DTE Maharashtra Exam Pattern And Syllabus – तंत्रशिक्षण संचालनालय परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम

DTE Maharashtra Exam Pattern And Syllabus 2023

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

DTE Maharashtra Exam Pattern And Syllabus: Under the Directorate of Technical Education Directorate as well as Maharashtra State Board of Technical Education and various government institutions under the control of the Divisional Office, applications are invited from the qualified candidates for the recruitment of the following designations in Group C cadre through direct service. for this we have given you DTE Exam Pattern And Syllabus. Candidates for Stenographer, Senior Clerk, Director posts will get selected by Online CBT. Download DTE Maharashtra Exam Pattern And Syllabus, DTE Maharashtra Exam Pattern And Syllabus PDF, DTE Maharashtra Exam Syllabus in Marathi form below link:

तंत्रशिक्षण संचालनालय तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि विभागीय कार्यालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या विविध सरकारी संस्थांच्या अंतर्गत, खालील रचनांच्या थेट सेवेद्वारे गट क संवर्ग भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते . . यासाठी आम्ही तुम्हाला DTE परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम दिला आहे. स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक, संचालक पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन CBT द्वारे केली जाईल. डीटीई महाराष्ट्र परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम, डीटीई महाराष्ट्र परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम पीडीएफ, डीटीई महाराष्ट्र परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम खालील लिंकवर मराठी स्वरूपात डाउनलोड करा.तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

✅Download Admit Card

Directorate of Technical Education Group C Selection Process | DTE New Syllabus 

  • Online CBT
  • Document Verification

Directorate of Technical Education Exam Pattern 2023

परीक्षेचे स्वरुप :
(१) जाहिरातीमधील नमूद पदांकरिता Computer Based Test स्वरुपाची सामायिक परीक्षा घेण्यात येईल. उमेदवाराने अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे मूळ प्रमाणपत्र / दस्तऐवज यांची पडताळणी करण्याच्या अटीस अधीन राहून उमेदवारास सामायिक परीक्षेस उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येईल. परिक्षेस उपस्थित राहण्यास परवानगी दिली याचा अर्थ उमेदवार सदर पदाकरिता पात्र आहे असा होत नाही.

DTE Maharashtra Stenist (Low Grade) and Senior Clerk

लघुलेखक (निम्न श्रेणी) व वरिष्ठ लिपिक या पदांकरीता उमेदवारांची निवड करताना, मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येकी ५० गुण ठेवून २०० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा घेण्यात येईल. अशा परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळविणा-या उमेदवारांमधून निवड सूची तयार करुन, निवड सूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.

DTE Maharashtra Laboratory Assistant (Technical) Exam Pattern 2023

प्रयोगशाळा सहाय्यक (तांत्रिक) या पदाकरीता व्यावसायिक चाचणी (Proficifiency Test) घेणे आवश्यक असेल, सदर पदाकरीता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी ३० गुण ठेवून एकूण १२० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा व ८० गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. तथापि जे उमेदवार परीक्षेत किमान ४५ टक्के गुण प्राप्त करतील, असे उमेदवारच व्यावसायिक चाचणीस पात्र ठरतील. परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.

No Interview For DTE Maharashtra Group C Exam

  • शासन निर्णय क्रमांक प्रानिमं-१२१४/प्र.क्र. (४३/१४)/१३-अ, दिनांक ०५/०६/२०१४ नुसार मुलाखत (मौखिक परीक्षा) घेण्यात येणार नाही.
  • उमेदवारांना ऑन लाईन परीक्षेसाठी व व्यावसायिक चाचणी साठी (Proficifiency Test) नेमून दिलेल्या / घोषित केलेल्या केंद्रावर स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.