इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून विहित मुदतीत विकल्प सादर करण्याची संधी – न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय नवीन शुद्धिपत्रक जाहीर ! | DFSL Mumbai Bharti 2024
DFSL Mumbai Bharti 2024 @ dfsl.maharashtra.gov.in
Directorate of Forensic Science Laboratories Mumbai Bharti 2024
DFSL Mumbai Bharti 2024: Directorate of Forensic Science Laboratories, Mumbai has reopen application form for editing. Those candidates who had applied for DFSL Bharti can edit thier application form from 14th August 2024 till 18th August 2024
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज डायरेक्टरेट, मुंबईने पुन्हा अर्ज सुरु केले आहे , या अंतर्गत काही उमेदवारांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदी च्या आधारे इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे नमूद करून सदर जाहिरातीकारिता इतर मागास वर्गाचा विकल्प सादर करण्याची विनंती केली होती. त्यास अनुसरून शासन पत्र गृह विभाग क्रमांक एफएसएल- ०४२३/प्र.क्र. २९३/पोल-४ दिनांक १२.०८.२०२४ अनुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन खुला (अराखीव) व आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागासवर्गाचे (OBC) जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून खाली दिलेल्या विहित मुदतीत विकल्प सादर करण्याची संधी देण्यात येत आहे.. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 ते 18 ऑगस्ट 2024 आहे.. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, निवड पद्धती येथे बघा ….!!
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शुद्धीपत्रक
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर प्रयोगशाळेतील गट क संवर्गातील सरळसेवेतील १२५ रिक्त पदांसाठी पदभरतीसाठी दिनांक ०५/०२/२०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक बीसीसी २०२४/प्र.क्र.७५/१६ क दिनांक २७/०२/२०२४ नुसार महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) वर्गाकरिता आरक्षणाची तरतुद विहित करण्यात आली आहे. सदर अधिनियमातील तरतुदी वरील संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीकरिता लागू आहेत. तसेच संचालनालयाच्या दिनांक १० जुलै, २०२४ रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार खुला (अराखीव) तसेच आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) वर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. दरम्यान काही उमेदवारांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदी च्या आधारे इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे नमूद करून सदर जाहिरातीकारिता इतर मागास वर्गाचा विकल्प सादर करण्याची विनंती केली होती. त्यास अनुसरून शासन पत्र गृह विभाग क्रमांक एफएसएल- ०४२३/प्र.क्र. २९३/पोल-४ दिनांक १२.०८.२०२४ अनुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन खुला (अराखीव) व आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागासवर्गाचे (OBC) जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून खाली दिलेल्या विहित मुदतीत विकल्प सादर करण्याची संधी देण्यात येत आहे.
१. यासाठी ज्या अराखीव व आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना सदर आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा आहे व ज्यांच्याकडे इतर मागास प्रवर्गाचे विहित प्रधीका-याचे जात प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमी लेयर (NCL) या प्रवर्गात मोडत असल्याचे विहित प्रधीका-याचे वैध प्रमाणपत्र आहे व त्यांनी https://dfsl.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक प्रविष्ट करून त्यांच्या अर्जामध्ये उक्त प्रवार्गा संबंधित विहित तपशील प्रविष्ट करावे, जेणेकरून पात्र उमेदवारांना सदर आरक्षणाचा लाभ घेता येईल.
१.१ यापूर्वी खुला तसेच आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गाकरीता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आपल्या आरक्षणाच्या प्रवर्गाबाबत सुधारणा करावयाची झाल्यास त्यांनाही उपरोक्त कालावधीमध्येच सुधारणा करणे आवश्यक आहे. सदरील लिंक फक्त अराखीव व आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांकरिता खाली नमूद कालावधीसाठी उपलब्ध राहील.
१.२ तथापि, ज्या उमेदवारांकडे त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास वर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे अशा इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता नव्याने अर्ज सादर करण्याची संधी खालील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. जाहिरात क्र.१, सन-२०२४ यामधील सर्व अटी व शर्ती तसेच शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा हया मूळ जाहिरातीप्रमाणेच जशाच तशा लागू राहतील.
२. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) वर्गाचे अथवा इतर मागास वर्गाचे (OBC) जात प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (EWS) दावा केलेल्या उमेदवारांनी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC) अथवा इतर मागास वर्गाचा (OBC) विकल्प सादर न केल्यास सदर उमेदवारांचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. तसेच उपरोक्त कालावधीनंतर याबाबत करण्यात आलेल्या कोणत्याही विनंतीची दखल घेण्यात येणार नाही, याची गांर्भीर्याने नोंद घ्यावी.
3. ज्या उमेदवारांनी महिला, पदवीधर / पदवीकाधारक अंशकालीन, प्रकल्पग्रस्त व खेळाडू या समांतर आरक्षण प्रवर्गातून यापूर्वी आवेदन सादर केले आहेत. सदर आरक्षित पदे रद्द झाल्यामुळे मूळ जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अराखीव पदाच्या अटी व शर्तीची पुर्तता करणा-या सदर उमेदवारांचा अराखीव पदासाठी विचार करण्यात येईल.
४. उपरोक्त कार्यपद्धती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्रमांक ३४६८/२०२४ च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील.
५. दिनांक ०५ फेब्रुवारी, २०२४ रोजी प्रसिद्ध जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For dfsl.maharashtra.gov.in Bharti 2024
|
|
PDF जाहिरात | https://shorturl.at/hwBG5 |
ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/HIQ15 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://dfsl.maharashtra.gov.in/ |
नवीन पदांचा तपशील प्रकाशित करणारे परिपत्रक पहा
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर प्रयोगशाळेतील गट क संवर्गातील सरळसेवेतील रिक्त पदांसाठी पदभरतीसाठी दिनांक ०५/०२/२०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व अर्ज करण्याची अंतिम मुदत २७/०२/२०२४ रोजी पर्यंत होती. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक बीसीसी २०२४/प्र.क्र.७५/१६ क दिनांक २७/०२/२०२४ नुसार महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) वर्गाकरिता आरक्षणाची तरतुद विहित करण्यात आली आहे. सदर अधिनियमातील तरतुदी वरील संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीकरिता लागू आहेत. सदर जाहिरातीमधील परिच्छेद ४.१ येथे पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल (कमी/वाढ) होण्याची शक्यता आहे असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार उक्त नमूद भरती प्रक्रियेतील भरावयाच्या विविध संवर्गातील पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For dfsl.maharashtra.gov.in Bharti 2024
|
|
PDF जाहिरात | https://shorturl.at/hwBG5 |
ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/HIQ15 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://dfsl.maharashtra.gov.in/ |
Old DFSL Advertisement 2024
DFSL Mumbai Bharti 2024: DFSL Mumbai (Directorate of Forensic Science Laboratories, Mumbai) – Applications are invited from eligible candidates to fill vacant posts of “Scientific Assistant, Senior Laboratory Assistant, Senior Clerk, Junior Laboratory Assistant, Manager”. There are total of 125 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested candidates can apply before the last date. The last date for submission of application is 27th of February 2024. The official website of DFSL Mumbai is dfsl.maharashtra.gov.in. For more details about Directorate of Forensic Science Laboratories Mumbai Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
Applications are invited through online mode for the following vacant posts in the cadre of Judicial Assistant Scientific Laboratory Group under the control of Judicial Assistant Scientific Laboratory Directorate, Maharashtra State, Mumbai, Nagpur, Pune, Chhatrapati Sambhajinagar, Nashik, Amravati, Nanded, Kolhapur, Chandrapur, Ratnagiri, Dhule, Thane and Solapur Laboratory Group. Those candidates Who have passed SSC, HSC, Graduation in Science, Post Graduation are eligible for DFSL Maharashtra Bharti 2024. Candidates from all over Maharashtra Must apply for this DFSL Maharashtra Recruitment 2024 because you will get salary from 21K-1 lac as per posts. Just Go through all details given below about DFSL Junior Laboratory Assistant Vacancy 2024.
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई अंतर्गत “वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक” पदांच्या एकूण 125 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
- पदाचे नाव – वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक
- पदसंख्या – 125 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- परीक्षा शुल्क (फी) –
- खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.१०००/-
- मागासवर्गीय/आ.दु. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.९००/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड पद्धती – ऑनलाईन परीक्षा व कागतपत्र पडताळणी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://dfsl.maharashtra.gov.in/
DFSL Mumbai Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वैज्ञानिक सहायक | 71 |
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक | 30 |
वरिष्ठ लिपिक | 05 |
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक | 18 |
व्यवस्थापक | 01 |
Educational Qualification For DFSL Mumbai Online Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैज्ञानिक सहायक | विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण |
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक | विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण |
वरिष्ठ लिपिक | विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परीक्षा उत्तीर्ण |
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक | विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC with Science) उत्तीर्ण. |
व्यवस्थापक | माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC Pass) उत्तीर्ण आणि तदनंतर खानपान (Catering) क्षेत्रातील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची अटही शिथिल करता येईल. |
Salary Details For DFSL Mumbai Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैज्ञानिक सहायक | एस-१३ (३५४००-११२४००) |
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक | एस-८ (२५५००-८११००) |
वरिष्ठ लिपिक | एस-८ (२५५००-८११००) |
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक | एस-७ (२१७००-६९१००) |
व्यवस्थापक | एस-10 (29200-92300) |
Application Fees For DFSL Maharashtra Bharti 2024
We have givenYou an Application fees For DFSL Maharashtra Bharti 2024 at below:
परीक्षा शुल्क (फी) व परीक्षा शुल्काचा भरणा करणे :-
१ खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.१०००/-
२ मागासवर्गीय/आ.दु. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.९००/-
३ माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
४ उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
५ परीक्षा शुल्क ना परतावा (Non-Refundable) आहे.
DFSL Mumbai Application 2024 – Important Documents
- अर्जातील नावाचा पुरावा (एस. एस. सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता).
- वयाचा पुरावा.
- शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा.
- सामाजिदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा.
- अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र.
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा.
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
- खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
- प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
- भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
- अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा.
- अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु. घ. व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
- लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापत्र.
- अनुभव प्रमाणपत्र.
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
How To Apply For Directorate of Forensic Science Laboratories Mumbai Recruitment 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
KEY DATES For DFSL Maharashtra Recruitment 2024
- Starting Date for submission – 01st February 2024
- Closing Date for submission – 21st February 2024
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For dfsl.maharashtra.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/hwBG5 |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/HIQ15 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://dfsl.maharashtra.gov.in/ |
How To Pay an Online Application Fees For DFSL Vacancy 2024
ऑनलाईन पध्दतीने :-
- परीक्षा शुल्काचा भरणा प्रणालीद्वारे उपलब्ध करुन दिलेल्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेटबँकिंगद्वारे परीक्षा शुल्क अदा करता येईल.
- परीक्षा शुल्क अदा करताना बँक खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कमेची वजावट झाल्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाला (Payment Successful) असल्याचा संदेश ऑनलाईन अर्जप्रणालीच्या पृष्ठावर प्रदर्शित झाल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय संकेतस्थळावरील संबंधित पृष्ठावरुन आणि / अथवा खात्यातून लॉग आऊट होऊ नये.
- परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर उमेदवाराला त्याच्या प्रोफाईलमध्ये परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाला आहे किंवा कसे ? याची स्थिती (Status) लगेच अवगत होईल. खात्यातून लॉग आऊट (Log Out) होण्यापूर्वी परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बँकेकडून व्यवहार (Transaction) पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी उमेदवाराची आहे
- परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा शुल्क भरण्याची कार्यवाही प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने विहित दिनांक/विहित वेळेपूर्वीच करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव व्यवहार अयशस्वी ठरल्यास यासंदर्भातील तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. विहीत मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकणा-या उमेदवारांचा संबंधित भरती प्रक्रियेकरीता विचार केला जाणार नाही.
Instruction For Filling DFSL Online Application Form 2024
Read the below instructions carefully for filling DFSL Online Application Form 2024
Kindly use Google Chrome (version 59 and above) or Mozilla Firefox (version 56 and above) or Edge Chromium browser for better performance to fill in the Application Form.
अर्ज भरण्यासाठी ब्राउझरची शिफारस केली Google Chrome (आवृत्ती 59 आणि वरील) किंवा Mozilla Firefox (आवृत्ती 56 आणि वरील) किंवा Edge Chromium आवृत्ती वापरा.
The Application Form is compatible with Android (version 4.0 and above) and iOS (version 9 and above).
अर्ज नमूना अँड्रॉइड (व्हर्जन 4.0 आणि त्यावरील) आणि आय.ओ.एस. (व्हर्जन 9 आणि त्यावरील) मोबाईलद्वारे भरता येतील.
Fields marked with * are mandatory.
ज्या ज्या ठिकाणी लाल रंगाची फुली (स्टार *) आहे. त्या ठिकाणची माहिती भरणे अनिवार्य आहे.
Read the below instructions carefully, before filling the form.
अर्ज भरण्यापुर्वी खालील सूचना काळजीपुर्वक वाचा:
- Fill in the details and click on Submit to proceed. / तपशील भरा आणि पुढे जाण्यासाठी सबमिट करा वर क्लिक करा.
- Please read the General instruction carefully before filling this Application Form. / कृपया हा अर्ज भरण्यापूर्वी सामान्य सूचना काळजीपूर्वक वाचा.
- Please keep a printout of the application summary for your future reference. / कृपया तुमच्या भविष्यातील संदर्भासाठी अर्जाच्या सारांशाची प्रिंटआउट ठेवा.
Table of Contents
125 Vacancies Out
Give me a back link