JEE मेनशिवाय बीटेक आणि बीईमध्ये प्रवेश!! जाणून घ्या

Engineering Admission 2022

Engineering Admission 2022

Engineering Admission 2022: Students who want to get admission in engineering are required to take JEE Main exam. Now AICTE has changed its criteria. As per the guidelines of All India Council for Technical Education, it is not mandatory to take JEE Main exam for admission in BTech and BE. Further details are as follows:-

ज्या विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग प्रवेश घ्यायचा असेल त्यांना जेईई मेन परीक्षा देणे अनिवार्य असते. आता एआयसीटीईने आपल्या निकषांमध्ये बदल केला आहे. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या निर्देशांनुसार बीटेक आणि बीईमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन ही परीक्षा देणे अनिवार्य नसेल. या अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या वर्षापासून लॅटरल प्रवेशाची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

AICTE has written to all the universities and states for this. Students with Diploma in Engineering courses, BSc degree and Vocational Diploma in this field can apply.

Engineering Admission

  • एआयसीटीईचे सल्लागार डॉ. रमेश उन्नीकृष्णन यांनी पाठवलेल्या पत्रात बीटेक आणि बीईच्या द्वितीय वर्षाचे प्रवेश आता लॅटरल एन्ट्रीद्वारे करता येणार असल्याचे या पत्रामध्ये म्हटले आहे.
  • यासाठी एआयसीटीईने प्रवेश पात्रता आणि नियमही निश्चित केले आहेत.
  • यामध्ये प्रवेशाची पात्रता तीन स्तरांवर निश्चित करण्यात आली आहे.
  • येथे बीटेक आणि बीई प्रोग्राम्सच्या प्रवेशासाठी, बॅचलर ऑफ व्होकेशनल हे डिप्लोमा इन इंजिनीअरिंग आणि बीएससीच्या समकक्ष मानले जाणार आहे.

Eligibility level

  • दोन किंवा तीन वर्षांचे डिप्लोमाधारक विद्यार्थी इंजिनीअरिंग आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही शाखेत प्रवेश घेऊ शकतात.
  • सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • बीएससी पदवी असलेले विद्यार्थी पार्श्विक प्रवेशाद्वारे देखील नोंदणी करू शकतात. अ
  • से असले तरीही पदवी (४५ टक्के गुण) सोबत बारावीमध्ये गणिताचा अभ्यास करणे अनिवार्य आहे.
  • यामध्येही एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

Students with professional diplomas in engineering and technology will also be admitted through lateral entry. Universities will have to make arrangements for these students to take bridge courses later. There will be special coaching or preparation on subjects like Mathematics, Physics, Engineering, Drawing etc. This will enable the general students to understand the curriculum better.


Engineering Admission  : राज्याच्या सामायिक प्रवेश कक्षाने (CET Cell) तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक सोमवारी प्रसिद्ध केले. सुधारित वेळापत्रकानुसार २१ जानेवारीपासून कॉलेज सुरू होणार आहेत. इंजिनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, एमसीए आणि एमटेक आदी अभ्यासक्रमांसाठी हे वेळापत्रक लागू असेल.

पहिल्या फेरीत जाहीर झालेल्या जागेवरील प्रवेश आता २० जानेवारी रोजी दुपारी तीनपर्यंत विद्यार्थी त्यांच्या लॉग इनमधून मान्य करू शकतील किंवा स्वीकारू शकतील. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून विद्यार्थ्यांना २० जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करता येईल. २१ जानेवारी रोजी दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील प्रसिद्ध होईल. २१ ते २३ जानेवारीदरम्यान विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदवता येतील. २५ जानेवारी रोजी दुसऱ्या फेरीचे प्रवेश जाहीर होतील. २६ ते ३० जानेवारी (दुपारी तीनपर्यंत) विद्यार्थ्यांना आपल्या लॉग इनमधून प्रवेश मान्य करता येईल. २७ ते ३० जानेवारी (सायंकाळी पाचपर्यंत) विद्यार्थ्यांना संबंधित संस्थेत शुल्क भरून व कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित करता येईल. २१ जानेवारीपासून सर्व कॉलेज सुरू होतील. या प्रवेशप्रक्रियेसाठी पाच फेब्रुवारी ही अंतिम तारीख असेल.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने या विद्यार्थ्यांना खुला गट किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (इडब्ल्यूएस) या प्रवर्गातून प्रवेश घेण्यास सांगण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. त्यानुसार २० जानेवारीपर्यंत विविध कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर हे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.


Engineering Admission  2021 : 4,100 engineering seats reserved from defense quota – संरक्षण कोटय़ा अंतर्गत अॅडमिशन न मिळाल्याने इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्रात 4 हजार 100 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या असून संरक्षण कोटय़ा अंतर्गत केवळ एक हजार 45 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती राज्य सरकारतर्फे आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

इंजिनीअरिंगच्या प्रथम व द्वितीय वर्षासाठी 5 टक्के संरक्षण कोटय़ाअंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी इंडियन एक्स सर्व्हिस लीग मुंबईचे अध्यक्ष सुजित आपटे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

त्या वेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने इंजिनीअरिंगच्या विविध कोर्सेसकरिता 5 टक्के संरक्षण कोटय़ाअंतर्गत जागा मिळत नसल्याचे खंडपीठाला सांगितले. त्यावर राज्य सरकारच्या वतीने अॅड. बी.व्ही. सामंत यांनी बाजू मांडली. त्यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले की, विविध जिल्ह्यांत आवश्यक तेवढय़ा जागा संरक्षण कोटय़ाअंतर्गत आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या जागांच्या तुलनेने या कोटय़ातून अॅड. मिशन घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. या आकडेवारीनुसार इंजिनीअरिंगच्या विविध कोर्सेससाठी 1 लाख 23 हजार 895 जागा असून डिफेन्स कोटय़ाअंतर्गत 4 हजार 100 जागा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

सोर्स : सामना


Engineering Admission 2020: DTE extended date for direct second year engineering diploma admission 2020-21 – तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या थेट द्वित्तीय वर्ष पदविका इंजिनीअरिंग व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना आता शनिवार, २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. तर अंतिम गुणवत्ता यादी २९ नोव्हेंबरला वेबसाइटवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांमधील थेट द्वित्तीय वर्ष इंजिनीअरिंग पदविका व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया १७ ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. परंतु, करोनाचा प्रभाव आणि कॉलेजे बंद असल्याने विद्यार्थ्यांचा यंदा या प्रवेश प्रक्रियेला कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात येत आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करण्यासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच २४ नोव्हेंबरला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. या यादीमध्ये तक्रार असल्यास विद्यार्थ्यांना २५ ते २७ नोव्हेंबरपर्यंत तक्रार नोंदविता येईल. तसेच अंतिम गुणवत्ता यादी २९ नोव्हेंबरला जाहीर होईल.


Engineering Admission 2020 : इंजिनीअरिंग प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Engineering Admission 2020 : इंजिनीअरिंग प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट ५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. यामुळे सीईटीमध्ये किमान १ गुण आणि बारावीला किमान ४५ टक्के गुण मिळवणारा विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार आहे. यापूर्वी बारावीच्या गुणांची अट ही ५० टक्के इतकी होती. मागासवर्गासाठी किमान गुणांची अट ही ४० टक्के इतकी असणार आहे.

इंजिनिअरिंग तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश कसे करायचे याबाबतचे राजपत्र राज्य सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा प्रसिद्ध केले. यामध्ये इंजिनीरिंग पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच गणित (पीसीएम) या तीन विषयांमध्ये किमान ४५ टक्के गुण तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक असणार आहे. यापूर्वी ही अट अनुक्रमे ५० व ४५ टक्के इतकी होती. नव्या निकषांनुसार पाच टक्क्यांची अधिक सवलत देण्यात आली आहे.

कर्नाटकसह इतर राज्यांप्रमाणे महारष्ट्रातही ही अट शिथिल करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. मात्र गुणवत्तेचा विचार करत ती मान्य केली जात नव्हती. इंजिनीअरिंग सोबतच औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, विधी पाच वर्षे अभ्यासक्रम, बॅचलर इन फाइन आर्ट, बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमांसाठीचे बारावीच्या किमान गुणांची अट ही ५० व ४५ टक्क्यांवरून अनुक्रमे ४५ व ४० टक्के अशी करण्यात आली आहे. यामुळे कमी गुण मिळालेले विद्यार्थी कर्नाटकला प्रवेश घेण्यासाठी जातात. ते तेथे न जाता आपल्या राज्यात प्रवेश घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

याचबरोबर दरवर्षी रिक्त राहणाऱ्या हजारो जागा भरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची टीकाही शिक्षण वर्तुळातून होऊ लागली आहे. तसेच आधीच देशातील इंजिनीअरिंग शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रोजगार कौशल्याबाबत अनेक कंपन्या प्रश्न उपस्थित करत त्यांना पुन्हा प्रशिक्षण देतात. असे असताना ही अट आणखी शिथिल करणे म्हणजे गुणवत्तेसोबत तडजोड होईल, असे मत इंजिनीअरिंग कॉलेजच्या एका माजी प्राचार्यांनी नोंदविले.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड