सीएस एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्टचे प्रवेशपत्र जारी

CSEET 2020 Admit Card

CSEET 2020 Admit Card : सीएस एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्टचे अॅडमिट कार्ड उपलब्ध झाले आहेत. परीक्षा २९ ऑगस्ट रोजी आहे…

CSEET 2020 Admit Card: इंन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (ICSI) ने सीएस एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET 2020) साठी प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) जारी केले आहेत. संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ icsi.edu वर हे अॅडमिट कार्ड उमेदवारांना उपलब्ध होतील. ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते, ते आपल्या रजिस्ट्रेशन नंबरच्या सहाय्याने CSEET 2020 चे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील.

अधिकृत निवेदनात असे जाहीर केले आहे की उमेदवार १९ ऑगस्ट सकाळी १० वाजल्यापासून आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील. CSEET 2020 यावर्षी २९ ऑगस्ट २०२० रोजी होणार आहे. करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार ही परीक्षा यंदा आपल्या घरातूनच ऑनलाइन रिमोट प्रोक्टोर्ड मोडने देणार आहेत. ‘Remote Proctored Mode’ ही एक सुरक्षितपणे ऑनलाइन मोडने परीक्षा देण्याची पद्धती आहे. या पद्धतीत ऑनलाइन परीक्षेत कोणताही गैरप्रकार किंवा चीटिंग करता येत नाही.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

उमदेवार पुढे दिलेल्या लिंकच्या माध्यमातून CSEET 2020 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील.

CSEET 2020 अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. – https://admitcardbuilder.azurewebsites.net/app/E122KAB374/

CSEET 2020 Admit Card असे करा डाऊनलोड

– दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा
– आता आपला रजिस्ट्रेशन क्रमांक आणि जन्मतारीख नोंदवा.
– लॉग इन करून आपलं अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा.

CSEET 2020 आधी १७ जुलै २०२० रोजी होणार होती. पण करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर ICSI ने परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या व्यतिरिक्त आयसीएसआयने अर्ज करण्याची मुदतही २७ जुलैपर्यंत वाढवली.

अधिकृत माहितीनुसार, उमेदवार आपल्या घरून कोणत्याही सुरक्षित ठिकाणाहून परीक्षा द्या. परीक्षेसाठी उमेदवार लॅपटॉप, कॉम्प्युटरचा वापर करू शकतात. मोबाईल फोनद्वारे परीक्षा देण्याची परवानगी नाही.

ऑनलाइन टेस्टचा कॉम्प्युटरआधारित एमसीक्यूचा भाग CSEET च्या वर्तमान वेळापत्रकानुसार नाही. ऑनलाइन टेस्टचा संगणक आधारित MCQ भाग CSEET च्या सध्याच्या शेड्युलनुसार राहील. पेपर ४ हा ५० गुणांचा असेल. यात चालू घडामोडी, सादरीकरण आणि संवाद कौशल्यासंबंधी प्रश्न विचारले जातील. ICSI ने सांगितले आहे की लॉग इन क्रिडेंशिअल परीक्षेपूर्वी उमेदवारांना ईमेल आणि मोबाइल क्रमांकावर पाठवले जातील.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड