सायबर न्यायवैद्यक तज्ज्ञांची पदे रिक्त, त्वरित भरा- हायकोर्ट ! – Cyber Cell Bharti 2024
Cyber Cell Bharti 2024
सायबर न्यायवैद्यक विभागातील तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची पदे भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने राज्यात हजारो फौजदारी खटले प्रलंबित असताना सायबर न्यायवैद्यक विभागातील रिक्त पदे वेळीच का भरली जात नाहीत? असा संतप्त सवाल उपस्थित करत राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एड्युज कंपनीने चोरीस गेलेल्या डेटाचा तपास वांद्रे पोलीस ठाण्यातून अन्य स्वतंत्र तपास यंत्रणेकडे वर्ग करा, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयाला दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सायबर न्यायवैद्यक विभागातील कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येची बाब न्यायालयाच्या निदर्शनास येताच खंडपीठाने संताप व्यक्त करत राज्य सरकारच्या उदासीन कारभाराचा चांगलाच समाचार घेतला. सायबर न्यायवैद्यक विभागातील पदे रिक्त का ? ही पदे भरण्याची जबाबदारी कोणाची? कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असताना वेळीच भरती का केली नाही? रिक्त पदे कधी भरणार? आदी प्रश्नांचा भडिमार करत राज्य सरकारला याबाबत ८ ऑगस्टला सविस्तर तपशील सादर करण्याचे आदेश दिले.
Comments are closed.