MPSC Language Paper Pattern – राज्यसेवा मुख्य परीक्षा : भाषा पेपर माहिती

MPSC Language Paper Pattern

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Language Paper Pattern – Students Maharashtra Public Service Commission has decided the Format Of Language Paper in 2016, as Per this there will be Two Papers Namely Marathi and English (Combined) Conventional and Marathi and English (Combined) Objective in the main examination Of MPSC Rajyaseva. In this article, candidates will get All Detail Information regarding MPSC Language Paper, How To Prepare For MPSC Mains Language Paper. The MPSC Language Paper Pattern is divided into Conventional and Objective.  The conventional paper is to be solved in three hours for 100 marks and the objective paper is to be solved in one hour for 100 marks. The difficulty level of conventional paper is that of higher secondary school examination whereas the difficulty level of objective paper is that of degree level. Check all information about MPSC Language Paper Pattern at below :

🧿MPSC New Syllabus And Exam Pattern PDF-Download For All Exam

विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१६ मध्ये भाषेच्या पेपरचे स्वरूप निश्चित केले आहे, त्यानुसार MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेत मराठी आणि इंग्रजी (एकत्रित) पारंपारिक आणि मराठी आणि इंग्रजी (एकत्रित) उद्देश असे दोन पेपर असतील. या लेखात, उमेदवारांना एमपीएससी भाषा पेपर, एमपीएससी मुख्य भाषा पेपरची तयारी कशी करावी यासंबंधी सर्व तपशीलवार माहिती मिळेल. MPSC भाषा पेपर पॅटर्न परंपरागत आणि वस्तुनिष्ठ मध्ये विभागलेला आहे. 100 गुणांसाठी पारंपारिक पेपर तीन तासात सोडवायचा आहे आणि 100 गुणांचा वस्तुनिष्ठ पेपर एका तासात सोडवायचा आहे. पारंपारिक पेपरची काठीण्य पातळी ही उच्च माध्यमिक शाळेच्या परीक्षेची असते तर वस्तुनिष्ठ पेपरची काठीण्य पातळी पदवी पातळीची असते. एमपीएससी भाषा पेपर पॅटर्नबद्दलची सर्व माहिती खाली तपासा. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग Free Mock Test साठी येथे क्लिक करा

भाषा विषयांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याचे प्रयोजन आधी समजून घ्यायला हवे. प्रशासकीय व्यवस्थेचा भाग म्हणून अंतर्गत व्यवहार आणि नागरिकांशी व्यवहार अशा दोन पातळय़ांवर महाराष्ट्रामध्ये मराठी आणि इंग्रजी या भाषा वापरल्या जातात. त्यांचे आकलन आणि अभिव्यक्तीसाठी त्यांचा वापर करण्याची क्षमता या पेपर्सच्या माध्यमातून तपासली जाते. उमेदवाराची विचारप्रक्रिया, अभिव्यक्ती, लेखनाचे कौशल्य इ. गोष्टी जोखण्यासाठी पारंपरिक भाषा पेपरमध्ये निबंधाचा घटक योजण्यात आला आहे, तर उमेदवाराची आकलन क्षमता अभिवृत्ती, भाषिक कौशल्ये तपासण्यासाठी सारांश लेखन आणि भाषांतर या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

To Know Latest Changes And Updates in MPSC Exam Click Here

हा पेपर १०० गुणांसाठी आणि उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेच्या (१२ वीच्या) समकक्ष असेल असे आयोगाने अभ्यासक्रमात नमूद केले आहे. या पेपरच्या मराठी व इंग्रजी भागासाठी वेगवेगळय़ा उत्तरपत्रिकांमध्ये उत्तरे लिहायची आहेत. निबंध २५-२५ गुण, भाषांतर १५-१५ गुण व सारांश लेखन १०-१० गुण अशी प्रत्येक भाषेसाठीची गुणविभागणी आहे.

निबंध :

  • निबंध हा सर्वात जास्त गुण असलेला प्रश्न आहे. दोनपैकी एका विषयावर निबंध लिहायचा असल्याचे अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आले आहे. निबंध लेखनास direct सुरुवात करू नये. कच्च्या पानावर आधी सुचतील ते मुद्दे मांडावेत. त्यानंतर त्यांचा क्रम ठरवून मग प्रत्यक्ष लेखन करावे.
  • वैचारिक, समस्याधारित निबंधात विषयाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक व इतर काही संबंधित पैलू विचारात घ्यावेत. साधारणपणे १० ते १२ मुद्दे निवडून त्यांचा क्रम ठरवून घ्यावा.
  • परिणामकारक सुरुवात करण्यासाठी सुविचार, कविता इ.चा वापर करता येईल. सुरुवातीनंतर ठरलेल्या क्रमाने थोडक्यात मुद्दे मांडावेत व एका  Conclusion ने शेवट करावा.
  • विषयाच्या दोन्ही बाजू मांडता आल्या तर उत्तम, मात्र तुमचे मत म्हणून जेव्हा एखादा निष्कर्ष किंवा तात्पर्य मांडायचे असेल तेव्हा ते एकांगी किंवा हट्टाग्रही असू नये.
  • कल्पनात्मक निबंधामध्ये कल्पनेच्या अतिशयोक्त भराऱ्या असू नयेत. कल्पनासुद्धा तर्कशुद्ध असायला हव्यात. असे निबंध शालेय पद्धतीने मांडले जाण्याचा धोका असतो. त्यामुळे विचारांचे गांभीर्य टिकविणे खूप आवश्यक आहे.

 भाषांतर :

  • इंग्रजीतून मराठीत भाषांतर करताना वाक्यरचना एकदम कृत्रिम होण्याची शक्यता असते. तेव्हा आधी वाक्य व्यवस्थित वाचून त्याचा भावार्थ समजून घ्यावा आणि मग त्याचे मराठी वाक्य लिहावे. आधी मनातल्या मनातच वाक्याचा भावार्थ ज्या भाषेत उत्तर लिहायचे आहे त्या भाषेत उच्चारला की हे सोपे होऊन जाते.
  • इंग्रजी व मराठी भाषेच्या वाक्यरचनेमध्ये मूलभूत फरक आहे. हे व्यवस्थित समजून घ्यायला हवे.
  • काही वेळेला एखाद्या शब्दाला प्रतिशब्द आठवला नाही तर अशा वेळी त्या प्रतिशब्दासाठी अडून बसण्यापेक्षा वाक्याचा भावार्थ नीट मांडला जाईल, अशी वाक्यरचना करावी. मात्र प्रत्येक वेळी असा पाल्हाळीक अनुवाद करण्याचे टाळावे.

 सारांश लेखन :

  • दिलेल्या उताऱ्यातील एकूण शब्दसंख्या उजव्या कोपऱ्यात दिलेली असते आणि सारांश उताऱ्याच्या एकतृतीयांश इतक्या शब्दमर्यादेत व स्वत:च्या शब्दात लिहिणे अपेक्षित असते.
  • उत्तरपत्रिकेत या प्रश्नासाठी टेबलच्या स्वरूपात वेगळे पान दिलेले असते व प्रत्येक चौकोनात एकच शब्द लिहायचा असतो. त्यामुळे टेबलच्या किती ओळींमध्ये तुमचा सारांश पूर्ण होईल, हे लक्षात येते.
  • संपूर्ण उतारा वाचत बसण्यापेक्षा सरळ पहिला पॅराग्राफ वाचून त्याचा सारांश लिहावा. मग पुढच्या पॅराग्राफचा सारांश असे करत गेल्यास वेळेची बचत होते.
  • सारांश लिहिताना उताऱ्यातील  quotations, उदाहरणे इ. आधी वगळून टाकावी. फक्त त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा. त्यावरून योग्य व कमीत कमी शब्दयोजना करत सारांश लिहावा.
  • मात्र सारांश लिहिताना स्वत:चे मतप्रदर्शन टाळले पाहिजे. अतिरिक्त स्पष्टीकरण देत बसू नये. विचारले असेल तर छोटेसे समर्पक शीर्षक द्यावे.

Leave a Comment