डिप्लोमा प्रवेश अर्जांना १३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
Diploma Admission Application Process Extended Again
Diploma Admission Application Process Extended Again : डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांना आतापर्यंत तब्बल पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे, तरीही अवघे ७५ हजार ६० विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.
Diploma Admission Application Process Extended Again : तंत्रशिक्षण संचालनालयाकडून दहावी आणि बारावी नंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणार्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे; तसेच अर्जाची पडताळणी करण्याची मुदत पुन्हा १३ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. साधारण १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेला आता सहाव्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावीनंतरच्या डिप्लोमासाठी ६ ऑक्टोबरपर्यंत ७५ हजार ६० विद्यार्थ्यांनीच आपले अर्ज भरून पूर्ण केले आहेत.
तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) दहावीनंतरच्या इंजिनीअरिंग डिप्लोमा (पॉलिटेक्निक); तसेच बारावीनंतरच्या फार्मसी, सरफेस कोटींग टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अशा डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया १० ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. या दोन्ही डिप्लोमा प्रवेशाला येत्या १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यासाठी सहाव्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दरम्यान, तात्पुरती गुणवत्ता यादी १६ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून, त्याबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी १७ ते १९ ऑक्टोबर अशी मुदत दिली आहे. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे, अशी माहिती डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली आहे. याबाबतची अधिक माहिती www.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
सोर्स : म. टा.