येत्या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक बदलणार!! Exam Timetable 2024 Details

Exam Timetable 2024 Details

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याबाबत विचार सुरू झाला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षाची दहावी आणि बारावीची परीक्षा १५ ते २० दिवसांनी लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जुलैमध्ये होणारी पुरवणी परीक्षा जूनमध्ये घेण्याबाबत चाचपणी सुरू आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थ्याला फेब्रुवारी आणि जून अशा दोन सत्रांमध्ये परीक्षेची संधी मिळणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दहावी आणि बारावीची परीक्षा १५ ते २० दिवसांनी लवकर सुरू होण्याची शक्यता :

याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, शैक्षणिक धोरणात दहावी आणि बारावीची परीक्षा सत्रनिहाय घेण्याबाबत सुचविले आहे. यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सत्रनिहाय परीक्षा घेण्याची चाचपणी केली. मात्र, त्याऐवजी वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याबाबत त्यांनी नव्याने विचार सुरू केला आहे. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांतून समोर आले आहे. त्यानुसार राज्य मंडळाकडून प्रचलित पद्धतीनुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोनदा घेण्यात येतात. फेब्रुवारी-मार्च सत्रातील परीक्षेच्या निकालात कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारची संधी दिली जाते. त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही उत्तीर्ण होण्याची संधी मिळते. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाकडून आगामी फेब्रुवारी-मार्च महिन्यात सुरू होणारी परीक्षा १५ ते २० दिवसांपूर्वी आयोजित करण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे.

असे झाल्यास, बारावीची परीक्षा वेळेत संपून निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल मे मेहिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा (फेरपरीक्षा/ पुरवणी परीक्षा) होतील. त्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येईल. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना दोन संधी मिळतील.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

१७ मे २०२० अपडेट – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) दहावी व बारावीच्या उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक सोमवारी १८ मे २०२० रोजी जाहीर करणार आहे. यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ.रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली आहे.

“#CBSE is taking into consideration some additional technical aspects before finalising the datesheets of the board exams of classes 10th and 12th, due to which, the date sheets will now be released by Monday i.e. 18-05-2020. Inconvenience caused is sincerely regretted,” HRD minister tweeted.

केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की ‘करोना व्हायरस कोविड -१९ च्या संकटामुळे सीबीएसईच्या उर्वरित परीक्षांबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.

केंद्रीय मंत्री निशंक पोखरियाल ने शनिवार को ही डेटशीट जारी करने वाले थे लेकिन किसी वजह से नहीं की। उन्होंने ट्विटर पर बताया कि अब डेटशीट सोमवार तक जारी की जाएगी। हालांकि इस बात की जानकारी पहले ही दे दी गई है कि एग्जाम कब से कब तक होंगे। सीबीएसई बोर्ड 10वीं और 12वीं के बचे हुए एग्जाम 1 से 15 जुलाई तक होंगे। अब सिर्फ यही घोषणा होना बाकी है कि किस सब्जेक्ट का एग्जाम कब होगा।

CBSE Exam Timetable 2020

आज ही अनिश्चितता दूर करून विद्यार्थ्यांची उत्सुकता पाहता आम्ही इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तारीख संध्याकाळी ५ वाजता जाहीर करीत आहोत.’ या ट्विटसह केंद्रीय मंत्र्यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना आज १६ मे २०२० रोजी संध्याकाळी ५ वाजता ट्विटरवर सीबीएसईच्या परीक्षांसंदर्भातील माहितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. परंतु आता प्राप्त बातमी नुसार हा निकाल आता सोमवारी प्रकाशित होणार आहे.

काही दिवसांपूर्वी सीबीएसईने जाहीर केले होते की दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा १ ते १५ जुलै २०२० दरम्यान घेण्यात येतील. दहावीची परीक्षा फक्त ईशान्य दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी असेल तर १२ वी च्या उर्वरित परीक्षा देशभरात घेण्यात येणार आहेत.

लॉकडाऊनमुळे वेळेचा अभाव असल्याने केवळ प्रमुख २९ विषयांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड