महत्त्वाचे – जिल्हा बँकांची भरती होणार ऑनलाईन!!

District Bank Bharti 2022

District Bank Bharti 2022 – Online Recruitment

District Bank Bharti 2022 : The District Bank Recruitments will be online. The state government has decided not to recruit the bank offline. The exam will conduct through the agency. This decision of the government will help in making the recruitment process in the district banks quality based and transparent. Further details are as follows:-

District Bank Recruitment 2022

जिल्हा बॅंकांमधील भरती प्रक्रियेमध्ये होणारी वशिलेबाजी आणि हस्तक्षेप यासंदर्भात राज्य सरकारकडे तक्रारी आल्याने त्याची दखल घेत ऑफलाइन पद्धतीने बँकेमध्ये भरती न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

त्याऐवजी परिक्षा घेणारी एजन्सीची नियुक्ती करून ऑनलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया राबवावी, असेही आदेश दिले आहेत. त्यामुळे बँकेवर नव्याने निवडून आलेल्या संचालकांमध्ये नाराजी पसरली आहे. जिल्हा बँकाकडून ऑफलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया होते. ही प्रक्रिया राबविताना अनेकदा अनियमितता होते, त्यातून वाद निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमधील विविध पदांसाठीची नोकरभरती प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच परिक्षा घेण्यासाठी एजन्सीची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक असोसिएशन, इंडियन बॅंक असोसिएशन, इंडियन बॅंकिंग पर्सोनेल सिलेक्‍शन यासारख्या यंत्रणांचा समावेश करावा, असे आदेशात म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जिल्हा बॅंकांमधील भरती प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारे व पारदर्शकपणे होण्यास मदत होणार आहे.

‘एजन्सी निर्दोष असावी’

एजन्सीची निवड करताना त्या एजन्सीने तीन वेळा ऑनलाइन नोकरभरतीची प्रक्रिया राबविलेली असावी, संबंधित एजन्सीविरुध्द यापूर्वी कोणत्याही नोकरभरतीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या चौकशीमध्ये गलथान व्यवस्थापन, भ्रष्टाचार, गुन्हेगारी पद्धतीचा हस्तक्षेप आदींबाबतीत दोषी असल्याचे सिद्ध झालेले नसावे. तसेच त्या एजन्सीचा काळ्या यादीत समावेश नसावा, असेही आदेशात स्पष्ट केले आहे. 

राज्यस्तरीय पॅनेल तयार करावे’

जिल्हा बॅंकांमधील ऑनलाइन नोकरभरती प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी सहकार आयुक्तांनी मागील वर्षी प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता, त्यानुसार हा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन नोकरभरती प्रक्रियेसाठी अधिकृत संस्थांची अथवा एजन्सीची राज्यस्तरीय पॅनेल सहकार आयुक्तांनी तयार करावे. त्या पॅनेलमधून जिल्हा बॅंकेने एखाद्या एजन्सीची निवड करून त्यामार्फत भरती प्रक्रिया राबवावी, असे आदेश सहकार विभागाचे सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी दिले आहेत.

District Bank Bharti 2022

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड