शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणार ५० जागांसाठी भरती !
District Hospital Jalgaon Recruitment 2020
District Hospital Jalgaon Recruitment 2023– A meeting was held at the Collector’s office regarding various pending issues of the Government Medical College and Hospital. In this meeting, issues such as recruitment of manpower, preparation of road for the project at Chincholi, removal of encroachments in the hospital premises were discussed. Resident Deputy Collector, District Mining Officer, Superintending Engineer of Mahavitaran, District Surgeon, Officers of Public Works Department, Principal of Government Medical College etc. were present in the meeting.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विविध प्रलंबित प्रश्नांविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत मनुष्यबळ भरणे, चिंचोली येथील प्रकल्पासाठी रस्ता तयार करणे, रुग्णालयीन परिसरातील अतिक्रमण हलविणे आदी विषयांवर चर्चा झाली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता, जिल्हा शल्यचिकित्सक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते. बैठकीला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची प्रमुख उपस्थिती होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव येथील शुश्रूषा संवर्गातील रिक्त पदे भरेपर्यन्त अतिरिक्त मनुष्यबळ पुरवणेबाबत चर्चा झाली. परिचारिकांची ३९६ पदे रिक्त आहे. तरी सार्वजनिक आरोग्य सेवा यांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या एकुण ७२ नर्सिंग संवर्गातील कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात येऊ नये, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तात्पुरत्या स्वरुपात रुग्णसेवा सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी कंत्राटी पध्दतीने एकुण ५० पदे भरण्याची कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यात आली.
प्रस्तावीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मौजे चिंचोली येथे जाणे येणेकरीता हायवे रोडपासून चिंचोली येथील प्रोजेक्टवर जाणे करीता रस्ता तयार करण्यासाठी कळविण्यांत आलेले आहे. अद्याप कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रलंबीत आहे. प्रस्तावीत बांधकामाकरीता मौजे चिंचोली येथे विद्युत पुरवठा व सबस्टेशन निर्माण करणेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. अधिक्षक अभियंता, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, जळगांव यांना मौजे चिंचोली येथे विद्युत पुरवठा व सबस्टेशनची मागणी करण्यांत आलेली आहे. त्यानुसार महावितरण विभागाकडून २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवण्याबाबत आदेश देण्यांत यावेत, अशी मागणी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,येथील संरक्षक भिंतीलगत असलेल्या शहरी भागातून वाहन येणारे ड्रेनेज लाईन ही वारंवार भरून त्यातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी हे इतरत्र रुग्णालय परिसरात पसरत असते. वेळोवेळी महानगरपालीकेने संरक्षक भिंतीलगत असलेले ड्रेनेज बंदिस्त करावी व त्याची साफसफाई दररोज करण्याबाबत महानगरपालीकेस आदेश देण्यात यावेत. संरक्षक भिंतीलगत रुग्णालयाच्या आजुबाजूस असलेले तसेच दुकानदार व छोटे व्यापारी हे कचरा इतरत्र ठिकाणी टाकत असतात. त्यामुळे दुर्गंधी येत असते. महानगरपालीकेकडून सदरहु कचरा टाकणेसाठी एक मोठी कचराकुंडी संरक्षक भिंतीलगत ठेवण्यांत यावी. तसेच त्यातील कचरा हा दररोज उचलण्याची कार्यवाही करणे अपेक्षीत आहे.
रुग्णालयात असलेले जुने सीटी स्कॅन व इतर निर्लेखीत साहित्य त्याचप्रमाणे जुने रेकॉर्ड हे मोहाडी येथील रुग्णालयात स्थलांतरीत करण्याबाबतही सांगण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिनस्त असलेली यंत्रसामुग्री मध्ये जुने सीटी स्कॅन तसेच इतर जुनी यंत्रसामुग्री ही जिल्हाशल्यचिकित्सक यांनी निर्लेखीत करून देणेबाबत विनंती करण्यात आली. रुग्णालय परिसरात सार्वजनिक आरोग्य विभागातील जुनी रुग्णवाहिका तसेच इतर वाहने ही निर्लेखीत करण्यांत येऊन त्याचा लिलाव झाला पाहिजे. सदर जागा जिल्हाशल्यचिकित्सक यांचे कार्यालयाकडून कार्यवाही लवकर होणेसाठी आदेश देण्यांत यावेत. जेणेकरून सदरहु जागेचा वापर रुग्णसेवेसाठी व वैद्यकीय विद्यार्थ्याच्या शैक्षणीक कार्यक्रमासाठी करता येईल, असेही सुचविण्यात आले.
Previous Updates : District Hospital Jalgaon published an advertisement for the various 476 vacancies. District Hospital Jalgaon Bharti 2020 is declared the advertisement to recruit vacancies in the Department of the District Hospital Jalgaon. The recruitment drive is for the post of Physician, Anesthetists, MO MBBS, Ayush MO, Staff Nurse, X-Ray Technician, ECG Technician, Ward Boy Posts, those who want to do the job in District Hospital Jalgaon Recruitment 2020 can attend the walk-in-interview on every Tuesday. If your criteria full-fill the below requirements, then you can apply for the District Hospital Jalgaon Recruitment job. All other details like the posts, like education qualification, pay scale, age limit, etc. are given below.
- पदाचे नाव – फिजीशियन, भूल देणारा डॉक्टर, एमओ एमबीबीएस, आयुष एमओ, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, वार्ड बॉय
- पद संख्या – ४७६ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – जळगाव
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हाधिकारी जळगाव यांचे कार्यालय
- मुलाखतीची तारीख – दर मंगळवारी आहे.
District Hospital Jalgaon Bharti 2020 Details |
|
Department Name |
District Hospital Jalgaon Bharti 2020 |
Recruitment Name |
District Hospital Jalgaon Recruitment |
Name of Posts | Physician, Anesthetists, MO MBBS, Ayush MO, Staff Nurse, X-Ray Technician, ECG Technician, Ward Boy |
Total Vacancies | 476 Vacancies |
Application Mode | Walk-In-Interview Scheduled. |
Official Website | jalgaon.gov.in |
Vacancy Details
|
|
Physician | 16 |
Anesthetists | 14 |
MO MBBS | 43 |
Ayush MO | 43 |
Staff Nurse | 262 |
X-Ray Technician | 07 |
ECG Technician | 07 |
Ward Boy | 84 |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) |
|
|
Important Links For District Hospital Jalgaon Recruitment 2020 | |
PDF जाहिरात : https://bit.ly/2CSqksX | |
अधिकृत वेबसाईट : http://www.zpjalgaon.gov.in/ |
आता कधी निघणार आहे contract base च्या jaga