DVET ITI प्रवेशाची मेरिट लिस्ट,१०वीचे १००% गुण मिळालेले २३ विद्यार्थी शर्यतीत- खालील लिंक वरून डाउनलोड करा!! – DVET ITI Merit List PDF, Download @admission.dvet.gov.in

DVET ITI List 2026

DVET ITI Merit List PDF, Download – The admission process for the August 2026 session in the state’s government and private Industrial Training Institutes (ITIs) is receiving an overwhelming response from students. So far, 1,12,246 students have registered for admissions, out of which around 92,000 candidates have successfully completed their application process. As a crucial milestone in this admission journey, the primary merit list was declared on June 25, and after carefully scrutinizing all received objections, the final merit list has now been officially published. Aspiring candidates can check their selection status and complete their DVEI ITI Merit List PDF Download by logging into the official portal using their credentials to secure their rank card for the upcoming seat allotment rounds through DVET ITI Merit List PDF, Download @admission.dvet.gov.in.

DVET ITI List 2026: राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) ऑगस्ट २०२६ सत्राच्या प्रवेशप्रक्रियेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत एक लाख १२ हजार २४६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून, त्यापैकी सुमारे ९२ हजार विद्यार्थ्यांनी अर्जप्रक्रिया पूर्ण केली आहे. प्रवेशप्रक्रियेतील पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणून २५ जून रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असून, हरकतींची छाननी केल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. खालील लिंक वरून आपण मेरिट लिस्ट बघू शकता! 

राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी आज, २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. यंदा ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या ६७४ विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याने चुरस वाढली आहे. प्रथम फेरीचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश निश्चितीची तारीख येथे पहा. राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी आज, गुरुवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. यासोबतच नियमित प्रवेश फेऱ्यांचे संपूर्ण वेळापत्रकही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, यंदा दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवलेल्या २३ विद्यार्थ्यांनीही ‘आयटीआय’ प्रवेशासाठी अर्ज केल्याने कौशल्याधारित शिक्षणाकडे गुणवंत विद्यार्थ्यांचा वाढता कल अधोरेखित झाला आहे.

यंदाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यभरातून एकूण एक लाख ७० हजार ३९९ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात एक लाख ४२ हजार ५९२ मुलांचा, तर २७ हजार ८०७ मुलींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्जसंख्येत किरकोळ घट झाली असली, तरी गुणवंत विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय असल्याचे चित्र दिसून येत आहे.संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ३ ते ७ जुलैदरम्यान संबंधित संस्थेत जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. याच कालावधीत दुसऱ्या फेरीसाठी पर्याय भरण्याची संधीही उपलब्ध असेल. त्यानंतर १२ जुलैला दुसरी, २१ जुलैला तिसरी आणि ३० जुलैला चौथी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून (डीव्हीईटी) राज्यातील सर्व शासकीय आणि मान्यताप्राप्त खासगी आयटीआय संस्थांमधील प्रवेशप्रक्रिया यंदाही केंद्रीकृत ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र आयटीआय प्रवेश: महत्त्वाचे टप्पे

  • पहिली गुणवत्ता यादी : २ जुलै
  • प्रवेशनिश्चिती : ३ ते ७ जुलै
  • दुसरी गुणवत्ता यादी : १२ जुलै
  • प्रवेशनिश्चिती : १३ ते १६ जुलै
  • तिसरी गुणवत्ता यादी : २१ जुलै
  • चौथी गुणवत्ता यादी : ३० जुलै
  • प्रवेशनिश्चिती : ३१ जुलै ते ४ ऑगस्ट
  • नव्याने नोंदणी व अर्जनिश्चिती : ३ जुलै ते ४ ऑगस्ट
  • संस्थास्तरीय समुपदेशन फेरीचे वेळापत्रक : १ ऑगस्टपर्यंत जाहीर होणार

PDF List Download Link 


Provisional Merit List 2026 – राज्यातील ‘ITI’ मधील प्रवेशप्रक्रियेचा कोणता टप्पा सुरू आहे, पुढे कोणता टप्पा सुरू होईल, याबाबत अचूक, अद्ययावत माहिती आता विद्यार्थी-पालकांना प्रवेशाच्या पोर्टलवर उपलब्ध झाली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ‘ॲक्टिव्हिटी टाइमलाइन’ हे विभाग अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रवेशप्रक्रियेची माहिती अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकणार आहे. शासकीय, खासगी आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत यंदाच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील एकूण एक हजार चार आयटीआयमधील एकूण एक लाख ५७ हजार ६६४ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी २१ मेपासून सुरुवात झाली. पहिल्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना २३ जूनपर्यंत व्यवसाय आणि संस्थानिहाय पर्याय, प्राधान्य सादर करता येणार आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी २५ जूनला, तर गुणवत्ता यादी २६ जूनला सादर होईल. ‘आयटीआय’मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी प्रत्येक शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये सकाळी १० ते ११ या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. सर्व शासकीय आणि मान्यताप्राप्त खासगी आयटीआयमधील संलग्न व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्यांची यादी ‘https://admission.dvet.gov.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांनी दिली.

राज्यातील प्रवेशाच्या जागा तपशील ‘आयटीआय’ची संख्या प्रवेशासाठी उपलब्ध जागा शासकीय ४१८ ९७, ०८८ खासगी ५८६ ६०, ५७६ एकूण १, ००४ १, ५७, ६६४ नोंदणी केलेले विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी केलेले १, १२, २४६ अर्ज पूर्ण केलेले ९१, ८५९ शुल्क भरलेले ८७, ९७२ पुणे जिल्ह्यातील जागा तपशील ‘आयटीआय’ची संख्या प्रवेशाच्या जागा शासकीय १६ ५, ५८४ खासगी ४६ ६, ८६८ एकूण ६२ १२, ४५२

प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी संकेतस्थळ

https://www.dvet.gov.in/

https://admission.dvet.gov.in/

 

ही प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारे पार पडणार असून, विद्यार्थिनींनी वेळेत प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड