ITI पहिली यादी ९ जुलै रोजी होणार जाहीर – २६ जून पर्यंत प्रवेशअर्ज भरता येणार! – DVET ITI Merit List PDF, Download @admission.dvet.gov.in

DVET ITI Merit List 2025

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने राज्यातील कौशल्य शिक्षण देणाऱ्या आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना २६ जूनपर्यंत अर्ज करता येणर असून, प्राथमिक गुणवत्तायादी ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच पहिली गुणवत्ताेयादी ९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यामध्ये १ हजार ७ आयटीआय संस्था असून, त्यामध्ये शासकीय ४१९, तर खासगी ५८८ संस्था आहेत. आयटीआयच्या विविध अभ्यासाक्रमांसाठी १५ मेपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास १ लाख ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या प्रवेशासाठी नोंदणी अर्ज भरले आहेत. नोंदणी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत. त्याचप्रमाणे ६८ हजार ५८३ विद्यार्थ्यांनी आयटीआय अभ्यासाक्रमांचे पसंतीक्रम भरले आहेत.

 

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सुरूवातील फक्त नाेंदणी वेळापत्रक जाहीर केले होते, मात्र आता प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २६ जूनपर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेशाची प्राथमिक गुणवत्तायादी ३० जून रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्राथमिक गुणवत्तायादीबाबत विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. हरकती नोंदवल्यानंतर संचालनालयाकडून अंतिम गुणवत्तायादी जाहीर करण्यात येणार आहे. यांनतर ९ जुलै रोजी पहिली गुणवत्तायादी जाहीर होणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या नियमित चार फेऱ्या आणि त्यानंतर संस्थास्तरावर समुपदेशन प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहेत.


व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दुसऱ्या फेरीसाठी शासकीय आयटीआयमध्ये ६१ हजार ८९३ जागा, तर खासगी आयटीआयमध्ये ३४ हजार ८१३ जागा अशा एकूण ९६ हजार ७०६ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी सरकारी संस्थांमध्ये ४४ हजार १०९ आणि खासगी आयटीआयमध्ये ६ हजार ९९० अशा एकूण ५१ हजार ९९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. पहिल्या फेरीत एकूण १ लाख ५० हजार ३४४ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ८२ हजार ४३७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता. यात शासकीय आयटीआयमध्ये ६७ हजार ४४४, खासगी आयटीआयमध्ये १४ हजार ९८९ विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी शासकीय संस्थांमध्ये ३० हजार ९५४ उमेदवारांनी आणि खासगी संस्थांमध्ये ९ हजार २२७ अशा एकूण ४० हजार १८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. निवड यादी जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना निवडपत्र त्यांच्या लॉग-इनमध्ये जाऊन डाउनलोड करता येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमातील पहिल्या पसंतीक्रमाच्या संस्थेत प्रवेश मिळाला असल्यास त्यांना प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे. प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थ्यांना पुढील फेरीत सहभागी होता येणार नाही, असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

DVET ITI Timetable Schdule 2025 Important Dates – असे असेल वेळापत्रक

  • ऑनलाईन अर्जासाठी मुदत – २६ जून, सायंकाळी ५ पर्यंत
    प्रवेश अर्ज निश्चित करणे – २७ जून, सायंकाळी ५ पर्यंत
  • पहिल्या फेरीसाठी प्राधान्य सादर करणे – २७ जून, सायंकाळी ५ पर्यंत
    प्राथमिक गुणवत्तायादी – ३० जून, सकाळी ११ वाजता
  • हेही वाचा
    मोबाइल फोन केवळ चैन नाही, तर अपरिहार्य गरज; मोबाइल टॉवरला एनओसी नाकारल्यावरून उच्च न्यायालयाची टिप्पणी
  • गुणवत्ता यादीवरील हरकती नोंदविणे – १ जुलै, सायंकाळी ५ पर्यंत
    अंतिम सर्वसाधारण गुणवत्तायादी – ३ जुलै, सायंकाळी ५ वाजता
  • पहिली यादी – ९ जुलै, सायंकाळी ५ वाजता
    प्रत्यक्षात संस्थांमध्ये प्रवेश – १० ते १५ जुलै, सायंकाळी ५ पर्यंत
  • दुसरी प्रवेश फेरी – २३ ते २८ जुलैदरम्यान
    तिसरी प्रवेश फेरी – २८ जुलैपासून
  • चौथी प्रवेश फेरी – ४ ते ८ ऑगस्टदरम्यान
    संस्था स्तरावर समुपदेश फेरी – २१ ऑगस्ट रोजी

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. निलम धोत्रे says

    मला झाडु खात्यात काम करायचे आहे ते कसे अर्ज करावेत मला जरा कल्पना द्यावी

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड