्यासाठी उमेदवारांना सतत करावे लागणारे प्रयत्न विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने आपल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे. त्यामुळे गट क सेवांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी काठिण्य पातळीमध्ये वाढ झाल्याचा विचार न करता गट बची पदे ही त्याच परीक्षेतून उपलब्ध होत असल्याचे लक्षात घेऊन तयारी करायला हवी.

MPSC Non Gazzeted New Combine Prelims Exam Pattern And Syllabus

📚Download MPSC Non Gazzeted New Combine Prelims Syllabus PDF

🧿Download MPSC Non Gazzeted New Combine Prelims Exam Pattern 2023


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड