BMC Nirikshak Syllabus And Exam Pattern – BMC निरीक्षक भरती 2024 – 178 पदांसाठी अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप

BMC Inspector Syllabus And Exam Pattern

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

BMC Nirikshak Syllabus And Exam Pattern: The Brihanmumbai Municipal Corporation (BMC), also known as Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM), conducts recruitment exams for various posts, including Inspector positions. Recently, BMC has announced recruitment for 178 Inspector posts, and candidates who are preparing for this exam need to be familiar with the syllabus and exam pattern to strategize their preparation effectively. Know more baout BMC Nirikshak Syllabus And Exam Pattern, BMC Ward Inspector Syllabus And Exam Pattern  at below:

BMC निरीक्षक भरती 2024: अभ्यासक्रम आणि परीक्षेचा नमुना

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), जी मुंबई महानगरपालिका म्हणून देखील ओळखली जाते, त्यांनी 178 निरीक्षक पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या पदांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या स्वरूपाची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या माहितीच्या आधारे उमेदवार त्यांच्या तयारीची योग्य रणनीती आखू शकतात. बीएमसी निरीक्षक परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ प्रकाराचे (Multiple Choice Questions – MCQs) असते. परीक्षेत सर्वसाधारणपणे खालील विषयांचा समावेश केला जातो… अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘करनिर्धारण व संकलन’ खात्यातील निरीक्षक संवर्गाच्या १७८ रिक्त पदांसाठी सरळसेवा भरतीसाठी एकूण २५,४७५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या भरतीसाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपातील ऑनलाइन परीक्षा १० डिसेंबर २०२४ रोजी तीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षा वेळा सकाळी ९:०० ते ११:००, दुपारी १:०० ते ३:००, आणि सायंकाळी ५:०० ते ७:०० या असतील. परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशपत्राबाबतची माहिती उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळवली जाईल. उमेदवारांनी वेळेत प्रवेशपत्र डाउनलोड करून दिलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • परीक्षा प्रकार: वस्तुनिष्ठ (Multiple Choice Questions)
  • निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा, मुलाखत, आणि/किंवा कागदपत्र पडताळणी
  • अधिकृत संकेतस्थळ: BMC.gov.in

BMC Inspector Recruitment Syllabus 2024: Overview

  • Organization: Brihanmumbai Municipal Corporation (BMC)
  • Total Posts: 178 Inspector posts
  • Exam Mode: Online/Offline (based on the notification)
  • Selection Process: Written Examination followed by an Interview and/or Document Verification

निवडीचे निकष – Selection Criteria For BMC Ward Inspector Exam 2024

1. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील करनिर्धारण व संकलन खात्यातील “निरीक्षक” पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहीत केलेली अर्हता व अटी-शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा, संगणकावर घेण्यात येईल. सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहीत सामाजिक/समांतर आरक्षणानुसार निवडयादी तयार करण्यात येईल.

2. “निरीक्षक” पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नप्रत्रिकेचा दर्जा, पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु, त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इ.12 वी) दर्जाच्या समान राहील. सदर पदाकरिता घेण्यात येणा-या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल-

BMC-A&C Inspector Exam Pattern 2024

The question paper in these examinations will be divided into multiple time bound groups. For example, in BMC-A&C Inspector Exam, if there are five time-bound sections (A, B, C, D & E) in the question paper, each section will have 25 questions and 30 minutes of time allotted. Candidates will be restricted from proceeding to the next section until they complete the allotted time for the previous section. Additionally, candidates will not be allowed to review the questions or modify their responses for a group after the completion of its allotted time. The questions for the next section will start automatically after the completion of the allotted time for the previous section.

BMC Nirikshak Syllabus And Exam Pattern

MahaBharti.in/exam

सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा भुगोल, सामाजिक इतिहास, हवामान, स्थानिक वैशिष्ट्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विविध प्रकल्प (Project), महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, महानगरपालिका प्राधिकारी (Authorities) यांच्याशी निगडीत प्रश्न अंर्तभूत असतील. * इंग्रजी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल तसेच मराठी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल. सामान्य ज्ञान, अंकगणित व मुं.म.न.पा. अधिनियम, 1888 वर आधारीत या विषयांची ऑनलाईन परीक्षा मराठी तसेच इंग्रजी भाषेतून परीक्षार्थीच्या सोयीनुसार घेण्यात येईल. * दि.05.07.2015 च्या मराठी आवृत्तीनुसार व दि. 18.01.2016 च्या इंग्रजी आवृत्तीनुसार मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलमांची यादी सोबतच्या परिशिष्ट-1 मध्ये नमूद आहे. * मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही. (परि क्र. एमपीएम/2/8371, दि.20.06.2016)

BMC Nirikshak Exam Pattern 2024

सामान्यीकरण प्रक्रिया (BMC Inspector Exam Normalisation Method).

( एकाच दिवशी, एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये किंवा अनेक दिवसांत, एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घ्यावी लागली तर परीक्षेचा प्रथम दिवस ते अंतिम दिवस तसेच सत्र 01 ते अंतिम सत्र याबाबत ‘सामान्यीकरण प्रक्रिया (Normalisation Method)’ करण्यात येईल, ‘सामान्यीकरण प्रक्रियेचे सुत्र (Normalisation Method formula)’ व उदाहरण जाहिरातीसोबत जोडण्यात येत आहे.

BMC Inspector Exam Groupwise Time Setter

Groupwise Time Setter. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रत्येक विषयामधील सोपे, मध्यम व कठीण प्रश्न, गटामध्ये अंतर्भूत करुन त्यानुसार प्रत्येक गटासाठी वेळ निश्चित करुन त्याप्रमाणे परीक्षेमध्ये “ग्रुप लेवल टायमरची अंमलबजावणी करण्यात येईल.

BMC-A&C Inspector Syllabus 2024

BMC निरीक्षक भरती 2024: अभ्यासक्रम आणि परीक्षेचा नमुना

विषय तपशील
सामान्य ज्ञान – चालू घडामोडी (राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय)
– भारतीय इतिहास (प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक)
– भारतीय भूगोल (भारत आणि महाराष्ट्राचा आर्थिक, सामाजिक भूगोल)
– भारतीय संविधान व शासन व्यवस्था
– सामान्य विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरण)
– महाराष्ट्राची विशेष घटना आणि व्यक्तिमत्त्वे
तर्कशक्ती आणि लॉजिकल अॅबिलिटी – श्रेणी, क्रमसारणी
– ब्लड रिलेशन्स, डायरेक्शन सेंस
– एनालॉजी, क्लासिफिकेशन
– डेटा इंटर्प्रिटेशन, वेन डायग्राम्स
– लॉजिकल डिडक्शन
गणितीय क्षमता (क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड) – संख्या पद्धती
– सरलीकरण, गुणोत्तर व प्रमाण
– सरासरी, टक्केवारी
– नफा व तोटा
– वेळ आणि काम
– सरळ व चक्रवाढ व्याज
– क्षेत्रमापन आणि आकृतीमापन (क्षेत्रफळ, घनफळ)
इंग्रजी भाषा – वाचन आकलन (कॉम्प्रिहेन्शन)
– व्याकरण, वाक्य शुद्धीकरण
– समानार्थी व विरुद्धार्थी शब्द (सिनोनिम्स आणि अँटोनीम्स)
– वाक्य दोष शोधणे
– वाक्यांचे सक्रिय व निष्क्रिय रूप (Active-Passive)
– वाक्यांचे अप्रत्यक्ष व थेट भाषांतर (Direct-Indirect Speech)
पदासंबंधित ज्ञान – मुं.म.न.पा. अधिनियम, 1888 वर आधारीत या विषयांची ऑनलाईन परीक्षा

अभ्यास करण्यासाठी टिप्स: Preparation Tips For BMC Inspector Exam 2024

  1. संपूर्ण अभ्यासक्रम समजून घ्या: सर्व घटकांचा अभ्यास करा आणि योग्य वेळापत्रक बनवा.
  2. मॉक टेस्ट्स: तर्कशक्ती आणि संख्यात्मक अभियोग्यतेसाठी नियमित मॉक टेस्ट्स सोडवा.
  3. सध्या चालू असलेल्या घडामोडींचे वाचन: चालू घडामोडींसाठी वर्तमानपत्र वाचा आणि महत्त्वाच्या बातम्यांची नोंद ठेवा.
  4. महानगरपालिका नियमांचे वाचन: स्थानिक स्वराज्य नियम आणि प्रक्रिया समजून घेण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचा अभ्यास करा.

Download BMC A&C Inspector Exam Pattern And Syllabus PDF


Available for Amazon Prime