दीड महिन्यात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५ हजार पदांची भरती होणार ! | Department of Medical Education and Medicine Bharti 2023

Department of Medical Education and Medicine Bharti 2023

Department of Medical Education and Medicine Bharti 2023 Update

Department of Medical Education and Medicine Bharti 2023: Girish Mahajan said that he is satisfied that this principle is followed in the government medical sector. Along with this, the government will take a strategic decision to find a way out of the issue of manpower and in the next one and a half months, about 5 thousand employees will be appointed, he also explained. Read more information below…

राज्यातील कोणताही व्यक्ती उपचारापासून वंचित राहू नये, गरिबाला मोफत उपचार उपलब्ध व्हावेत ही शासनाची भूमिका आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय सेवा-सुविधा भक्कम व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्वसामान्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यादृष्टिने आम्ही प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयासमवेत नर्सिंग कॉलेज देण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले. अधिक माहिती खाली वाचा…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ई.सी.आर.पी. अंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या दोन अद्ययावत हृदयरोग अतिदक्षता कक्षाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, प्रवीण साले आदी मान्यवर उपस्थित होते.

वैद्यकीय सेवा-सुविधेसाठी उपलब्ध करून दिलेला निधी हा सर्वसामान्यांच्या जीवाशी निगडीत असतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय हे वैद्यकीय सेवेचे द्योतक आहे. हे लक्षात घेता जी काही विकास कामे घेतली जातात अथवा पूर्ण केली जातात त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड असता कामा नये. जे काम करू ते भविष्यासाठी उत्तमच करू ही धारणा वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येकाजवळ असणे आवश्यक आहे. एखादा वार्ड, कक्ष जेंव्हा निर्माण होतो तेंव्हा त्यात कोणत्याही प्रकारच्या उणिवा असता कामा नये याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केल्या.

दीड महिन्यात सुमारे 5 हजार कर्मचारी नियुक्त

अपुरे मनुष्यबळ याची मला कल्पना आहे. दवाखाणा आणि स्वच्छता या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. रुग्णांना केवळ चांगले उपचार व सुविधा देऊन चालत नाही तर तितक्याच चांगल्या स्वच्छतेच्या सुविधाही आवश्यक असतात. प्रत्येक वार्डाची स्वच्छता असलीच पाहिजे. याचबरोबर रुग्णांना मनोधैर्य देण्यासाठी डॉक्टरांपासून सर्व कर्मचाऱ्यांनी आस्थेवाईकपणे रुग्णांची विचारपूसही केली पाहिजे. शासकीय वैद्यकीय क्षेत्रात हे तत्व पाळल्या जाते याचे मला समाधान असल्याचे पालकमंत्री गिरीष महाजन म्हणाले. याचबरोबर मनुष्यबळाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन येत्या दीड महिन्यात सुमारे 5 हजार कर्मचारी नियुक्त केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वैद्यकीय सेवासुविधा हा मी माझ्या कर्तव्य तत्परतेतून जपलेल्या आस्थेचा भाग आहे. एखाद्या रुग्णाला झालेले आजार व त्याच्या उपचारासाठी होणारा कोंडमारा मी दररोज अनुभवतो. गेल्या 30 वर्षांपासून सर्वसामान्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी मला जी संधी मिळाली त्या सेवेच्या संधीतूनच जनतेने सलग सहावेळा लोकप्रतिनिधी म्हणून जवळ केल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. वरचेवर महिलांमधील वाढत जाणारे कॅन्सरचे आजार याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. याचबरोबर व्यसनाधिनतेमुळे होणाऱ्या कर्करोगाकडे त्यांनी लक्ष वेधले. वैद्यकीय सेवा-सुविधा व उपचारासाठी रुग्णालय अत्यावश्यक असली तरी केवळ आपल्या व्यवसनामुळे जर आजार वाढत असतील तर त्याही दृष्टीने समाजाने विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी स्टाफ नर्स / परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, डॉक्टर्स व विविध संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे व सूचना ऐकून घेतल्या. सर्वांशी सुसंवाद साधून त्यांनी आपल्या भेटीत काही वार्डांची अनपेक्षित स्वच्छतेची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या.


 

Department of Medical Education and Medicine Recruitment 2023

Department of Medical Education and Medicine Bharti 2023: Proposal for filling up of approved notional posts in Group “C” and Group “D” for Government Medical, Ayurveda and Homoeopathic Colleges and Hospitals under Directorate of Medical Education and Research through external sources from Commissioner, Directorate of Medical Education and Research, Mumbai has been received by Govt. Accordingly, a total of 5056 posts of skilled, unskilled and semi-skilled in Group C and Group D cadres in 27 institutions are to be recruited through external sources. This will be one of the Biggest Recruitment in Maharashtra State. More information about Department of Medical Education and Medicine Bharti 2023 are given below:

So those who wants to make their career in medical Field , be ready to apply for Medical Department Maharashtra Bharti 2023. Government Medical Ayurveda, Homeopathic Colleges and Hospitals under Directorate of Medical Education and Research will be filled on contractual basis.

खुशखबर !! शासनाने राज्यातील २७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५ हजार ५६ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय आयुर्वेद, होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालयांकरिता गट क ड संवर्गातील मंजूर पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. अधिक माहिती खाली वाचा…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांनी ही पदे कंत्राटे पद्धतीने भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्याला शासनाने जानेवारी रोजी मंजुरी दिली. त्यानुसार २७ संस्थांमधील गट क आणि ड या संवर्गातील कुशल, अकुशल, अर्धकुशल अशी ५ हजार ५६ पदे भरली जातील. २० ते ३० टक्के बचतीची अपेक्षा ही नियमित पदे भरल्यास जितका खर्च झाला असता त्या खर्चाच्या कमीत कमी २० ते ३० टक्के इतकी बचत कंत्राटी कर्मचारी भरल्यानंतर होणे अपेक्षित आहेत. सेवापुरवठादारांशी करारनामा करताना या सूचनांचे पालन करण्याचे शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला आदेश दिले आहेत. तसेच आरोग्य विभागाचे प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Department of Medical Education and Medicine Vacancy 2023

अन्य जिल्ह्यांच्या पदांचा तपशील बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. 

Read Full GR


 

Medical Department Maharashtra Bharti 2023

Department of Medical Education and Medicine Bharti 2023 –  Maternal and child health, health services in tribal areas and mental illness are increasing day by day. Doctors in the health department said that there is an immediate need to fill up the posts from doctors to clerks in view of the increasing vacancy in the health department. Finally today the state government has taken a decision in this regard. 1432 posts of senior resident doctors have been sanctioned in the state. The state government has recently taken a decision to fill this posts through Maharashtra Senior Resident Recruitment 2023. For More Update, you can read below information

सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. मार्डने महाराष्ट्रात पुकारलेल्या संपानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मार्डच्या डॉक्टरांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वरिष्ठ निवासी संवर्गातील 1 हजार 432 पदे भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टरांवरील ताण निम्म्याने कमी होणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

Maharashtra Senior Resident Recruitment 2023 | Mumbai Doctor Bharti 2023

अवघ्या दोन दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी मार्डच्या डॉक्टरांना वरिष्ठ निवासी डॉक्टरांची भरती दोन दिवसांत करण्याचे आश्वासित केले होते. त्याची पूर्तता केल्याने आता डॉक्टरांनीही समाधान व्यक्त केले आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्यभरातील जवळपास 7 हजार निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. राज्याच्या आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरण्यात यावी ही देखील या डॉक्टरांनी प्रमुख मागणी होती. संपादरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी संपकरी डॉक्टरांसोबत चर्चा करून दोन दिवसांत राज्यातील निवासी डॉक्टरांची 1432 रिक्त पदे भरणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला होता. त्यामुळे राज्य शासनाने आज ही रिक्त पदे भरण्याची घोषणा केली आहे.

डॉक्टरांच्या मागण्या

1,432 एसआर पदांची निर्मिती, वसतिगृहांची दुरूस्ती, वसतिगृहांची क्षमता वाढवणे, महागाई भत्ता सातव्या वेतन आयोगानुसार अदा करा, सहयोगी तसेच सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरा, यासह इतर मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले होते. यातील निवारी डॉक्टरांची पदे भरण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला आहे.

माता आणि बाल आरोग्य, आदिवासी भागातील आरोग्य सेवा तसेच मानसिक आजाराचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. आरोग्य विभागाच्या कमाची वाढती व्याप्ती लक्षात घेता ताबडतोब डॉक्टरांपासून लिपीकांपर्यंतची पदे भरण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांचे म्हणणे होते. अखेर आज राज्य शासनाने या बाबतचा निर्णय घेतला आहे.

राज्यभरात आरोग्य विभागाची 527 रुग्णालये आहेत. या सर्व रूग्णालयांमध्ये जवळपास 46 हजारांहून अधिक खाटा उपलब्ध आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून वर्षाकाठी बाह्यरुग्ण विभागात जवळपास साडेतीन कोटी रुग्णांवर उपचार केले जातात, तर सुमारे 90 हजार छोट्या-माठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, पंतप्रधान मोतीबिंदू मुक्त भारत, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्लून, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलनासह विविध राष्ट्रीय कार्यक्रम, तसेच आरोग्यविषयक राज्य उपक्रम, हिवताव, हत्तीरोग, डेंगी, चिकनगुन्यासह विविध साथरोग, तसेच मधुमेह व रक्तदाबासह असर्गजन्य आजारांपासून कर्करोगापर्यंत अनेक आजारांवर आरोग्य विभाग सतत्याने काम करीत आहे. माता आणि बाल आरोग्य, आदिवासी भागातील आरोग्य सेवा तसेच मानसिक आजाराचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. आरोग्य विभागाच्या कमाची वाढती व्याप्ती लक्षात घेता ताबडतोब डॉक्टरांपासून लिपीकांपर्यंतची पदे भरण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांचे म्हणणे होते. अखेर आज राज्य शासनाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.


Department of Medical Education and Medicine Bharti 2023

Department of Medical Education and Medicine Bharti 2023: The latest update for Department of Medical Education and Medicine Recruitment 2023. As per the latest news, the Medical Education and Medicine Department Recruitment will be soon. This recruitment will be conducted by TCS-ION. Further details are as follows:-

सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS-ION द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो. हा GR 21 नोव्हेंबर 2022 रोजी प्रकाशित झाल्याचे दिसून येत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

Department of Medical Education and Medicine Bharti 2022

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, आयुष संचालनालय व अन्न व औषध प्रशासन, मानसिक आरोग्य केंद्र, पुणे अंतर्गत असलेली गट-ब (अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे भरण्याबाबतची प्रक्रिया टि.सी. एस. आयओएन (T.C.S-ION) या कंपनीमार्फत करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

Department of Medical Education and Medicine Bharti 2022

सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २१.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार पुढील आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यास तसेच टी. सी. एस- आयओएन (T.C.S-ION) कंपनीसोबत करार करण्यास आयुक्त (वै.शि.) यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच, टी. सी. एस (T.C.S-ION) कंपनीसोबत करार करण्याकरीता आयुक्त (वै.शि.) यांच्या कार्यालयाचे Legal Name :- DIRECTORATE MEDICAL EDUCATION vasa/ नात्रिक अतात्रिक पदे भरणेबाबत २०२० & या MUMBAI Registration नावाचे G.S.T. Number RESEARCH 27MUMD13141CIDI व Tan Number MUMD13141 या प्रमाणपत्राचा वापर करण्यात यावा. सदर भरतीप्रक्रियेसंदर्भात काही बाबींस शासनाची मान्यता घेणे आवश्यक असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त (वै.शि.) यांनी वेळोवेळी शासनास सादर करावा. सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या सुचनांनुसार तसेच, प्रचलित नियमांनुसार भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया आयुक्त, (वैद्यकीय शिक्षण व संशोधन) यांनी राबवावी.

GR प्रकाशित – http://bit.ly/3GNBcY3

Previous Update –

Department of Medical Education and Medicine Bharti 2022

Department of Medical Education and Medicine Bharti 2022The recruitment notification has been declared from the respective department to fill various posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

Department of Medical Education and Medicine Recruitment 2022

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अंतर्गत अन्न व औषध प्रशासन, मुंबई या कार्यालयात सह आयुक्त (विधी) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सह आयुक्त (विधी)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, अन्न व औषध प्रशासन, मुंबई या कार्यालयात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 फेब्रुवारी 2022 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.medical.maharashtra.gov.in 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3KTf91S
अधिकृत वेबसाईट : medical.maharashtra.gov.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड