स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये राज्य सरकार हजारो रिक्त पदांची भरती करत आहे. विविध विभागांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होत असून भरती प्रक्रिया होत आहे. नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना अद्यापपर्यंत या विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी ही जाहिरात प्रसिद्ध करावी, असे निवेदन कोकण विभाग कृषी पदवी, पदविकाधारक संघर्ष समितीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिले आहे.
नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायतमधील गट ”क” व गट ”ड” वर्गातील जाहिरात आतापर्यंत एकदाही प्रसिद्ध झाली नाही. गेल्या आठ ते नऊ वर्षांत या विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे झाली आहेत. या रिक्त पदांमुळे नगरपरिषद व नगरपंचायत कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. याची दखल घेऊन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायतमधील गट ‘क” व गट ‘ड’ वर्गातील जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नगरपरिषद, नगरपंचायत विभागाची गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गातील ३,७२० पदाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल, असे मुख्यमंत्री यांनी जानेवारी २०२३ मध्ये जाहीर केले होते. या विभागाद्वारे येणाऱ्या जाहिरातीचा अभ्यासक्रम ही जून महिन्यात जाहीर केला. मात्र आजपर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध झाली नसून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी ही जाहिरात प्रसिद्ध करा, अशी मागणी केली आहे.
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















