DBATU Exam 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या (BATU) ढिसाळ नियोजनाचा फटका राज्यातील हजारो अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना बसला आहे. मंगळवारी (९ जून) सकाळी सुरू होणारी ‘रेमेडियल परीक्षा’ तांत्रिक अडचणींमुळे तब्बल काही तास उशिराने दुपारनंतर सुरू झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थी सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर उपस्थित होते. सकाळी १० वाजता परीक्षा सुरू होणे अपेक्षित असताना पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे पेपर वेळेत सुरू होऊ शकला नाही. विद्यापीठाकडून “तांत्रिक समस्या लवकरच दूर होईल” असे सांगितले जात होते, मात्र प्रत्यक्ष परीक्षा दुपारनंतर सुरू झाली.
दरम्यान, सकाळच्या सत्रातील विद्यार्थी केंद्रांवर थांबलेले असतानाच दुसऱ्या सत्रातील परीक्षार्थीही केंद्रांवर दाखल झाल्याने मोठा गोंधळ उडाला. कोणत्या विद्यार्थ्यांची परीक्षा आधी घ्यायची, याचे नियोजन करताना महाविद्यालय प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनीही विद्यापीठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यभरातील सुमारे ११ हजार विद्यार्थी ही परीक्षा देत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठाने सुरुवातीला परीक्षा ८ ते १० जूनदरम्यान होणार असल्याचे पत्र महाविद्यालयांना दिले होते. मात्र, ऐनवेळी समाजमाध्यमांद्वारे परीक्षा ९ जूनपासून सुरू होणार असल्याचा संदेश देण्यात आल्याने वेळापत्रकात बदल करावा लागला.
गोंधळानंतर विद्यापीठाने परीक्षेसाठी एक दिवस अतिरिक्त वाढवून दिल्याची घोषणा केली. यंदा ऑनलाइन परीक्षेपूर्वी मॉक टेस्टही घेण्यात आली नसल्याचे काही प्राचार्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यापीठाच्या नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















