खुशखबर – गट क, गट ड वर्गातील सरळसेवा भरतीचा मार्ग मोकळा
Direct Service Recruitment 2021
Direct Service Recruitment 2021 : 4 companies finalized for direct service recruitment declared General Administration Department – गेल्या जवळपास अडीच वर्षांपासून खोळंबलेल्या गट क, गट ड वर्गातील रिक्त पदांची सरळसेवा भरती करण्याचा मार्ग अखेर मोकळा करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने चार कंपन्यांना ‘ओएमआर’ पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यासाठी निवड केली आहे. आता अर्ज भरलेल्या उमेदवारांची परीक्षा कधी होते याची प्रतीक्षा आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यात भाजपचे सरकार असताना महापरीक्षा पोर्टलर्फे राज्यात सरळसेवा भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने ही भरती प्रक्रिया वादात सापडली होती. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने सरळसेवा भरतीसाठी महापरीक्षा पोर्टल रद्द करून नव्या कंपन्या नियुक्त करण्याची प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली. ही निविदा प्रक्रिया राबविताना २५ पेक्षा जास्त वेळा मुदतवाढ देण्यात आली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाआयटी विभागाने डिसेंबर महिन्यात १८ कंपन्यांपैकी चार कंपन्या अंतिम करून याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला होता. मात्र, यातील काही कंपन्यांचा कारभार योग्य नसल्याने त्यांना यापूर्वी काळ्या यादीत टाकले होते, त्याच कंपन्यांना पुन्हा काम देऊ नका असा आरोप करण्यात आला होता. तसेच ही भरती ‘एमपीएससी’कडूनच करावी अशी मागणी केली जात होती. अखेर राज्य शासनाने गुरुवारी चार कंपन्या फायनल करून त्याबाबत आदेश काढला आहे.
राज्यभरात सुमारे २७ हजार ५०० सरळसेवेची पदे रिक्त असून, त्यासाठी सुमारे ३२ लाखापेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. ही पदे भरण्यासाठी मेसर्स ॲपटेक लिमिटेड, मेसर्स जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि., मेसर्स जींजर वेब्ज प्रा. लि., मेसर्स मेटा-आय टेक्नॉलॉजी प्रा. लि. या चार कंपन्यांना परिक्षेचे काम देण्यात आले आहेत. संबंधित विभागातर्फे परीक्षेचे आयोजन केल्यानंतर ओएमआर पद्धतीने या परीक्षा या संस्थांच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत.
सोर्स : सकाळ
Exam form kenvha nighnar
Karac aah ki lokanla pagal banvat aah hay sarkar
From bharata yeyil ka atta?
सर मी पशुधन पर्यवेक्षक चा form भरला आहेत तर Exam होईल का ?
Pashusavardhan vibhagat parichar pad भर्णार का सर