संगणक टायपिंग परीक्षा जानेवारीत होणार
Computer typing exam will be held in January
पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने नियमित विद्यार्थ्यांसाठी येत्या जानेवारी शासकीय संगणक टायपिंग परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ६ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
शासकीय संगणक टायपिंग संस्थेमार्फत जुलै ते डिसेंबर या सत्रासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांची ऑनलाईन नोंदणी परिषदेच्या संकेतस्थळावर करण्यात आलेली आहे. जुलै ते डिसेंबर याच सत्रातील विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे. मागील अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा रिपीट म्हणून या परीक्षेत बसता येणार आहे.
परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी ७ नोव्हेंबर २०१९ पासून सुविधा उपलब्ध करून देण्यात अली आहे. ७ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०१९ पर्यंत व्हिलन शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. १४ ते २० डिसेंबर या कालावधीत अतिविलंब शुल्कासह अर्ज दाखल करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ओनलाईन पद्धतीने शुल्क भरून चलन अपडेट झाल्या शिवाय अर्ज भरण्याची प्राक्रिया सुरु होणार नाही.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अर्जाची मुदत संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलाचे नाव, आईचे नाव, विषय बदल, फोटो बदल, या दुरुस्त करण्यासाठी दंड आकारण्यात येणार आहे. त्यांमुळे संस्थानी विद्यार्थांचे अर्ज अचूक भरणे बंधनकारक आहे.
परीक्षेचे सविस्तर वेळापत्र परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
आठवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे अवाश्यक आहे.
संगणक टायपिंग परीक्षेला बसण्यासाठी शासनमान्य शाळेतून विद्यार्थ्यांनी किमान आठवी पर्यंत चे शिक्षण पूर्ण केलेले असावे. आठवड्यातून किमान चार तासांप्रमाणे परीक्षेच्या तारखेपूर्वी चार महिने किंवा ८० घड्याळी तास नियमित विद्यार्थी म्हणून प्रशिक्षण करणे आवश्यक आहे. ३० व ४० शब्द प्रति मिनिट इंग्रजी, मराठी, हिंदी माध्यमासाठी ऑनलाईन परीक्षेला बसता येणार आहे.