List of Document Required For GMC Nagpur Bharti – नागपूर GMC अंतर्गत ६८० रिक्त पदांसाठी लागणारी कागत पत्र पडताळणी साठी लागणारी यादी जाहीर

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

List of Document Required For GMC Nagpur Bharti: वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेल्या नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद महाविद्यालय व संलग्णीत रुग्णालयातील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष सरळसेवेच्या ६८० रिक्त पदांची निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्या करीता उमेदवारां कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून (ऑनलाईन कंप्यूटर बेस टेस्ट) परीक्षा घेवून त्याचा निकाल संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक ३०/०९/२०२४ ला प्रसिध्द करण्यात आला आहे. उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्या करीता गुणवत्ता प्राप्त उमेदवारांची कागदपत्र/प्रमाणपत्र पडताळणी करण्या करीताचे वेळापत्रक व प्रवर्गनिहाय उमेदवारांची यादी यासोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. त्या प्रवर्गनिहाय यादीतील उमेदवारांचे कागदपत्रे/प्रमाणपत्रे दिनांक ०७/११/२०२४, दिनांक ०८/११/२०२४, दिनांक ११/११/२०२४ व दिनांक १२/११/२०२४ ला वेळापत्रका प्रमाणे पडताळणी करण्यात येईल. सर्व उमेदवारांनी प्रवर्गनिहाय यादीतील आपले नाव काळजीपूर्वक पाहून वेळापत्रकामध्ये दिलेल्या दिनांकास व वेळेवर खाली नमूद केलेल्या स्थळी उपस्थित राहावे.

निवड यादीतील सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी वेळापत्रका प्रमाणे विहीत दिनांकास विहीत वेळेत, विहीत स्थळी कागदपत्र/प्रमाणपत्र पडताळणी करीता वेळेवर संपूर्ण आवश्यक मूळ कागदपत्रासह व ०२ संच छायाप्रत स्वसाक्षांकित प्रतिसह उपस्थित राहावे.

List of Document Required For GMC Nagpur Bharti

List of Document Required For GMC Nagpur Bharti

कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीची प्रक्रिया पार पडल्या नंतर पात्र-अपात्र उमेदवारांची यादी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ www.gmcnagpur.org वर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल. त्या नंतर उमेदवारांची निवड प्रक्रिया पार पाडण्यात येईल.