सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त; बघा संपूर्ण माहिती!! | DMER Mumbai Bharti 2024

DMER Mumbai Offline Application 2024

Directorate of Medical Education & Research Bharti 2024

DMER Mumbai Bharti 2024:डॉक्टरांना सरकारी सेवा करण्यात रसच नसल्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत, असा दावा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने केला आहे. यासंदर्भात विभागाद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मागणीवरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२१ मध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांची १ हजार २०१ पदे भरण्यासाठी जाहिरात दिली होती. परंतु, केवळ ८३० डॉक्टर या पदांसाठी पात्र ठरले आणि त्यानंतर केवळ ७७३ डॉक्टरच कागदपत्रे पडताळणी प्रक्रियेत सहभागी झाले. करिता, ७७३ डॉक्टरांनाच नियुक्ती देण्यात आली. याशिवाय, २०२३ मध्ये सहायक प्राध्यापकाच्या ८२३ पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. परंतु, यापैकी २५५ पदांसाठी पात्र डॉक्टर मिळाले, रेडिओलॉजी सहायक प्राध्यापकाच्या ५४ पदांपैकी ४२ पदे रिक्त राहिली. एवढेच नाही तर, बरेचदा पात्र डॉक्टर पसंतीच्या ठिकाणी नियुक्ती मिळाली नाही म्हणून, सेवेत रुजू होत नाहीत. करिता, सरकारची पूर्ण इच्छा असतानाही १०० टक्के पदे भरली जात नाहीत, असे उच्च न्यायालयाला सांगण्यात आले आहे

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सामान्य प्रशासनाची परवानगी आवश्यक
• वैद्यकीय प्राध्यापकांची मंजूर पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे का? अशी विचारणा न्यायालयाने केली होती. वैद्यकीय शिक्षण विभागाने याचे उत्तर देताना, सामान्य प्रशासन विभागाने ५ नोव्हेंबर २००९ रोजी सामाजिक आरक्षणाच्या पदभरतीसंदर्भात मार्गदर्शकतत्त्वे जारी केली असून त्यानुसार ‘अ’ व ‘ब’ श्रेणीतील सामाजिक आरक्षणाची पदे भरण्यासाठी या विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे सांगितले.
विदर्भातील रिक्त पदांवर स्पष्टीकरण
एकट्या विदर्भात सहायक प्राध्यापकांची ३२३ पदे रिक्त असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर्षी संपूर्ण राज्यातील केवळ १७४ पदे भरण्यासाठीच जाहिरात दिली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने यावर स्पष्टीकरण देताना विदर्भातील ३२३ पैकी १९२ पदे अस्थायी स्वरूपात भरण्यात आल्याची आणि ११५ पदे २०२४ मध्ये निर्माण करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, काही पदे सहायक प्राध्यापकांना मिळालेल्या बढतीमुळे रिक्त झाल्याचे सांगितले. राज्यातील १४ वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये वाढीव खाटांनुसार नवीन पदे निर्माण करण्यासाठी वित्त विभागाला २८ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहितीही न्यायालयाला देण्यात आली.
पुढील सुनावणी येत्या गुरुवारी
• विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या विकासासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अविनाश घरोटे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रतिज्ञापत्रावर सविस्तर चर्चा करण्यासाठी प्रकरणावर येत्या गुरुवारी पुढील सुनावणी निश्चित केली. अॅड. अनुप गिल्डा यांनी न्यायालय मित्र म्हणून तर, वरिष्ठ अॅड. फिरदौस मिर्झा यांनी राज्य सरकारतर्फे कामकाज पाहिले.


DMER Mumbai Bharti 2024: Directorate of Medical Education & Research (DMER) Mumbai is going to recruit for a posts of “Contract Secretary”. There are t6otal of various vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates may apply by offline before last date. Last date for submitting offline application is 07 Days (01st of July 2024). For more details about DMER Mumbai Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत “कंत्राटी सचिव” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 दिवस (01  जुलै 2024) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकंत्राटी सचिव
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • वयोमर्यादा – ६५ वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप सचिव (आस्थापना), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, ९ वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल, मंत्रालय, मुंबई ४००००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख07 दिवस (01  जुलै 2024)
  • अधिकृत वेबसाईट – https://www.med-edu.in/

How To Apply For Directorate of Medical Education & Research Mumbai Application 2024

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 दिवस (01  जुलै 2024) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For DMER Mumbai Notification 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/tCKR3
✅ अधिकृत वेबसाईट https://www.med-edu.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. MahaBharti says

    DMER PROVISIONAL RECRUITMENT VACANCY POSITION COT-2023

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड