खुशखबर! दावोस करारांचा मोठा फायदा १६ लाख रोजगार निर्मितीची होणार! | Davos Deals Benefit! 16 Lakh Jobs!

Davos Deals Benefit! 16 Lakh Jobs!

आपल्यासाठी एक आनंदाची बातमी, महाराष्ट्रात दावोस करारांमुळे तब्बल १६ लाख नवीन रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. त्यांनी स्पष्ट केले की, या करारांची प्रभावी अंमलबजावणी राज्य सरकार करणार आहे. तसेच, विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात गेल्या तीन वर्षांत झालेल्या सामंजस्य करारांचा आढावा सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. निश्चितच या मुळे आपल्या महाराष्ट्रात रोजगाराच्या लाखो नवीन संधी निर्माण होणार आहे. याचा फायदा पुढील जाहीर दिवसात आपल्याया निश्चितच दिसेल. 

Davos Deals Benefit! 16 Lakh Jobs!

 

विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर
सत्ताधारी आणि विरोधकांनी उद्योग, गुंतवणूक, गृहनिर्माण, पुनर्विकास आणि प्रदूषण यांसारख्या विषयांवर विधान परिषदेत मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा झाली. विरोधकांनी केलेले दावोस करारांवरील आरोप फेटाळून, सामंत यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या काळातील करारांची अंमलबजावणी झाली नव्हती. मात्र, महायुती सरकारने गेल्या तीन वर्षांत केलेल्या करारांची योग्य अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नव्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन
राज्यात ग्रामीण भागात स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी ‘नेक्स्ट डोअर स्टार्टअप’ योजना लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या योजनेतून १ लाख नवीन स्टार्टअप सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. ज्या तालुक्यात एकही स्टार्टअप नाही, तेथे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणुका
सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी सुरू आहे, याची जाणीव असूनही विरोधक सरकारवर दिशाभूल करणारे आरोप करत आहेत, असा सामंत यांनी आरोप केला.

नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी
विधान परिषदेत नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर पाच नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी, भाजपचे संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड