बीएससीची ‘कट ऑफ’ पाच ते सात टक्क्यांनी वधारली!
Degree College Admission 2020 Cut Off
Degree College Admission 2020 Cut Off : यंदा बीएससीची ‘कट ऑफ’ पाच ते सात टक्क्यांनी वधारली आहे. इंजिनीअरिंग आणि मेडिकल प्रवेशपरीक्षेबाबत अद्याप निर्णय न झाल्याचा हा परिणाम आहे.
इंजिनीअरिंग आणि मेडिकल प्रवेश परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे विज्ञान शाखेतील बहुतांश विद्यार्थ्यांनी बीएससीला प्रवेश घेतला आहे. परिणामी यंदा बीएससीची ‘कट ऑफ’ पाच ते सात टक्क्यांनी वधारली आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांपेक्षा पारंपरिक अभ्यासक्रमांचा कट ऑफ यंदा चांगलाच वाढल्याचे समोर आले आहे. यामुळे यंदा पदवी अभ्यासक्रमांचा मार्ग खडतर असेल, असे चित्र पाहावयास मिळत आहे.
मुंबई विद्यापीठ संलग्नित कॉलेजांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष (एफवाय) प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. बारावीचा निकाल यंदा चांगलाच लागला आहे. यामुळे नव्वदीपार विद्यार्थ्यांचेही प्रमाण जास्त आहे. यातच इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. यामुळे विज्ञान शाखेत प्रवेशासाठी गर्दी वाढणार आहे, असा अंदाज ‘मटा’ने व्यक्त केला होता. तसे चित्र पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये दिसून आले आणि विज्ञान शाखेचा कट ऑफ आता पाच ते सात टक्क्यांनी वाढल्याचे पाहावयास मिळत आहे. इंजिनीअरिंग तसेच मेडिकल शिक्षणाची निवड करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपरीक्षा कधी होणार, प्रवेशप्रक्रिया कधी सुरू होणार, याविषयी अद्याप स्पष्टता नसल्याने पुढील शिक्षणाबाबत ते दिशाहीन आहेत. दरवर्षी बारावीची परीक्षा झाल्यावर महिनाभराच्या कालावधीत इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र अशा अभ्यासक्रमांसाठी राज्याची प्रवेशपरीक्षा होते. तर, राष्ट्रीय पातळीवर इंजिनीअरिंगसाठी जेईई आणि नीट परीक्षा घेण्यात येते. मात्र, यंदा या सर्व परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. तर राष्ट्रीय पातळीवरील परीक्षाही नेमक्या कधी होतील, हे अद्याप सांगता येत नाही. यामुळे विज्ञान शाखेतील बहुतांश विद्यार्थ्यांनी यंदा बीएससी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन ठेवले आहेत. यामुळे विज्ञान शाखेचा कट ऑफ यंदा चांगलाच वाढलेला दिसत आहे. याचबरोबर नव्वदपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढल्याने ही कट ऑफ वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कला शाखेलाही पसंती
मागील काही वर्षांत विद्यार्थ्यांचा कला शाखेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. पहिल्या गुणवत्ता यादीनुसार कला शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. ‘कमी गुण, नि कला शाखा’ या समीकरणाला विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा केराची टोपली दाखवली आहे. त्यात सर्व नामांकित कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी इनहाऊस कोट्यातून आपले प्रवेश निश्चित केल्याने हा टक्का वाढलेला आहे. स्पर्धापरीक्षांचे वाढते महत्त्व, पारंपरिक शिक्षणासोबत अल्प कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी मिळणारा वेळ, असंख्य नव्या संधी यामुळे हा बदल घडताना दिसत आहे. गेली काही वर्षे मुंबई विद्यापीठासह सर्वच कॉलेजांमध्ये कलेला अत्यंत गंभीर्याने घेतले गेले असून, अनेक वर्षांच्या प्रयत्नांतून कला शाखेला आलेली मरगळ आता दूर झाली आहे. परिणामी, गेल्या तीन ते चार वर्षांच्या प्रथम वर्ष पदवीच्या कट ऑफवर नजर टाकल्यास ती वर्षागणिक वाढतेच आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा स्वयंअर्थसाह्यीत, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या गुणवत्ता यादीत दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. मात्र, बीकॉमच्या कट ऑफमध्ये ४.५ टक्के, कम्प्युटर सायन्सच्या कट ऑफमध्ये ९.५ टक्के, बायोटेक्नोलॉजीच्या कट ऑफमध्ये ५ टक्के वाढ दिसून आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा कल हा बायोटेक, तसेच कम्प्युटर सायन्ससारख्या विषयांकडे दिसून येत आहे.
यंदाचे कॉलेज कट ऑफ
जयहिंद कॉलेज
- बीए : ९५.६७
- बीएससी : ७५.०८
- बीकॉम : ९१.००
- बीव्होक : ट्रॅव्हल अँड टुरिझम – ७०.१५
- सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट – ५०.००
रुईया कॉलेज
- बीए :
- इंग्रजी माध्यम – ९०.३१
- मराठी माध्यम – ५१.३८
- बीएससी : ८७.०८
- बायोकेमिस्ट्री : ८९.०२
- बायोटेक्नोलॉजी : ९४.०२
- बीएससी कम्प्युटर सायन्स : ८६.००
- बायोअॅनालिटीकल सायन्स : ६२.६२
- बीएमएम :
- इंग्रजी माध्यम –
- आर्टस् – ९४.३३
- सायन्स – ८८.९२
- कॉमर्स – ८९.८५:
- मराठी माध्यम –
- आर्टस् – ५६.००
- सायन्स – ७२.९२
- इंग्रजी माध्यम –
- बीव्होक : ट्रॅव्हल अँड टुरिझम – ७७.०२
- फार्माअॅनालिटीकल सायन्स : ४६.३१
रुपारेल कॉलेज
- बीए – ८८.६१
- बीकॉम – ८३.२३
- बीएससी : ७९.००
- कम्प्युटर सायन्स – ७४.७६
- बीएससी आयटी (गणितातील १०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांनुसार) – ७२ गुण.
- बीएमएस : कॉमर्स – ८६.९२
- आर्टस् – ७२.७६
- सायन्स – ७७.५३
पोदार कॉलेज
- बीकॉम : ९४.००
- बीएमएस : कॉमर्स – ९४.०४
- सायन्स – ८९.०२
- आर्टस् – ८४.००
- इतर – ७५.५४
- बीकॉम अॅक्च्युएरियल स्टडीज (Bcom Actuarial Studies) : ६७.२३
मिठीबाई कॉलेज
- बीए : ९६
- बीकॉम : ९१.४०
- बीकॉम ऑनर्स (FYBCOM.HONS.) : ९४.२०
- बीएससी : ५५.०८
- कम्प्युटर सायन्स : ८४.४०
- बायोटेक्नोलॉजी : ८८.६०
- बायोकेमिस्ट्री : ५४.१५
- बीएमएस : ९०.३१
- बीएमएम : ९५.००
- बॅफ : ९५.००
- बीबीआय : ८९.३३
- बीएफएम : ९४.२०
एन.एम कॉलेज
- बीकॉम : ९४.३३
- बॅफ : ९६.०२
- बीएफएम : ९५.०२
- बीएससी आयटी : (गणितातील १०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांनुसार) – ८१
- बीएमएस :
- सायन्स – ९१.०८
- आर्टस् – ९३.०८
- कॉमर्स – ९६.०२
- डिप्लोमा – ९२.८३
- बीकॉम ऑनर्स (Hons.) – ९५.०४
डहाणूकर कॉलेज
- बीकॉम : ८४.४६
- बॅफ : ८४.१५
- बीबीआय : ७५.०७
- बीएफएम : ७७.२३
- बीएससी आयटी : (गणितातील १०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांनुसार) – ५५ गुण.
- बीएमएस :
- कॉमर्स – ८४.४६
- सायन्स – ७१.२३
- आर्टस् – ६०.६२
- बीएमएम :
- आर्टस् – ७१.०८
- सायन्स – ७३.४१
- कॉमर्स – ६८.३१
सेंट झेवियर्स कॉलेज
- बीए : एचएससी बोर्ड – ९२
- इतर बोर्ड – ९८.६०
- बीएमएस : एचएससी बोर्ड – ८५.०३
- इतर बोर्ड – ९२.८७
- बीएससीआयटी : गणित विषयातील गुण – ९४
केसी कॉलेज
- बीए – ८०
- बीकॉम (विना अनुदानित) – ९३
- बीएससी – ६०
- बीएमएस : आर्टस् – ९०.३१
- कॉमर्स – ९५
- सायन्स – ९१.२०
- बॅफ – ९४
- बीबीआय – ८९
- बीएफएम – ९३
विल्सन कॉलेज
- बीए – ९३.६
- बीएससी – ६४.३१
- बॅफ – ८८.४६
- बीएमएस :
- आर्टस् – ८८.१५
- कॉमर्स – ९२.३३
- सायन्स – ८६.६
वझे-केळकर कॉलेज
- बीकॉम – ८९
- बीव्होक – ५१
के जे सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स
- आर्टस् – ८८.२०
- कॉमर्स – ८८.२०
के जे सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स
- सायन्स – ६१
- कॉमर्स – ८०
एस के सोमय्या कॉलेज
- आर्टस् – ७०
- कॉमर्स – ७७.२३
साठ्ये कॉलेज
- बीए – ७१.३८
- बीकॉम – ८०.४६
- बीएससी – ७२.४६
- बीएससीआयटी : गणित विषयातील गुण – ७१
- बीएमएस : आर्टस् – ४९.६९
- कॉमर्स – ८१.०७
- सायन्स – ६६
एचआर
- बीकॉम………………..९५
- बीएफएम………………९४
- बीएएफ……………….९५
- बीएमएम(कॉमर्स)……..९१.०८
- बीएमएम (विज्ञान)………८८.२०
- बीएमएम (कला)………..९४.२०
- बीएमएस(कॉमर्स)……….९६
- बीएमएस (विज्ञान)…….. ९१.२०
- बीएमएस (कला)……….९१.४०
- बीकॉम : ८४.४६
- बॅफ : ८४.१५
- बीबीआय : ७५.०७
- बीएफएम : ७७.२३
- बीएससी आयटी : (गणितातील १०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांनुसार) – ५५ गुण.
- बीएमएस :
- कॉमर्स – ८४.४६
- सायन्स – ७१.२३
- आर्टस् – ६०.६२
- बीएमएम :
- आर्टस् – ७१.०८
- सायन्स – ७३.४१
- कॉमर्स – ६८.३१
सोर्स : म. टा.
Table of Contents