कागदपत्र पडताळणी वेळापत्रक प्रकाशित – DVET ITI Document Verification
DVET ITI Document Verification
DVET 1457 ITI Craft Instructor – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्प निदेशक- १४५७ पदे भरण्याकरिता दिनांक १७/०८/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्र.१ / २०२२ च्या अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांची सामायिक परीक्षा (CBT-१) दि.२८ व २९/०९/२०२२ रोजी घेण्यात आली होती. सामायिक परीक्षेत (CBT – १) किमान ४५% (५४ गुण) (Normalization – Mean Standard Deviation Method नुसार) प्राप्त करुन व्यावसायिक चाचणी (CBT – २) करिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक ०५/०६/२०२३ ते ११/०६/२०२३ व १३/०६/२०२३ रोजी व्यावसायिक चाचणी (CBT – २) घेण्यात आली होती. तद्नंतर सामायिक परीक्षा (CBT-१) व व्यावसायिक चाचणी (CBT -२) यामध्ये २०० गुणांपैकी किमान ४५% (९०) गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्र/ कागदपत्र पडताळणीच्या (Document Verification) अधिन राहून तात्पुरत्या गुणवत्ता याद्या (Provisional Merit List) दिनांक ०६/१०/२०२३ रोजी व उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे तात्पुरत्या निवड सूची (Provisional Selection List) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. खालील लिंक वरून आपण PDF बघू शकता.
Comments are closed.