…म्हणून हॉस्पिटलची नोकरी नको रे बाबा!
Don't want a Hospital Job
अहमदनगर: सरकारने कितीही आदेश आणि सूचना दिल्या तरीही प्रत्यक्षात हॉस्पिटमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व वॉर्डबॉयला घरमालकांकडून राहते घर खाली करण्यास सांगितले जात आहे. स्वत:चे घर असलेल्या ठिकाणीही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने अनेकांवर ही नोकरी नको म्हणण्याची वेळ आली आहे.
सद्यस्थिती नगरमध्ये हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. आगामी काही दिवसांमध्ये आरोग्यसेवा देतांना समस्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. करोनामुळे निर्माण झालेली भीती आणि गैरसमजांचा फटका आरोग्यसेवा देणाऱ्या हॉस्पिटल व दवाखान्यांना बसू लागला आहे. सरकारी व खाजगी दवाखान्यांमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी शहरी भागात भाडेतत्वावर बंगले, फ्लॅट किंवा रूम घेऊन राहतात. त्या सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागत आहे.
करोना आजाराचे रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालय किंवा बुथ हॉस्पिटलमध्ये भरती केले जात आहेत. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एकाही खासगी रुग्णालयात करोना बाधित रुग्ण भरती झाला नाही. तरीही हॉस्पिटलमध्ये काम करणारे संबंधित आरोग्य कर्मचारी करोना रुग्णाच्या संपर्कात आले असतील, या शंकेतून अनेक ठिकाणी घरमालकांकडून त्या आरोग्य सेवेत काम करणाऱ्यांच्या कुटंबाला घर खाली करण्यास सांगितले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यासंबंधी एका मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले, ‘आमच्या कुटुंबातील सदस्य तसेच नातेवाईकांकडून आम्हाला करोनापासून काळजी घेण्याचे सल्ले दिले जातात. मोठ्या मानसिक तणावाचे ओझे पाठीवर घेत आम्ही आरोग्यसेवेचे काम करत आहोत. अशा परिस्थितीत कुटुंबाच्या राहण्याचीच अडचण होत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ऐनवेळी राहण्यासाठी जागा मिळणे अवघड आहे. त्यातही हॉस्पिटलमध्ये काम करतो म्हटले तर कोणी राहू देण्यास तयार होत नाही. या समस्यांना वैतागून अनेक हॉस्पिटलमधील स्टाफ नोकरीवर पाणी सोडत आहेत. शहरातील अनेक हॉस्पिटलमधील स्टाफ सुमारे निम्याने कमी झाल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे. वास्तविक पाहता हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांनाही त्यांच्यासह कुटुंबाची काळजी असते. त्यामुळे ते स्वतः वैयक्तिकरित्या आरोग्याची काळजी घेतात. ही बाब सर्वांनीच ध्यानात घ्यायला हवी, असे या डॉक्टरांनी सांगितले.
सध्या आपल्याकडे ‘करोना’ दुसऱ्या टप्प्यात आहे. दुर्दैवाने ‘करोना’ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली तर वैद्यकीय सेवा देण्यासाठी राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविका, होमगार्डला प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला कौटुंबिक व सामाजिक कारणांमुळे खासगी रुग्णालयातील संख्या झपाट्याने कमी होत असेल तर ‘करोना’च्या लढाईत हॉस्पिटलकडे पुरेसा स्टाफही राहणार नाही. याबाबत प्रशासनाने पुढाकार घेत तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.