Swayam New Syllabus PDF – ‘स्वयम’ संकेतस्थळावर आता १२४७ नवीन अभ्यासक्रम!!

Swayam New Syllabus PDF

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Swayam New Syllabus PDF: One thousand 247 courses were approved for the session commencing from January 2024 in a recent meeting of the Swayam Mandal chaired by the Higher Education Secretary. Four courses prepared by UGC on Buddhist culture and tourism will also be made available. The UGC has suggested that all these new courses should be presented by the Heads of the Education Departments and Superintendents before the concerned authorities and made available for credit transfer.

देशातील उच्च शिक्षण संस्थांचे एक हजार २४७ नवीन अभ्यासक्रम ‘स्वयम’ संकेतस्थळाद्वारे राबवण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मान्यता दिली. या अभ्यासक्रमांचे प्रवेश जानेवारी २०२४ पासून सुरू होणार असून, परीक्षा मे २०२४मध्ये घेण्यात येणार आहे. यूजीसीने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

उच्च शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्वयम मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जानेवारी २०२४ पासून सुरू होणाऱ्या सत्रासाठी एक हजार २४७ अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली. तसेच यूजीसीने बुद्धिस्ट संस्कृती आणि पर्यटन या विषयावर तयार केलेले चार अभ्यासक्रमही उपलब्ध करण्यात येणार आहेत. हे सर्व नवे अभ्यासक्रम शैक्षणिक विभागप्रमुख आणि अधिष्ठात्यांनी संबंधित अधिकार मंडळासमोर मांडून श्रेयांक हस्तांतरणासाठी उपलब्ध करण्याची सूचना यूजीसीकडून करण्यात आली.

सर्व अभ्यासक्रमांसाठी श्रेयांक निश्चित करण्यात आले आहेत. देशातील आणि जगभरातीलही विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करून अभ्यास करू शकतात. नव्या एक हजार २४७ अभ्यासक्रमांमध्ये राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ अशा उच्च शिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमांचाही समावेश आहे.

Download UGC Swayam New Courses