JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या आस्थापनेवरील ८६ पदांचा आकृतीबंध मंजूर !!. | Department of Higher and Technical Education Mumbai Bharti 2026

Department of Higher and Technical Education Mumbai Bharti 2026

Department of Higher and Technical Education Mumbai Bharti 2026: महाराष्ट्र राज्यातील कला शिक्षणाला अधिक सक्षम, सुव्यवस्थित व गुणवत्तापूर्ण दिशा देण्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर स्वतंत्र कला शिक्षण मंडळ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. मा. मंत्रिमंडळाच्या दिनांक १४ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ स्थापन करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली असून, त्यानुषंगाने संदर्भ क्रमांक २ अन्वये आवश्यक अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. सदर मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे निश्चित करण्यात आले असून, मंडळाच्या प्रभावी प्रशासकीय कार्यवाहीसाठी मुंबई, नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय कार्यालये स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. या कार्यालयांसाठी आवश्यक असलेल्या अधिकारी व कर्मचारी पदांच्या आकृतीबंधाचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक ३ अन्वये शासनास सादर करण्यात आला आहे.

त्यानुसार, कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुख्य कार्यालय, मुंबई येथील गट-अ, गट-व व गट-क संवर्गातील ४५ नियमित पदे तसेच ९ बहुउद्देशीय चतुर्थश्रेणी कर्मचारी (बाह्ययंत्रणेद्वारे), महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ विभागीय कार्यालय, मुंबई येथील गट-व व गट-क संवर्गातील ६ नियमित पदे तसेच ५ बहुउद्देशीय चतुर्थश्रेणी कर्मचारी (बाह्ययंत्रणेद्वारे), विभागीय कार्यालय, नागपूर येथील गट-व व गट-क संवर्गातील ६ नियमित पदे तसेच ५ बहुउद्देशीय चतुर्थश्रेणी कर्मचारी (बाह्ययंत्रणेद्वारे) आणि विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील गट-व व गट-क संवर्गातील ६ नियमित पदे तसेच ४ बहुउद्देशीय चतुर्थश्रेणी कर्मचारी (बाह्ययंत्रणेद्वारे), अशी एकूण ६३ नियमित पदे व २३ बहुउद्देशीय चतुर्थश्रेणी कर्मचारी (बाह्ययंत्रणेद्वारे) मिळून एकूण ८६ पदांच्या आकृतीबंधास वित्त विभाग तसेच वित्त विभागाच्या उपसमितीने मान्यता प्रदान केलेली आहे.

तद्नंतर, दिनांक १ जून २०२६ रोजी झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीतही उपरोक्त ८६ पदांच्या आकृतीबंधास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. अशा प्रकारे, वित्त विभाग, वित्त विभागाची उपसमिती तसेच उच्चस्तरीय सचिव समिती यांच्या स्तरावर मान्यता प्राप्त झालेल्या सदर आकृतीबंधास प्रशासकीय स्वरूपाची अंतिम मान्यता प्रदान करून मंडळाच्या मुख्य कार्यालय व विभागीय कार्यालयांच्या कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

०२. सदर आकृतीबंधास शासन मान्यता प्रदान करण्यात आल्याच्या अनुषंगाने, मुख्य कार्यालय तसेच मुंबई, नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयांसाठी मंजूर करण्यात आलेल्या पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

२.१ महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुख्य कार्यालय, मुंबई येथील सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर पदांचे विवरणपत्र “अ” सोबत जोडण्यात आले आहे.

२.२ महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय, मुंबई येथील सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर पदांचे विवरणपत्र “ब” सोबत जोडण्यात आले आहे.

२.३ महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय, नागपूर येथील सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर पदांचे विवरणपत्र “क” सोबत जोडण्यात आले आहे.

२.४ महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर पदांचे विवरणपत्र “ड” सोबत जोडण्यात आले आहे.

०३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने, वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक २१७/आपुक, दिनांक १९ ऑगस्ट २०२६ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.

०४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२६०९१११७४५१०५१०८ असा आहे. सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

Department of Higher and Technical Education Mumbai Bharti 2026 – Detail PDF -Click Here

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड