Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासकीय रुग्णालयात १०८६ पदे भरण्यास मिळाली मान्यता, लवकरच सुरु होणार भरती! | District Hospital Parbhani Bharti 2023

District Hospital Parbhani Bharti 2023

District Hospital Parbhani Bharti 2023 Details

District Hospital Parbhani Bharti 2023 – After the government medical college was opened in Parbhani, the state government had to take a decision for the 1086 posts required for this college and hospital. Now steps have been taken by the state government. On December 4, the government issued a government resolution for 1,086 posts.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाले. मात्र वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुरू करण्यात आलेल्या ४३० खाटांच्या रुग्णालयाकरिता आवश्यक पद निर्मितीची गरज होती. याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने ४ डिसेंबर रोजी एका शासन निर्णयाद्वारे १०८६ पदे भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुसज्ज झाले आहे. ‘मागील सहा महिन्यापासून राज्य शासनाकडे ही पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीनंतर जिल्ह्यातील रुग्ण सेवेला जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी हा शासन निर्णय परभणीकरांसाठी महत्त्वाचा आहे. आगामी काळात दर्जेदार वैद्यकीय सेवेसाठी मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. लवकरच ही पदे भरली जाणार आहेत. परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर या महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी लागणाऱ्या १०८६ पदासाठी राज्य शासनाने शासन निर्णय काढणे गरजेचे होते. आता राज्य शासनाकडून पावले उचलण्यात आली. ४ डिसेंबर रोजी १०८६ पदासाठीचा शासन निर्णय सरकारने काढला. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू व्हावे, यासाठी परभणीकरांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यास यशही मिळाले. सध्या या महाविद्यालयात १०० विद्यार्थी प्रवेशित झाले असून महाविद्यालय सुरळीत सुरू आहे. परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्नित असलेल्या रुग्णालयासाठी आवश्यकता असलेले १०८६ पदे निर्मिती करणे व भरण्यास शासनाने मान्यता देणे आवश्यक होते. परंतु, यासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळासाठी केवळ शासन आदेश काढण्यासाठी कानाडोळा केला जात होता. त्यामुळे ही पदे कधी भरली जाणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने याकडे लक्ष देऊन तत्काळ पदांची भरती करावी, अशी मागणी जिल्ह्यातून वारंवार करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने ४ डिसेंबर रोजी एका शासन निर्णयद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परभणी येथे सुरू करण्यात आलेल्या ४३० खाटांच्या रुग्णालया करता आवश्यक पद निर्मिती बाबत शासन निर्णय काढला. यामध्ये गट अ ते गट ड मध्ये एकूण १०८६ पदे निर्मिती करण्यास व भरण्यास मान्यता दिली. विशेष म्हणजे त्यासाठी १०९.१९ कोटी इतक्या अंदाजित खर्चास परवानगीही देण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुसज्ज झाले आहे.

 

अधिपरिचारिका, परिसेविकांची आहेत ४२५ पदे
परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित असलेल्या रुग्णालयासाठी राज्य शासनाने ४ डिसेंबर रोजी १०८६ पदांसाठी मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे या पदांमध्ये अधिपरिचारिकांसह इतर ४२५ पदे आहेत. त्याचबरोबर तंत्रज्ञ, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वैद्यकीय अधीक्षक, कार्यालयीन अधीक्षक यासह इतर पदांचा समावेश आहे. या उपलब्ध होणाऱ्या मनुष्यबळामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना उपचार करताना अधिक सुलभ होणार आहे.

 


District Hospital Parbhani Bharti 2023: District Hospital Parbhani is going to recruit for the various vacant “Medical Officer” posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address. The walk-in interview is scheduled for the 22nd of May 2023. The official website of District Hospital Parbhani is www.parbhani.gov.in. Further details are as follows:-

Zilla Samanya Rugnalaya Parbhani Bharti 2023

जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. उमेदवाराचे वय 58 वर्षापेक्षा जास्त नसावे. या भरती करिता नोकरी ठिकाण परभणी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 मे 2023 आहे. तसेच, प्रत्येक महिण्याच्या १ व १५ तारखेला किंवा सुटटी असल्यास दुस-या दिवशी दुपारी ३.०० वाजता मुलाखती घेण्यात येईल.

परभणी जिल्हायातील शासकीय आरोग्य संस्थामध्ये रिक्त असलेल्या महाराष्ट्र वैद्यकिय आरोग्य सेवा गट-अ ( वर्ग – २) व विशेषज्ञ (कंत्राटी) संवर्गातील तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ पदे निव्वळ कंत्राटी पध्दतीने व तात्पुरत्या स्वरुपात अकरा महिन्याच्या कालावधी करीता भरावयाची आहेत.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – MBBS/ BAMS
  • वयोमर्यादा – 58 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाणपरभणी
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – मा. जिल्हाअधिकारी कार्यालय, परभणी यांच्या  कार्यालयात
  • मुलाखत तारीख – 22 मे 2023 (तसेच, प्रत्येक महिण्याच्या १५ तारखेला किंवा सुटटी असल्यास दुसया दिवशी दुपारी ३.०० वाजता)
  • अधिकृत वेबसाईट : www.parbhani.gov.in

Educational Qualification For District Hospital Parbhani Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी १. एम. . बी. बी. एस. पदवी/पदविका 

२. पदवित्तर पदवी किंवा पदविका यांना प्राधान्य देण्यात येईल 

Salary Details For Jilha Nivad Samiti Parbhani Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी
  • एम.बी.बी.एस. आर्हताधारक उमेदवार :७५०००/प्रतिमाह
  • एम.बी.बी.एस. पदवी/पदविका धारक उमेदवार :८५०००/प्रतिमाह 

District Hospital Parbhani Jobs 2023 – Important Documents 

  • सर्व विषयाचे गुणपत्रक
  • पदवी पदवीका प्रमाणपत्र
  • सक्षम वैद्यकिय परीषदेकडे नोंदणी केलेले वैधता  प्रमाणपत्र
  • २ पासपोर्ट साईजचे फोटो
  • सर्व मुळ कागदपत्रे व एक प्रत छायांकित  साक्षांकित संच
  • महाराष्ट्र वैद्यकिय परिषद नोंदनी असणे आवश्यक

Selection Process For Jilha Nivad Samiti Parbhani Recruitment 2023

  • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • उमेदवारांनी मुलाखातीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
  • मुलाखतीची तारीख 22 मे 2023 आहे. तसेच, प्रत्येक महिण्याच्या १५ तारखेला किंवा सुटटी असल्यास दुसया दिवशी दुपारी ३.०० वाजता मुलाखती घेण्यात येईल.
  • सदर जाहीरात parbhani.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली असुन मुलाखतीस अर्ज करण्यासाठी अर्ज नमुना उपलब्ध असेल
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.parbhani.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/lzBJT
✅ अधिकृत वेबसाईट
www.parbhani.gov.in

District Medical College Parbhani Bharti 2023 – The government’s Department of Medical Education and Drugs has decided to create 448 necessary Posts for the establishment of a state-run medical college with capacity for a large number of students in Parbhani. This decision was made on Wednesday. This order has been signed by Secretary Shivaji Patankar. For the carrying , recruitment, and the estimated cost of 976.60 million rupees for the coming 448 positions in Groups ‘A’ to ‘D’ for the current state-run medical college, approval has been granted. The proposal to grant approval for the necessary positions of the state-run medical college was under consideration of the government. As per the proposal, in Groups ‘A’ to ‘C’, 185 regular positions and 59 student positions will be created, while in Group ‘C’ (imaginary positions – external sources) 139 positions will be created, and in Group ‘D’, 65 positions, a total of 448 positions will be created in four phases.

परभणी येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याकरिता आवश्यक पदनिर्मितीबाबत शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने बुधवारी शासन निर्णय काढला आहे. याबाबत चार टप्प्यांत लागणारी ४४८ पदे निर्माण करण्यास या विभागाने मान्यता दिली आहे. हे आदेश सहसचिव शिवाजी पाटणकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत.

 

परभणीत शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास दोन मार्च २०२२ च्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. याबाबत २८ मार्चला शासन निर्णय काढण्यात आला. सदरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करिता गट- ‘अ’ ते गट ‘ड’मध्ये एकूण ४४८ पदे निर्मिती करण्यास, भरण्यास व त्यापोटी येणाऱ्या ९७ कोटी ६० लाख इतक्या अंदाजे खर्चास परवानगी देण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवश्यक पदांच्या पदनिर्मितीस मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार गट ‘अ’ ते गट ‘क’मधील नियमित १८५ पदे, विद्यार्थी पदे ५९ त्याचप्रमाणे गट ‘क’ (काल्पनिक पदे-बाह्य स्रोतांनी) १३९ पदे, गट ‘ड’मधील काल्पनिक पदे व बाह्य स्रोतांनी मिळून ६५ पदे अशी एकूण ४४८ पदे चार टप्प्यांत निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

या पदांची होणार निर्मिती…
अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, मुख्य प्रशासकीय अधिकारी, सहायक प्राध्यापक, सांख्यिकी अधिव्याख्याता, प्रशासकीय अधिकारी, लघुलेखक, ग्रंथपाल, कार्यालयीन अधीक्षक, सहायक ग्रंथपाल, समाजसेवा अधीक्षक, रोखपाल, वरिष्ठ सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, लघुलेखक, प्रक्षेपक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यांच्यासह अन्य पदे भरली जाणार आहेत.


Previous Updates 

Civil Hospital Parbhani Medical Officer Result

District Hospital Parbhani Bharti 2022 Civil Hospital Parbhani published the Waiting List for “Medical Officer” posts. Click on the link below to download the list.

सिव्हिल हॉस्पिटल परभणी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (तदर्थ) पदभरती परीक्षेची प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/zKKn1Ro


District Hospital Parbhani Medical Officer Result

District Hospital Parbhani Bharti 2022 District Hospital Parbhani published the Counseling list, and Merit List of “Medical Officer” posts. Click on the link below to download the list.

जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेची समुपदेशन व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/mKEUVGT


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड