JOIN Telegram

MPSC Important Instruction For Candidates – परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना

Guidelines regarding the procedure to be followed by the candidates during the Examinations.

MPSC Important Instruction For CandidatesThe guidelines regarding the procedure to be followed by the candidates during the examinations conducted by the Maharashtra Public Service Commission have been published on the Commission’s website. Candidates should go through the above instructions carefully before each examination.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना !! उमेदवारांनी सदर सूचनांचे प्रत्येक परिक्षेपूर्वी काळजीपूर्वक अवलोकन करावे. तसेच जर आपण MPSC ची तयारी करत असाल तर या लिंक वरून मोफत टेस्ट सिरीज सोडवण्यास विसरू नका, फक्त रजिस्टर करा आणि रोज नवीन पेपर्स लॉगिन करून सोडवा. 

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

MPSC New Syllabus And Exam Pattern PDF

१. परीक्षा उपकेंद्रावरील उपस्थितीबाबत :-
१.१ परीक्षा उपकेंद्रावरील उपस्थितीकरीता निर्धारित केलेल्या वेळेस उपस्थित राहून उपस्थिती नोंदविणे अनिवार्य आहे.
१.२ आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा परीक्षेस प्रवेश नाकारला जाईल.
१.३ उमेदवारांची तपासणी / झडती (Frisking), ओळख पडताळणी करणे, हजेरी नोंदविणे, सूचना देणे इत्यादी स्वरुपाच्या कार्यवाहीसाठी परीक्षा उपकेंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
१.४ परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उदभवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
१.५ परीक्षा कक्षामध्ये शेवटच्या प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही
अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
१.६ परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय नाही.
१.७ परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खाजगी वाहनांच्या पार्किंगकरीता उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.
१.८ परीक्षेवेळी मद्य आणि / किंवा मादक अमली पदार्थांचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, अशा उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडीकरिता प्रतिरोधित करण्यात येईल.
१.९ पडताळणी / तपासणी संदर्भातील कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे.
२. ओळखीच्या पुराव्याबाबत:-
२.१ परीक्षेच्या वेळी ओळखीच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे:-
(१) आधारकार्ड
(२) निवडणूक आयोगाचे ओळखपत्र
(३) पासपोर्ट

(४) पॅनकार्ड
(५) स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स
२.२ परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र आणि वर नमूद पाच वैध (Valid) ओळखपत्रांपैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र व त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत सादर न केल्यास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल.
२.३ मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी केवळ त्याच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राहय धरला जाणार नाही व उमेदवारास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल.
२.४ उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत्येक पेपरच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.
२.५ भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड केलेले ई-आधार सादर करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत ई-आधार वर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशीलासह आधार निर्मितीचा दिनांक (Date of Aadhaar generation) व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंट मध्ये आधार डाऊनलोड केले असल्यासच ई-आधार वैध मानण्यात येईल.
२.६ नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला (विवाहीत स्त्रियांच्या बाबतीत), नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
३. सोबत आणण्यास / बाळगण्यास परवानगी असलेले साहित्य:-
३.१ परीक्षा कक्षामध्ये फक्त खालील साहित्य घेऊन जाण्यास परवानगी राहील:-
(१) आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले सुस्पष्ट स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र
(२) काळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन
(३) मूळ वैध ओळखपत्र
(४) मूळ वैध ओळखपत्राची सुस्पष्ट छायांकित प्रत
(५) पाण्याची (पारदर्शक) बॉटल

३. २ लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची परवानगी देण्यात आलेल्या दिव्यांग उमेदवारांना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचनां मध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रे / कागदपत्रे परीक्षा कक्षामध्ये नेण्यास परवानगी राहील. तथापि, आवश्यक कागदपत्रांव्यतिरिक्त इतर कोणतीही कागदपत्रे परीक्षा कक्षामध्ये घेऊन गेल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
३. ३ परवानगी नसलेले अन्य कोणतेही साहित्य (पाऊच, पर्स, बॅग्ज, नोट्स, पुस्तक, लेखन पॅड इत्यादी) परीक्षा कक्षामध्ये नेण्यास सक्त
मनाई आहे.
३.४ स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल दूरध्वनी, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लू टूथ, दूरसंचार साधने म्हणून वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, परिगणक (Calculator) इत्यादी परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वत:जवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे.
३.५ आयोगाने परवानगी नाकारलेले कोणत्याही प्रकारचे अनधिकृत साधन / साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधित परीक्षा उपकेंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठेवावे लागेल. अशा साधन / साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस आयोग, जिल्हा प्रशासन किंवा शाळा / महाविद्यालय व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
४. कार्बनलेस उत्तरपत्रिकांच्या वापराबाबत उमेदवारांना विशेष सूचना :-

४.२ उत्तरपत्रिकेवरील माहिती भरण्यासाठी व योग्य उत्तराचे वर्तुळ छायांकित करण्याकरिता फक्त काळया शाईचे बॉल पॉईंट पेन वापरावे. हे करतांना दुय्यम प्रतीवरही स्पष्ट खूण दिसण्यासाठी पुरेसा दाब द्यावा.
४.३ उत्तरपत्रिकेवरील मजकुरामध्ये बदल करण्यासाठी White Fluid, Blade अथवा तत्सम साधनांचा कोणत्याही परिस्थितीत वापर करु नये.
४. ४ परीक्षा कालावधीतच उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नांव, बैठक क्रमांक (Roll Number), प्रश्नपत्रिका क्रमांक, संच क्रमांक, प्रवेश प्रमाणपत्रावर नमूद केलेला विषयाचा संकेतांक (Subject Code) योग्य ठिकाणी इंग्रजीमध्ये व अचूकपणे नमूद करुन विहित ठिकाणी स्वाक्षरी करावी.
४.५ उत्तरपत्रिकेवर स्वतः चे नांव अथवा स्वतःची ओळख पटेल असा कोणताही तपशील नमूद करु नये.
४. ६ प्रश्नपुस्तिकेत विहित केलेल्या जागीच कच्चे काम करावे. उत्तरपत्रिकेवर अथवा अन्य ठिकाणी कच्चे काम अथवा अन्य कोणताही तपशील नमूद करु नये.
४. ७ प्रश्नपुस्तिकेवरील इंग्रजी आद्याक्षरातील संच क्रमांक (उदा. A, B, C किंवा D) उत्तरपत्रिकेवर विहित ठिकाणी अचूकपणे नमूद करावा. तसेच, सदर संच क्रमांकाचे संबंधित वर्तुळ अचूकपणे छायांकित करावे.
४.८ प्रश्नपुस्तिकेचा संच क्रमांक उत्तरपत्रिकेवर अचूकपणे न नोंदविल्यास शून्य गुण देण्यात येतात.

♟️Download Full MPSC Instruction PDF


MPSC Important Instruction For Candidates

MPSC Important Instruction For Candidates – Maharashtra Group-C Services Main Examination 2022 Combined Paper No.2 – is going to conduct on 11th March 2023. Those candidates who are going to appear for MPSC Group C Mains Exam 2023 can check Important Instruction issued by commission before appearing for MPSC Group C Mains Exam 2023. Carry all documents mentioned below. Check MPSC Important Instruction PDF at below

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक २ – ११ मार्च, २०२३ रोजी होणार आहे. जे उमेदवार MPSC गट C मुख्य परीक्षा 2023 ला बसणार आहेत ते MPSC गटाला बसण्यापूर्वी आयोगाने दिलेल्या महत्त्वाच्या सूचना पाहू शकतात.

विषय:- महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ उद्योग निरीक्षक दिनांक ११ मार्च, २०२३
(१) परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे..
(२) परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही.

MPSC Group C Mains Exam Important Instruction 2023

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२२ संयुक्त पेपर क्रमांक १ – दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२३
(१) परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
(२) परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही.
(३) ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच, उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य आहे.
(४) परीक्षा कक्षात मोबाईल दूरध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही.
(५) परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय नाही.
(६) परीक्षेवेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थांचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, अशा उमेदवारांना आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडीकरिता प्रतिरोधित करण्यात येईल.
(७) पडताळणी / तपासणी संदर्भातील कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे. पडताळणी/ तपासणीनंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांका व्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजून उमेदवारी रद्द करण्यासह आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार उचित कारवाई करण्यात येईल.
(८) परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खाजगी वाहनांच्या पार्किंगकरीता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.
(९) प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
(१०) कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परीक्षा कालावधीमध्ये उमेदवाराने स्वतःचा मुखपट (Mask) परिधान करणे तसेच स्वच्छता (Cleanliness) व आरोग्यास हितावह ( Hygienic) वातावरण राखण्यासाठी उमेदवारांनी स्वतः चे सॅनिटायझर वापरणे हिताचे राहील.
(११) उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नांव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक, इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा.
(१२) परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाच्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार प्रतिरोधनाची कारवाई केली जाईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.

परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा !


MPSC Instrcution For Technical Services Combined Preliminary Examination

MPSC Important Instruction For Candidates : Maharashtra Gazetted Technical Services Combined Preliminary Examination 2022 is going to be conudcted on 17th Decemebr 2022. For MPSC Technical Services Pre Exam, instruction for candidates has been OUT!! Before going to exam students just go through this Information and do not forget to carry mentioned documents at exam centers. If you forget You don’t get entry at the Exam Hall Center. So be carefully read it :

MPSC released instructions to the candidates

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा एकत्रित प्राथमिक परीक्षा २०२२ – उमेदवारांना सूचना

(1) From the website of the Commission’s online application system for admission to the examination hall

It is mandatory to bring the downloaded and printed admission certificate in original format. (2) It is mandatory to appear for the examination at the prescribed examination sub-centre one and a half hours prior to the commencement of the examination and no candidate shall be permitted to enter the examination hall after the time prescribed on the admit card for last entry into the examination hall.

(3) Own Aadhaar Card, Election Commission Identity Card, Passport, PAN Card and Smart Card for identity proof

It is mandatory to submit at least one original identity card of any type of driving license along with a photocopy of the original identity card with the candidate’s photograph and other text clearly visible.

(4) No mobile phone or any other telecommunication device is allowed in the examination room.

(5) Friends, relatives, guardians or any other unauthorized persons in the premises of the Examination Sub-Centre In the circumstances Entry is not permitted.

(6) Appropriate legal action against candidates found to have consumed alcohol and/or narcotic drugs during the examination Action will be taken. Also, all the examinations conducted by the Commission at the discretion of the Commission to such candidates The examination will be resisted for selection.

(7) Candidates should preferably use public transport to attend the examination sub-centre. No arrangements will be made for parking of private vehicles at the examination sub-centre.

(8) By carefully perusing all the instructions given on the Question Booklet, Answer Sheet as well as the Admit Certificate Must be followed exactly.

(9) Self-mask by the candidate throughout the examination period in view of the outbreak of the Covid-19 virus It will be beneficial for candidates to wear masks and use their own sanitizer to maintain cleanliness and hygienic environment. (10) Name of examination, meeting number, set number, subject code, etc. details should be properly mentioned on the answer sheet.

(11) If found trying to malpractice in any manner during the examination period or violating any instructions of the Commission, disciplinary action will be taken against the concerned at the discretion of the Commission. Also, action will be taken as per the provisions of the prevailing rules/laws. Best wishes to all candidates for the exam!


MPSC Important Instruction For Candidates : For Maharashtra Subordinate Services Non-Gazetted Group B Main Examination 2020 Paper 2 Assistant Section Officer, Maharashtra Subordinate Services Non-Gazetted Group B Main Examination 2020 Paper 2 State Tax Inspector MPSC has issued Instructions to Candidates. Before going to exam students just go through this Information and do not forget to carry mentioned documents at exam centers. If you forget You don’t get entry at the Exam Hall Center. So be carefully read it :

Advt.No. 020/2022 – Assistant Commissioner (Drugs), Food & Drugs Administrative Services, Group-A  Exam has been cancelled by some Administrative Reason.Check Below Details

सहायक आयुक्त ( औषधे), गट-अ, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग या संवर्गातील पदभरतीकरीता दिनांक १९ मार्च, २०२२ रोजी प्रसिध्द जाहिरातीस (जाहिरात क्रमांक २०/२०२२) अनुसरून नियोजित संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे.

MPSC Important Instruction For Candidates

MPSC ने उमेदवारांना सूचना जारी केल्या

विषय:- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०२० पेपर क्रमांक २ राज्य कर निरीक्षक दिनांक १५ ऑक्टोबर, २०२२

(१) परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुनcडाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

(२) परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्यcअसून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याहीcउमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही.

(३) ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतः चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच, उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य आहे.

(४) परीक्षा कक्षात मोबाईल दूरध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही.

(५) परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत

प्रवेश अनुज्ञेय नाही.

(६) परीक्षेवेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीरcकारवाई करण्यात येईल. तसेच, अशा उमेदवारांना आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्वcपरीक्षा निवडीकरिता प्रतिरोधित करण्यात येईल.

(७) परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खाजगी वाहनांच्या पार्किगकरीता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही. (८) प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

(९) कोव्हिड १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परीक्षा कालावधीमध्ये उमेदवाराने स्वतःचा मुखपट (Mask) परिधान करणे तसेच स्वच्छता (Cleanliness) व आरोग्यास हितावह (Hygienic) वातावरण राखण्यासाठी उमेदवारांनी स्वतः चे सॅनिटायझर वापरणे हिताचे राहील. (१०) उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नांव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक, इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूदcकरावा.

(११) परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवाcआयोगाच्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार प्रतिरोधनाचीcकारवाई केली जाईल, तसेच प्रचलित नियम/कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल..

विषय:- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०२० पेपर क्रमांक २ सहायक कक्ष अधिकारी – दिनांक १६ ऑक्टोबर २०२२

(१) परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुन

डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. (२) परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही.

(३) ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड

प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच, उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य आहे.

(४) परीक्षा कक्षात मोबाईल दूरध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही. (५) परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही

परिस्थितीत

प्रवेश अनुज्ञेय नाही. (६) परीक्षेवेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर

कारवाई करण्यात येईल. तसेच, अशा उमेदवारांना आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व

परीक्षा निवडीकरिता प्रतिरोधित करण्यात येईल. (७) परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा.

खाजगी वाहनांच्या पार्किंगकरीता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.

(८) प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून

तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

(९) कोव्हिड – १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परीक्षा कालावधीमध्ये उमेदवाराने स्वतःचा मुखपट

(Mask) परिधान करणे तसेच स्वच्छता (Cleanliness) व आरोग्यास हितावह ( Hygienic) वातावरण राखण्यासाठी उमेदवारांनी स्वतः चे सॅनिटायझर वापरणे हिताचे राहील. (१०) उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नांव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक, इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा.

(११) परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाच्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार प्रतिरोधनाचीcकारवाई केली जाईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल. परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा!


MPSC Instruction For Subordinates Services Prelims Exam 2022

(1) परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

(२) परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही.

(३) ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच, उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य आहे.

(४) परीक्षा कक्षात मोबाईल दूरध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही.

(५) परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय नाही.

(६) परीक्षेवेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, अशा उमेदवारांना आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडीकरिता प्रतिरोधित करण्यात येईल.

(७) परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खाजगी वाहनांच्या पार्किंगकरीता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.

(८) प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

(९) कोव्हिड १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परीक्षा कालावधीमध्ये उमेदवाराने स्वतःचा मुखपट (Masic) परिधान करणे तसेच स्वच्छता (Cleanliness) व आरोग्यास हितावह (Hygienic) वातावरण राखण्यासाठी उमेदवारांनी स्वतः चे सॅनिटायझर वापरणे हिताचे राहील.

(१०) उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नांव, बैठक क्रमांक, संच क्रमांक विषय संकेतांक, इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा.

(११) परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाच्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार प्रतिरोधनाची कारवाई केली जाईल. तसेच, प्रचलित नियम/कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.. परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा!


test99

1 thought on “MPSC Important Instruction For Candidates – परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना”

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड