List Of Documents For PCMC Exam 2024- PCMC फायरमन परीक्षा 2024 साठी प्रमाणपत्राची महत्त्वाची यादी

List Of Documents For PCMC Exam 2024

Important List Of Certificate for PCMC Fireman Exam 2024

PCMC Recruitment Exam Pattern And Syllabus PDF – 386 रिक्त जागांसाठी अभ्यासक्रम

PCMC Previous Year Question Paper With Answer Key – 26, 27 28 मे रोजी विचारण्यात आलेले TCS द्वारे प्रश्न, त्वरित बघा

PCMC Bharti Mock Test – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती टेस्ट सिरीज

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

१२.१ जाहीरातीत नमूद केलेल्या पद संख्येत व प्रवर्गनिहाय आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
जातीच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ महाराष्ट्र अनु. जाती, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतरमागास वर्ग, विशेष मागास वर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० मधील तरतूदीनुसार सक्षम प्राधिका-याकडून प्रदान करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
एखादी जात/जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच सक्षम प्राधिका-याने प्रदान केलेले जात प्रमाणपत्र उमेदवाराकडे अर्ज करतानाच उपलब्ध असेल तर संबंधीत जात/जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.
उमेदवाराने अर्जामध्ये जातीचा व जात प्रवर्गाचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे.
कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा (समाजिक अथवा समांतर) अथवा सोयी सवलतीचा दावा करणा-या उमेदवाराकडे संबंधीत कायदा/ नियम / आदेशानुसार विहीत नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहीत केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे. वैध प्रमाणपत्राच्या कालावधी संबंधीत शासन आदेशावरील तरतुदीनुसार (लागु असेल त्याप्रमाणे) ग्राह्वा समजण्यात येतील.
विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग प्रवर्ग व सामाजिक आणि शैक्षणिकदृष्या मागास प्रवर्गाकरीता दावा करणा-या उमेदवारांनी उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत आहेत किंवा नाही याबाबत अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करुन दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत निर्गमित केलेले वैध असणारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी त्या क्रिमिलेअर प्रवर्गातील महिला नसल्याचे प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील.
महीलांसाठी आरक्षित पदांकरीता दावा करणा-या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये महाराष्ट्राचा अधिवास (Domisile) असल्याबाबत तसेच नॉन क्रिमिलेअरमध्ये मोडत असलेबाबत (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून) स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. महिला व बालविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णय क्र. महिआ २०२३/प्र.क्र.१२३/कार्या- २ दिनांक ०४.०५.२०२३ नुसार खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागासप्रवर्गातील महिलांनी नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करु इच्छिणा-या महिलांना त्या-त्या मागासप्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहीत करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतूदी लागू राहतील.
अद्ययावत नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र / आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असल्या बाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिका-याने वितरीत केलेले या सविस्तर जाहिरातीच्या वित्तीय वर्षातील (३१ मार्च २०२५ पर्यंत निर्गमित केलेले) वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्र सादर करु न शकणारे उमेदवार समांतर तसेच मागासप्रवर्गातील आरक्षणाचा
(सामाजिक आरक्षण) लाभ घेण्यास अपात्र होतील.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (“ईडब्ल्यूएस) उमेदवारांकरीता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : राआधो- ४०१९/प्र.क्र.३१/१६-अ, दिनांक १२ फेब्रुवारी, २०१९ व दि.३१/०५/२०२१ अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील. आर्थिक दुर्बल घटकांतील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांच्या ग्राहता कालावधी शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. राआधो२०२३/प्र.क्र. ४०/१६-अ.दि.२३ मार्च, २०२३ नुसार समजण्यात येईल.

कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणा-या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल. इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरीत झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांचा आरक्षित पदांकरीता विचार केला जाणार नाही. सदर आरक्षण विषयक नियम हे केवळ महाराष्ट्र राज्यात अधिवास करणा-या उमेदवारांनाच लागू आहे. त्याकरीता उमेदवाराने कागदपत्रे पडताळणीचेवेळी अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) पदावरील निवडीकरीता विचार करणेबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल.
आराखीव (खुला) उमेदवाराकरीता विहीत केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषसंदर्भातील अटीची पुर्तता करणा- या सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारासह) अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरीता विचार होत असल्याने, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित / उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मुळ प्रवर्गा संदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
विवाहित स्त्रियांना विवाह निबंधक यांनी दिलेला विवाह नोंदणी दाखला किंवा नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचीत केलेले शासनाकडील राजपत्र संबंधित उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीचे वेळी सादर करावे लागेल.
जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. बीबीसी२०११/प्र.क्र.१०६४/२०११/१६-ब. दि. १२ डिसेंबर २०११ मधील तरतुदीनुसार, याचिका क्र. २१३६/२०११ व अन्य याचिकांवर मा. मुंबई उच्च न्यायालयाचया औरंगाबाद खंडपीठाने दि. २५ ऑगस्ट, २०११ रोजी दिलेल्या आदेशाच्या विरोधात मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या
एसएलपी मधील आदेशाच्या अधीन राहून तात्पुरते नियुक्ती आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून ०६ महिन्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांची नियुक्ती पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल. शासन निर्णय, शालेय शिक्षण व किडा विभाग, क्रमांकः राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १ जुलै, २०१६ तसेच शासन शुध्दीपत्रक क्रमांकः राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १८ ऑगस्ट, २०१६ व शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १७१६/प्र.क्र.१८/क्रीयुसे-२ दि. ३० जून २०२२ आणि तदनंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार
प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तीसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणा-या उमेदवारांच्या बाबतीत क्रिडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिका-याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे.

उमेदवार माजी सैनिक असल्यास जिल्हा सैनिक बोर्डात नाव नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्र पडताळणीचे वेळी सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा सदर आरक्षणाचा लाभ उमेदवारास देय राहणार नाही. तसेच माजी सैनिक, बडतर्फीने, गैरवर्तणूक किंवा अकार्यक्षमता या कारणासाठी अथवा सैनिकी सेवेसाठी शारिरीक क्षमता नसल्याने किंवा आजारपणामुळे सेवा संपुष्टात आलेले माजी सैनिक/ आणीबाणी व अल्पसेवा अधिकारी वयोमर्यादेच्या सवलतीसाठी पात्र ठरणार नाहीत.
शासन निर्णय क्र.विकाक-२२१५/प्र.क्र.३३७/१६- अ. दिनांक ०४/११/२०१६ नुसार प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त या आरक्षणात अर्ज केलेल्या उमेदवारास कागदपत्रे पडताळणीचे वेळी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा सदर आरक्षणाचा लाभ उमेदवारास देय राहणार नाही.
शासन परिपत्रक क्र. अनाथ-२०१८/प्र.क्र.१८२/का-०३, दिनांक २०/०८/२०१९नुसार, अनाथ या आरक्षणात अर्ज केलेल्या उमेदवारास कागदपत्रे पडताळणीचे वेळी विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास विभागाकडील अनाथ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा सदर आरक्षणाचा लाभ उमेदवारास देय राहणार नाही.
प्रस्तुत पदासाठी अर्ज करतांना अनाथ आरक्षणाचा दावा करणान्या उमेदवारांना महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र.अनाथ-२०२२/प्र.क्र.१२२/का-०३ दिनांक ०६ एप्रिल २०२३ तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणान्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.
अनाथांसाठी अरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे, त्या प्रवर्गातून करण्यात येईल.
अनाथ या घटकाकरीता जाहिरातीत दर्शविलेल्या आरक्षित पदांसाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास आरक्षणाचा अनुशेष पुढे न ओढता खुल्या (अराखीव) प्रवर्गातून गुणवत्तेनुसार इतर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल.
जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदसंख्येत/आरक्षणात तसेच भरती प्रमाणात बदल होऊ शकतो. तसेच मागासवर्गीय आरक्षण, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्ग व ईडब्ल्यूएस आरक्षण यांचे बिंदुनामावलीबाबत, भविष्यात शासन निर्णय पारीत झाल्यास अथवा काही बदल झालेस त्यानुसार जाहिरातीत दर्शविण्यात आलेल्या आरक्षणामध्ये व पदसंख्येत बदल होऊ
शकतो. व त्या बदलानुसार पदे भरण्यात येईल. सामाजिक व समांतर आरक्षणा संदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल.

 

८. फोटो व स्वाक्षरीबाबत सूचना – For Uploading Photo and Signature in PCMC Form

उमेदवाराने अलिकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो अपलोड करावा.
उमेदवाराने फोटो काढताना प्लॅशचा वापर केल्यास Red Eye येणार नाही याची दक्षता घ्यावी.
उमेदवार चष्मा वापरत असल्यास डोळे दिसतील अशा प्रकारचा फोटो असावा. फोटोमध्ये टोपी, गॉगल, मास्क यांनी चेहरा झाकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
उमेदवारांने स्कॅन केलेले छायाचित्र हे 50 80 kb पेक्षा मोठे नसेल याची दक्षता घ्यावी.
Online Application वर ज्या ठिकाणी स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे तेथे अपलोड करावी. सदरची स्वाक्षरी ही उमेदवाराची स्वतःचीच असणे आवश्यक आहे.
उमेदवाराने काळया शाईच्या पेनाने पांढ-या कागदावर स्वाक्षरी करुन ती अपलोड करावी.
उमेदवाराने स्कॅन केलेली स्वाक्षरीची ईमेज ही 50-80 kb पेक्षा जास्त नसेल याची दक्षता घ्यावी.


List Of Documents For PCMC Exam 2024: Before selection of candidates and preparation of waiting list, verification of the documents of the information filled in the online form is necessary to verify the documents related to age, educational qualification, experience, caste category and parallel reservation etc. For that, the candidates have to go through the PCMC Document Verification Process. Candidates should attend at Auto Custer, Meeting Hall, Mumbai-Pune Road, Pimpri Pune 411 099 at 10:00 am for document verification on 25/08/2023. Candidates should bring original documents as mentioned below along with one set of attested copies of those documents while coming for document verification. If the candidate is called for document verification for more than one post, he/she should bring a set of attested copies of that number of documents. Attested copies of the documents should be attested by the competent authority.

Pimpri Chinchwad Mahapalika Important Document List

उमेदवारांनी दिनांक २५/०८/२०२३ रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी ऑटो कुस्टर, मिटींग हॉल, मुंबई-पुणे रस्ता, पिंपरी पुणे ४११ ०९९ येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित रहावे. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी करीता येताना परिशिष्ठ “ब” मध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे तसेच त्या कागदपत्रांचा साक्षांकित प्रतीचा एक संच बरोबर आणावा. एकापेक्षा अधिक पदाकरीता उमेदवारास कागदपत्रे पडताळणीकरीता बोलविले असल्यास त्याप्रमाणात कागदपत्रांचा साक्षांकित प्रतीचा संच सोबत आणावा. कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रती या सक्षम प्राधिका-याने साक्षांकीत केलेल्या असाव्यात. वरील पदांकरीता ऑनलाईन अर्ज केलेल्या ज्या उमेदवारांनी महिला आरक्षण निवडलेले आहे. त्या उमेदवारांच्या महिला आरक्षणाबाबत कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अलहिदा निर्णय घेण्यात येईल.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Download List Of Documents Required For PCMC Exam 2024

Download List Of Documents Required For PCMC Exam 2023

Check PCMC Exam Important Document List

Leave a Comment