MPSC Negative Marking मध्ये बदल 2023 – MPSC Negative Marking System in Marathi

 

MPSC Negative Marking System in Marathi – Negative Marking system Updates & new rules in 2023 examinations are given below. The mpsc negative marking calculation details & Marking calculation pattern is given below. Candidates should understand this carefully before appearing the examinations.

राज्य लोकसेवा आयोगाकडून आयोजित होणाऱ्या बहुतांश परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतात. ज्यावेळी उत्तरांचे पर्याय समोर नसतात तेव्हा ‘एका वाक्यात / शब्दात उत्तरे द्या’ अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा उमेदवारांची माहिती, ज्ञान तपासण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. कारण अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उमेदवाराला स्मरणशक्तीला ताण द्यावा लागतो, तर्कक्षमता वापरावी लागते. छोट्याशा चुकीनेही उत्तराचे सगळे मार्क गमवावे लागू शकतात. मात्र जेव्हा उत्तरांचे पर्याय समोर दिले जातात तेव्हा योग्य उत्तर शोधण्यासाठीची Range मर्यादित होते. अगदी अंदाजाने जरी उत्तर दिले तरी ते बरोबर असण्याची २५ टक्के शक्यता असतेच असते. त्यामुळेच असे प्रश्न तयार करणे हे प्रश्नकर्त्यांसाठी आव्हानात्मक असते.

 

कितीही Tricky प्रश्न तयार केले तरी ‘अंदाज बांधणे’ व ‘Probability’ वापरणे अशा गोष्टींतून उमेदवारांना काही प्रशांचे Bonus मार्क मिळण्याची शक्यता उरतेच. अशा वेळी अंदाजांना दंड देणे, ठोकताळ्यांना आळा घालणे यासाठी नकारात्मक गुणपद्धती (- ve marking) आवश्यक ठरते. याच भूमिकेतून बहुपर्यायी प्रश्न पद्धतीमध्ये नकारात्मक गुणांचे उपयोजन करण्यात येते.

 

Negative Marking in MPSC 2023 Examinations निगेटिव्ह मार्किंगचे स्वरूप

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ज्या विविध परीक्षा घेतल्या जातात त्यातील बहुपर्यायी प्रश्नांसाठी आयोगाने नकारात्मक गुणपद्धती लागू केलेली आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी पूर्वी ३३ टक्के नकारात्मक गुण पद्धती लागू होती. मात्र आता सर्वच परीक्षांमध्ये २५ टक्के नकारात्मक गुण लागू करण्यात आले आहेत. जास्त Risk घेता येते. बहुपर्यायी प्रश्नांचा विचार करता सोडवलेल्या प्रश्नांपैकी जास्तीत जास्त ८० ते ८५ प्रश्न बरोबर सोडवले जातात असे सर्वसाधारणपणे दिसून येते. २५ टक्के नकारात्मक गुण असतील तर सोडवलेल्या प्रश्नांच्या साधारणपणे ७० ते ७५ टक्के गुण मिळतात. याचाच अर्थ Cut Off रेषा जास्त गुणांवर स्थिरावते. म्हणजेच जितके जास्त प्रश्न सोडवता येतील तितके तुम्ही स्पर्धेत राहण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जेथे २५ टक्के Negative Marking असेल तिथे तुमचा प्रयत्न जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा असायला हवा. अर्थातच ज्याबाबत कोणतीही माहिती नसेल, अंदाज करता येत नसेल असे प्रश्न मात्र वगळायलाच हवेत.

 

२५ टक्के नकारात्मक गुण पद्धतीमध्ये दर चार चुकीच्या उत्तरांमागे एका बरोबर उत्तराचे गुण वजा करण्यात येतात. बहुपर्यायी प्रश्नांमध्ये उत्तरांचे चार पर्याय दिलेले असतात आणि त्यातील बरोबर उत्तर शोधायचे असते. जेव्हा आपण probability चे नियम वापरतो तेव्हा आपण निवडलेला कोणताही पर्याय बरोबर असण्याची २५ टक्के शक्यता असतेच त्यामुळे अशा प्रश्नांबाबत सर्वसाधारणपणे सरळसोट वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते एक प्रश्न व चार छोटे पर्याय; एक प्रश्न आणि तीन ते पाच विधाने व त्यातून योग्य विधाने निवडण्यासाठी चार पर्याय, दोन विधाने व त्यांतील कथन- कारण संबंध प्रस्थापित करणे आणि तीन ते पाच मुद्द्यांच्या जोड्या लावणे. यातील पहिला सरळसोट प्रश्नप्रकार सोडला तर किमान दोन पर्याय/ उत्तरे नेमकेपणाने माहीत असतील तरच हे प्रन सोडवणे शक्य होते हे लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे नेमका व मुद्देसूद अभ्यास आणि तो नेमकेपणाने लक्षात राहणे निगेटिव्ह मार्किंगसहित वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारांसाठी आवश्यक आहे.

Important Points For Negative Marking 2023

  • १. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • २.एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून कमी करण्यात येतील.
  • ३.वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
  • ४.एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही.

ही कार्यपद्धत आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांसाठी लागू राहणार आहे. या कार्यपद्धत यापुढे जाहीर होणाऱ्या सर्व लेखी परीक्षांच्या निकालाकरता लागू राहणार आहे.आयोगाच्या संकेतस्थळावरील संबंधित परीक्षांच्या योजनांमध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येतील. तोपर्यंत या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे.


Leave a Comment

Available for Amazon Prime
✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰महाभरती Exam ची अँप डाउनलोड करा!

JOIN Telegram