शारीरिक आणि मैदानी चाचणी तपशील 2023 – Maharashtra State Excise Physical And Ground Test Details 2023

Maharashtra State Excise Physical And Ground Test Details 2023

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Maharashtra State Excise Physical And Ground Test Details 2023: Candidates who qualify the written test with a minimum of 45% marks in the written test will be qualified for the physical test in a maximum ratio of 1:10 of the category wise number of posts mentioned in the advertisement published in order of merit. In this article, you will get all information related to Maharashtra State Excise Physical Exam and Maharashtra State Excise Jawan Ground Test. Know Each information about Maharashtra State Excise Physical And Ground Test Details 2023 and start practicing for Maharashtra State Excise Jawan N Driver Exam 2023:

लेखी परीक्षेत किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण झालेले उमेदवार गुणवत्तेच्या क्रमाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या श्रेणीनिहाय 1:10 च्या कमाल गुणोत्तराने शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतील. या लेखात तुम्हाला महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क शारीरिक परीक्षा आणि महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क जवान ग्राउंड टेस्ट संबंधित सर्व माहिती मिळेल. जवान व जवान आणि वाहनचालक पदांसाठी संबंधित सेवाप्रवेश नियम दि.०१.०१.१९९३ मध्ये वय, शैक्षणिक अर्हतेचे व शारिरीक पात्रतेचे निकष विहीत करण्यात आले आहेत. जवान व जवान-नि-वाहनचालक पदांवरील नियुक्तीसाठी वयाची, शैक्षणिक व इतर अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड समितीद्वारे खालीलप्रमाणे प्रक्रिया राबवून निवडसूची बनवण्यात येईल.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

🎯Maharashtra State Excise Jawan Bharti Exam Pattern And Syllabus – नवीन अभ्यासक्रम 

🔥Maharashtra Excise Department Test Series – राज्य उत्पादन शुल्क मॉक टेस्ट २०२३

Maha State Excise Department Previous Year Question Paper – राज्य उत्पादन शुल्क विभाग मागील वर्षाची प्रश्नपत्रिका

The relevant service entry rules for the posts of jawans and jawans-ni-drivers in the department dt. Physical eligibility criteria have been prescribed on 01.01.1993. Naturally, screening of candidates through physical test before recruitment is in order. Along with the physical verification for the posts of Jawan and Jawan and Driver, the candidates are required to undergo a physical test/field test. To bring uniformity in physical test of candidates in different districts of the state, to prescribe guidelines for physical test. Taking into account all aspects of the recruitment process including the curriculum and bringing uniformity and transparency to it, while carrying out the selection process for the posts of jawans and jawans and drivers, the physical qualification verification of the relevant candidates is being regularized as follows.

Maharashtra State Excise Jawan Driver Physical Test Details

शारिरीक पात्रता पडताळणी :- (केवळ जवान व जवान-नि-वाहनचालक पदांसाठी)

पुरुष उमेदवारांसाठी महिला उमेदवारांसाठी
उंची किमान १६५ से.मी. किमान १६० से.मी.
छाती न फुगविता ७९ से.मी. (किमान ) व फुगवून छातीतील किमान प्रसरण ५ से.मी. आवश्यक लागू नाही
वजन लागू नाही ५० कि.ग्रॅ.

Maharashtra State Excise Physical Marks

जे उमेदवार सेवाप्रवेश नियमातील तरतूदीनुसार शारिरीक अहर्तेत पात्र ठरतील त्याच उमेदवारांची शक्यतत्याच दिवशी मैदानी चाचणी घेण्यात येईल. शारिरीक पडताळणीच्या वेळी उक्त नमुद निवड समितीच्या सदस्यांपैकी किमान चार सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शारिरीक पडताळणीच्या निष्कर्षाबाबत उमेदवाराचा आक्षेप असल्यास सदर उमेदवारांना शारिरीक तपासणीच्या फेरपडताळणीसाठी प्रत्यक्ष शारिरीक पडताळणी कार्यक्रमाची व्हिडीओ फोटोग्राफी करण्यात यावी.

शारीरिक पात्रता निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी खालीलप्रमाणे घेण्यात येईल.

अ.क्र. पुरुष उमेदवारांसाठी महिला उमेदवारांसाठी
मैदानी चाचणीचा प्रकार गुण मैदानी चाचणीचा प्रकार गुण
१.५ किमी धावणे ३० १ किमी धावणे ३०
१०० मी. धावणे ३० १०० मी. धावणे ३०
गोळा फेक २० गोळा फेक २०
एकूण ८० एकूण ८०

Maharashtra State Excise Male Grond Test Marks

वरीलप्रमाणे मैदानी चाचणी ८० गुणांची असून त्यांचे गुण विभाजन मैदानी प्रकारानुसार खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.

१. पुरुष उमेदवारांसाठी :-

अ) १.५ कि.मी. धावणे (३० गुण)

कालावधी (मिनिटांमध्ये) ३० पैकी गुण
५ मि. ३० सेकंद व त्यापेक्षा कमी ३०
५ मि. ३१ सेकंद ते ५ मि. ४५ सेकंद २८
५ मि. ४६ सेकंद ते ६ मि. ०० सेकंद २५
६ मि. ०१ सेकंद ते ६ मि. १५ सेकंद २०
६ मि. १६ सेकंद ते ६ मि. ३० सेकंद १५
६ मि. ३१ सेकंद ते ७ मि. १०
७.मि. ०१ संकद पेक्षा जास्त

ब) १०० मीटर धावणे (३० गुण)

कालावधी (मिनिटांमध्ये) ३० पैकी गुण
११.५ सेकंद व त्यापेक्षा कमी ३०
११.५१ सेकंद ते १२.५ सेकंद २८
१२.५१ सेकंद ते १३.५ सेकंद २५
१३.५१ सेकंद ते १४.५ सेकंद २०
१४.५१ सेकंद ते १५.५ सेकंद १५
१५.५१ सेकंद ते १६.५ सेकंद १०
१६.५१ सेकंद व त्यापेक्षा जास्त

क) गोळा फेक (गोळा वजन ७.२६० कि. ग्रॅ.) (२० गुण)

अंतर (मीटरमध्ये) २० पैकी गुण
८.५० मीटर व त्यापेक्षा जास्त २०
७.९० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ८.५० मीटर पेक्षा कमी १८
७.३० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ७.९० मीटर पेक्षा कमी १६
६.७० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ७.९० मीटर पेक्षा कमी १३
६.१० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ६.७० मीटर पेक्षा कमी १०
५.५० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ६.१० मीटर पेक्षा कमी
४.९० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ५.५० मीटर पेक्षा कमी
४.३० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ४.९० मीटर पेक्षा कमी
३.७० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ४.३० मीटर पेक्षा कमी
३.७० मीटर पेक्षा कमी

Maharashtra State Excise Female Ground Test Marks

२. महिला उमेदवारांसाठी

अ) १ कि.मी. धावणे (३० गुण)

कालावधी (मिनिटांमध्ये) ३० पैकी गुण
४ मि. व त्यापेक्षा कमी ३०
४ मि. ०१ सेकंद ते ४ मि. १५ सेकंद २८
४ मि. १६ सेकंद ते ४ मि. ३० सेकंद २५
४ मि. ३१ सेकंद ते ४ मि. ४५ सेकंद २०
४ मि. ४६ सेकंद ते ५ मि. १५
५ मि. ०१ सेकंद ते ५ मि. १५ सेकंद १०
५ मि. १६ सेकंद पेक्षा जास्त

ब) १०० मीटर धावणे (३० गुण)

कालावधी (मिनिटांमध्ये) ३० पैकी गुण
१४ सेकंद व त्यापेक्षा कमी ३०
१४.०१ संकंद ते १५ सेकंद २८
१५.०१ सेकंद ते १६ सेकंद २५
१६.०१ सेकंद ते १७ सेकंद २०
१७.०१ सेकंद ते १८ सेकंद १५
१८.०१ सेकंद ते २० सेकंद १०
२०.०१ सेकंद पेक्षा जास्त

क) गोळा फेक (गोळा वजन – ४ कि.ग्रॅ.) (२० गुण) 

अंतर (मीटरमध्ये) २० पैकी गुण
६ मीटर व त्यापेक्षा जास्त २०
५.५० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ६ मीटर पेक्षा कमी १६
५ मीटर व त्यापेक्षा जास्त ते ५.५० मीटर पेक्षा कमी १२
४.५० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ५ मीटर पेक्षा कमी
४.५० मीटर पेक्षा कमी

वर नमुद केल्यानुसार जवान व जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क या पदाच्या भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षेतील गुण आणि शारिरीक पात्रता पडताळणी अंती मैदानी चाचणीचे गुण यांची एकत्रित बेरीज करून त्याआधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात यावी.

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रनिमा १२१६ / प्र.क्र.६५/१३-अ, दि.१३.०६.२०१८ मधील अनुक्रमांक १२ नुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत प्रवर्ग निहाय नमुद केलेल्या पद संख्येच्या प्रमाणात उमेदवारांची गुणवत्ता क्रमानुसार उमेदवारांची प्रवर्ग निहाय निवड सूची तयार करण्यात येईल. अतिरीक्त उमेदवारांच्या संख्येची परिगणना करताना उमेदवारांची संख्या अपूर्णांकात येत असल्यास पुढील पूर्णांक संख्या विचारात घेण्यात यावी.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने तयार केलेली निवडसूची १ वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंत रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत, यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधीग्राह्य राहील. त्यानंतर ही निवडसूची व्यपगत होईल. सदर निवडसूचीमधुन गुणवत्ताक्रमानुसार नियुक्तीसाठी शिफारस केल्यानंतर शिफारस केलेला उमेदवार सदर पदावर विहीत मुदतीत रुजू न झाल्यास किंवा त्याचा चारित्र्य पडताळणी अहवाल प्रतिकूल आढळून आल्यास किंवा तो वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय मंडळाने प्रमाणपत्र सादर करण्यास अपात्र ठरल्यास संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमातील किंवा शासन नियमातील अन्य तरतुदींनुसार पात्र नसल्याचे आढळून आल्यास अथवा शिफारस केलेल्या उमेदवाराने रुजू झाल्यानंतर नजिकच्या कालावधीत राजीनामा दिल्यामुळे किंवा त्याचा मृत्यू झाल्याने पद रिक्त झाल्यास, अशी पदे त्या त्या प्रवर्गाच्या निवडसूचीतील अतिरिक्त उमेदवारांमधून वरिष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने भरण्यात यावीत. मात्र अशी कार्यवाही निवडसूचीच्या कालमर्यादेत करण्यात यावी. तसेच भविष्यात किंवा भरतीप्रक्रियेदरम्यान सामान्य प्रशासन विभागाने भरतीप्रक्रिया, निवडसूचीच्या अनुषंगाने दिलेल्या सुचना किंवा सुधारणा लागू राहतील.

🎯Download Full Rajya Utpadan Vibhag Physical And Ground Test Details 2023 PDF

1 thought on “शारीरिक आणि मैदानी चाचणी तपशील 2023 – Maharashtra State Excise Physical And Ground Test Details 2023”

Leave a Comment