वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत एम.एस्सी. नर्सिंग व पोस्ट बेसिक नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू !! | DMER Mumbai Bharti 2026

DMER Bharti 2026

DMER Bharti 2026: सक्षम (नोडल) अधिकारी तथा सह संचालक (वैद्य) संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशाधन, दुबई यांच्यामार्फत खालील शिक्षण संस्थेमध्ये एम. एस्सी. नर्सिंग/पोस्ट बेसिक बी.एस्सी नर्सिंग/आणि पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रीक नर्सिंग/पोस्ट बेसिक डिप्लोमा इन सायकॅट्रीक नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी सन २०२६ – २०२७ करिता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

वयोमर्यादा:- एम. एस्सी. नर्सिंग, पोस्ट बेसिक बी.एस्सी. नर्सिंग, पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रीक नर्सिंग, पोस्ट बेसिक डिप्लोमा इन सायकॅट्रीक नर्सिंग या अभ्यासक्रमास खुल्या प्रवर्गाकरीता ४५ वर्ष व राखीव प्रवर्गाकरीता ५० वर्ष राहील.
DMER Bharti 2026

DMER Bharti 2026

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन (DMER) विभागाची गेल्या वर्षभरापासून रखडलेली भरती प्रक्रिया आता तरुण उमेदवारांच्या मुळावर उठली आहे. लेखी परीक्षा आणि सर्व प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होऊनही तब्बल ११०७ पात्र उमेदवार अद्याप नियुक्ती पत्राच्या प्रतीक्षेत आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने या भरतीची जाहिरात १९ जून २०२५ रोजी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर ९ जुलै २०२५ पर्यंत अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली. लेखी परीक्षेची तयारी करून सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२५ दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल आणि तात्पुरती गुणवत्ता यादी जानेवारी २०२६ मध्ये जाहीर करण्यात आली. त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडली. मार्च २०२६ अखेर पात्र व अपात्र उमेदवारांच्या याद्याही विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र, दुर्दैवाने या सर्व घडामोडींनंतरही अंतिम निवड यादी आणि प्रत्यक्ष नियुक्ती आदेश जाहीर करण्यात आलेले नाहीत.

सरकारी नोकरीच्या आशेने जुन्या नोकऱ्या सोडलेल्या या तरुणांवर आतामोठे आर्थिक संकट ओढवले असून, राज्याची आरोग्य व्यवस्था मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे कोलमडत असल्याचे विदारक चित्र आहे.
DMER ची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर लवकरच नियुक्ती मिळेल, या आशेने अनेक उमेदवारांनी आपल्या पूर्वीच्या खाजगी नोकऱ्यांचा राजीनामा दिला. मात्र, वर्ष उलटूनही नवीन ठिकाणी रुजूहोता न आल्याने हे सर्व तरुण उद्विग्न अवस्थेत आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, बँकांचे हप्ते कसे भरायचे, असे अनेक प्रश्न या उमेदवारांसमोर आ वासून उभे आहेत. प्रशासनाच्या या लालफितशाहीमुळे या गुणवान उमेदवारांचे भवितव्यच्च धोक्यात आले आहे.

या प्रकरणातील सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे, एकीकडे ११०७ पात्र तरुण नियुक्तीसाठी शासनाचे उंबरठे झिजवत आहेत, तर दुसरीकडे राज्य राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी राज्याच्या आरोग्य सेवेवर प्रचंड ताण येत आहे. एका कर्मचाऱ्यावर दोन ते तीन जणांच्या कामाचा ताण पडत असल्याने रुग्णांच्या सेवेवरही त्याचा थेट परिणाम होत आहे.


Previous Posts:

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

DMER Bharti 2026

DMER Mumbai Bharti 2026 : Directorate of Medical Education & Research (DMER) Mumbai is going to recruit for a posts of “Legal Officer on Contract Basis”. There are total of 02 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates may apply by offline before last date. Last date for submitting offline application is 23rd of March 2026. For more details about DMER Mumbai Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत “कंत्राटी तत्वावर विधी अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई भरती २०२६

  • पदाचे नावकंत्राटी तत्वावर विधी अधिकारी
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई  
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र शासन संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई, ४था मजला, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, फोर्ट, मुंबई-४०० ००१.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२३ मार्च २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://www.med-edu.in/

How To Apply For Directorate of Medical Education & Research Mumbai Notification 2026

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For DMER Mumbai Bharti 2026

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/lpr77 
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.med-edu.in/

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड