आयटीआय प्रवेशासाठीची दुसरी निवड यादी जाहीर! – DVET ITI Merit List 2023 PDF, Download @admission.dvet.gov.in

DVET ITI Merit List 2023

DVET ITI Merit List 2024 -राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांची दुसर्‍या फेरीची निवड यादी जाहीर झाली आहे. या फेरीत ५१ हजार ९९ विद्यार्थ्यांना शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये प्रवेश मिळणार असून २८ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान दुसर्‍या यादीचे प्रवेश होणार आहेत.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दुसऱ्या फेरीसाठी शासकीय आयटीआयमध्ये ६१ हजार ८९३ जागा, तर खासगी आयटीआयमध्ये ३४ हजार ८१३ जागा अशा एकूण ९६ हजार ७०६ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी सरकारी संस्थांमध्ये ४४ हजार १०९ आणि खासगी आयटीआयमध्ये ६ हजार ९९० अशा एकूण ५१ हजार ९९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. पहिल्या फेरीत एकूण १ लाख ५० हजार ३४४ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ८२ हजार ४३७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता. यात शासकीय आयटीआयमध्ये ६७ हजार ४४४, खासगी आयटीआयमध्ये १४ हजार ९८९ विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी शासकीय संस्थांमध्ये ३० हजार ९५४ उमेदवारांनी आणि खासगी संस्थांमध्ये ९ हजार २२७ अशा एकूण ४० हजार १८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. निवड यादी जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना निवडपत्र त्यांच्या लॉग-इनमध्ये जाऊन डाउनलोड करता येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमातील पहिल्या पसंतीक्रमाच्या संस्थेत प्रवेश मिळाला असल्यास त्यांना प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे. प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थ्यांना पुढील फेरीत सहभागी होता येणार नाही, असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

DVET ITI Merit List 2023 Download

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत असलेल्या राज्यातील सरकारी आणि खासगी आयटीआयच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर होणार आहे. आयटीआयमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आला आहे. यंदा तब्बल पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आयटीआयच्या एकूण प्रवेशासाठी आतापर्यंत २ लाख ७५ हजार ६१७ जणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी २ लाख ६० हजार २ जणांचे अर्ज ऑनलाइन प्रक्रियेत भरून पूर्ण झाले आहेत. २ लाख ५६ हजार १६२ जणांनी आयटीआयच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले शुल्क भरले आहे. त्यातील २ लाख ३ हजार ४०८ जणांचे अर्ज पूर्ण भरून कन्फर्म झाले आहेत.

 

The MH Directorate of Vocational Education and Training has released the online applications for various trades for the admission to Colleges from 12 June 2023 to 11 July 2023. The candidates who have registered themselves will be provided with the DVET Maharashtra ITI 1st Merit List 2023 in which the ranks will be given to the students based on their previous performance. The ranks will be given to them and based on the ranks, the admission will be provided to the candidates. The candidates can get the DVET ITI Merit List 2023 by 13 July 2023 on the website and once they have checked the ranks, they can proceed towards the counseling.

 

Authority Directorate of Vocational and Education Training
Admission by Industrial Training Institute
Admission for Various trades
Registration dates 12 June to 11 July 2023
DVET Merit List 2023 13 July 2023
Final merit list 16 July 2023
Official Website www.admission.dvet.gov.in

 

MH DVET ITI Admission List 2023 Dates

Event  Dates 
Application start 12 June 2023
Application end 11 July 2023
DVET ITI Merit List 2023 (Provisional) 13 July 2023
Final merit list 16 July 2023
DVET MH ITI Seat Allotment Result 2023 20 July 2023
Confirmation of admission 23 July 2023

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. निलम धोत्रे says

    मला झाडु खात्यात काम करायचे आहे ते कसे अर्ज करावेत मला जरा कल्पना द्यावी

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड